agriculture news in marathi, Gram repurchase in problem in Nanded, Parbhani and Hingoli districts | Agrowon

नांदेड, परभणी, हिंगोलीत हरभरा खरेदी केंद्रावर पडून
टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 एप्रिल 2018

परभणी : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन योजनेअंतर्गंत नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात शनिवार (ता. २८) पर्यंत नोंदणी केलेल्या १२ हजार ६५ शेतकऱ्यांपैकी १,४३२ शेतकऱ्यांचा २१ हजार १७६ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. वखार महामंडळाकडे साठविण्यासाठी गोदामे नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांचे ९ कोटी ३१ लाख ७४ हजार ४०० रुपयांचे चुकारे अडकले आहेत. 

दरम्यान, बोरी, गंगाखेड, मानवत (जि. परभणी), वसमत (जि. हिंगोली) या ठिकाणच्या केंद्रावर हरभरा खरेदी ठप्प आहे.

परभणी : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन योजनेअंतर्गंत नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात शनिवार (ता. २८) पर्यंत नोंदणी केलेल्या १२ हजार ६५ शेतकऱ्यांपैकी १,४३२ शेतकऱ्यांचा २१ हजार १७६ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. वखार महामंडळाकडे साठविण्यासाठी गोदामे नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांचे ९ कोटी ३१ लाख ७४ हजार ४०० रुपयांचे चुकारे अडकले आहेत. 

दरम्यान, बोरी, गंगाखेड, मानवत (जि. परभणी), वसमत (जि. हिंगोली) या ठिकाणच्या केंद्रावर हरभरा खरेदी ठप्प आहे.

हरभऱ्यासाठी नांदेड जिल्ह्यातील ४५०० शेतकऱ्यांनी, परभणी जिल्ह्यातील ३,१६८ शेतकऱ्यांनी, हिंगोली जिल्ह्यातील ४४०० शेतकऱ्यांनी असे तीन जिल्ह्यात एकूण १२ हजार ६५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. साधारणपणे ९ एप्रिलपासून हरभरा खरेदीस सुरवात झाली आहे. पहिल्या वीस दिवसांत या तीन जिल्ह्यांतील १,४३२ शेतकऱ्यांचा २१ हजार १७६ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आलेली आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यात १०३८ शेतकऱ्यांचा १५ हजार ८०० क्विंटल, परभणी जिल्ह्यातील ३१५ शेतक-यांचा ४ हजार २७५ क्विंटल, हिंगोली जिल्ह्यातील ७९ शेतकऱ्यांचा १ हजार १०१ क्विंटल हरभऱ्याचा समावेश आहे. आजवर खरेदी करण्यात आलेला २१ हजार १७६ क्विंटल हरभरा केंद्रावरच पडून असल्यामुळे शेतकऱ्यांचे ९ कोटी ३१ हजार ७४ हजार ४०० रुपये एवढ्या रकमेचे चुकारे रखडले आहेत.

मानवत (जि. परभणी) येथे विदर्भ को-आॅपरेटिव्‍ह मार्केटिंग फेडरेशनचे खरेद केंद्र कार्यान्वित आहे. परंतु नुकतेच पाथरी (जि. परभणी) येथेही नाफेडचे खरेदी केंद्र कार्यान्वित करण्यात आले. पाथरी येथे नोंदणी सुरू असताना मानवत येथील खरेदी केंद्रावर नोंदणीसाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे मानवत येथील हरभरा खरेदी बंद आहे. बोरी, गंगाखेड, वसमत येथे साठविण्यासाठी जागा नसल्यामुळे हरभरा खरेदी ठप्प आहे.

वजन काट्यावरील नोंदी घेण्यासाठी मनुष्यबळ नसल्यामुळे चाळण्या तसेच वजन काट्यांची संख्या वाढविता येत नाही. वखार महामंडळाच्या गोदामात जागा नसल्यामुळे खासगी गोदामे भाडेतत्त्वावर घेण्यात आलेली आहेत. परंतु खरेदी केंद्र एका ठिकाणी तर गोदाम दूर अतंरावरील ठिकाणी आहेत. त्यामुळे वाहतूक खर्च वाढत असल्याच्या कारणांवरून खरेदी यंत्रणेतील सब एजंट संस्था केंद्रावर खरेदी केलेला शेतमाल हलविण्यास तयार नाहीत. त्यामुळे गेल्या वीस दिवसांत या तीन जिल्ह्यांत खरेदी करण्यात आलेला २१ हजार १७६ क्विंटल हरभरा या केंद्रांवरच पडून आहे असे सूत्रांनी सांगितले.
 

जिल्हा निहाय नोंदणी केलेले शेतकरी, खरेदी झालेली संख्या, हरभरा खरेदी स्थिती (क्विंटल मध्ये)
जिल्हा नोंदणी खरेदी संख्या हरभरा
नांदेड ४५०० १०३८  १५८००
परभणी ३१६८ ३१५  ४२७५
हिंगोली ४४०० ७९ ११०१          

 

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...
सोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...