Agriculture news in marathi Gram Sabha resolution campaign for milk rates | Agrowon

दूध दरांसाठी ग्रामसभांच्या ठरावाची मोहीम 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 16 जून 2021

राज्यात दुधाला दर दिला जात नसल्याने दूध उत्पादक मेटाकुटीला आले आहेत. असे असताना सरकार लक्ष देईना. खासगी दूध संघ चालकांकडून शेतकऱ्यांची लूट सुरूच असल्याने किसान सभेने १७ जूनला राज्यभर आंदोलन पुकारले आहे.

नगर : राज्यात दुधाला दर दिला जात नसल्याने दूध उत्पादक मेटाकुटीला आले आहेत. असे असताना सरकार लक्ष देईना. खासगी दूध संघ चालकांकडून शेतकऱ्यांची लूट सुरूच असल्याने किसान सभेने १७ जूनला राज्यभर आंदोलन पुकारले आहे. आंदोलनाचा एक भाग म्हणून दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने दूध प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामसभेतून राज्यभरातील गावांत ग्रामसभांचे ठराव घेण्याची मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

आंदोलनात सहभाग वाढीसाठीही संघर्ष समितीचे कार्यकर्ते काम करणार आहेत. या पूर्वी झालेल्या शेतकरी संपाच्या धर्तीवरच ही मोहीम असेल, असे सांगण्यात आले. कोरोनामुळे लॉकडाउन झाले आणि गेल्या वर्षीप्रमाणेच दुधाच्या व्यवसायावर संकट आले. मागणी कमी झाल्याचे सांगत दुधाचे दर एकाच महिन्यात टप्प्या टप्प्याने सुमारे १२ ते १३ रुपयांनी प्रती लिटर कमी केले.

दुधाचे दर कमी झाले आणि पशुखाद्याचे दर वाढल्याने कोंडी झालेले दूध उत्पादक दोन महिन्यांपासून हवालदिल झालेले असताना सरकारने मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप किसान सभेच्या नेत्यांनी केला आहे. सरकारच्या धोरणाचा निषेध म्हणून किसान सभेने १७ जून रोजी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीही सहभागी होणार आहे. 


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात एक लाख हेक्टरवर पीकनुकसानऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठपैकी सहा जिल्ह्यांत...
पावसाची उसंत, सावरण्याची धडपड सुरु पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...
विमा कंपन्यांचा राज्यभर सावळागोंधळ पुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेतील खासगी विमा...
कोकणात मुसळधारेची शक्यता पुणे : कोकणसह संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कमी...
सोयाबीनने गाठला दहा हजारांचा ऐतिहासिक...अकोला/लातूर ः गेले काही महिने सोयाबीनला चांगला दर...
विदर्भात कृषी अधिकाऱ्यांनीच घेतले विमा...नागपूर ः जिल्हास्तरावर आमचे कार्यालय आहे, हे...
मराठवाड्यात पीकविम्याबाबत शेतकऱ्यांसमोर...औरंगाबाद : पीकविमा उतरविण्याची सोय त्यासाठी जागर...
खानदेशात पीकविमा कंपनीचे कार्यालयच नाही जळगाव : खानदेशात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत...
केव्हीकेने दाखवली ‘वीडर’ची पॉवर, छोट्या...मजूरटंचाई व वाढलेले मजूरदर लक्षात घेऊन ममुराबाद (...
दिशा कार्यक्षम पूर व्यवस्थापनाची!महाराष्ट्र देशी सध्या अतिवृष्टी आणि ...
लातूरला सोयाबीन ९१४१ रुपये !लातूर ः येथील लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न  ...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात चक्रिय...
पीक विम्यात चुकीचे प्रकार खपवून घेणार ...नाशिक: पीकविमा कंपन्यांकडून पाच पाच जिल्ह्यांसाठी...
केंद्राच्या काळ्या कायद्यांची आम्हाला...नवी दिल्ली ः कायद्याच्या प्रक्रियेतून न आलेल्या...
धरण क्षेत्रात पावसाची हजेरी पुणे : तीन दिवसांपासून राज्यातील धरणक्षेत्रात...
राज्यात दीड महिन्यांत धरणांत ३७३ टीएमसी...पुणे : राज्यातील बहुतांश भागात जुलैमध्ये पावसाने...
हजारो नुकसानग्रस्त दाव्यापासून वंचित नांदेड : अतिवृष्टी तसेच संततधार पावसामुळे...
कोल्हापुरात पुराचे पाणी ओसरू लागले कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली...
राज्याची फळबाग लागवड योजना बंद नगर ः फळबागेचे क्षेत्र वाढीसाठी राज्यात सध्या...
विना नांगरणी तंत्राने कपाशी, तुरीची शेतीदेवगाव (ता. पैठण, जि. औरंगाबाद) येथील प्रयोगशील,...