ग्रामसभा करणार तेंदुपत्याची विक्री 

ग्रामपंचायतींना तेंदूपत्ता संकलन करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. यातील काही ग्रामसभा वनविभागामार्फत आजवर तेंदुपत्ता संकलन करीत होत्या. यावर्षी मात्र सर्वच ग्रामसभांनी स्वतः तेंदूपत्ता संकलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
Gram Sabha will sell tendupatya
Gram Sabha will sell tendupatya

गडचिरोली : पेसा (पंचायत एक्स्टेंशन टू शेडूल एरियाज) अंतर्गत असलेल्या सर्व ग्रामपंचायतींना तेंदूपत्ता संकलन करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. यातील काही ग्रामसभा वनविभागामार्फत आजवर तेंदुपत्ता संकलन करीत होत्या. यावर्षी मात्र सर्वच ग्रामसभांनी स्वतः तेंदूपत्ता संकलन करण्याचा निर्णय घेतला आहे. 

गडचिरोली जिल्ह्यात जवळपास १३०० गावे पेसाअंतर्गत मोडतात. त्यापैकी जवळपास ७०० गावे सिमेलगत असलेल्या जंगलात तेंदूची झाडे आहेत. पेसा कायद्यांतर्गत या ग्रामपंचायतींना तेंदूपत्ता संकलन करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. काही ग्रामपंचायती तेंदूपत्ता स्वतः च संकलन करून त्याची विक्री करत होत्या. तर जवळपास २५ टक्के ग्रामसभा वन विभागाच्या मार्फत तेंदूपत्ता संकलन करीत होत्या.यामध्ये तेंदूपत्ता लिलाव करण्यापासून विक्रीची प्रक्रिया वन विभागामार्फत राबविली जात होती. 

तेंदूपत्ता विक्रीतून प्राप्त उत्पन्नापैकी खर्च वजा जाता उर्वरित रक्कम वनविभाग संबंधित ग्रामसभेला देत होता. या वर्षी मात्र, एकाही ग्रामसभेने वनविभागाची मदत घेतली नाही. सर्वच ग्रामसभा स्वतः तेंदूपत्ता संकलन करीत आहेत. अनेक ग्रामसभांना आता अनुभव आल्याने त्या देखील तेंदूपत्ता संकलनाठी सरसावल्या आहेत. केसा गावाचे क्षेत्र वगळता वनविभागाकडे असलेल्या काही जंगलात तेंदूपत्ता उत्पादन होते. या वर्षी हे सर्व युनिट विकण्यात आली आहेत. विशेष म्हणजे लिलावाच्या पहिल्याच फेरीत सर्वच युनिट विकण्यात आली आहेत. त्यामुळे वनविभागाला देखील चांगले उत्पन्न मिळणार आहे. 

यंदा चांगल्या उत्पन्नाची आशा  गेल्या दोन वर्षात तेंदुपत्ता त्याला फारशी मागणी व भावही मिळत नव्हता. गेल्या वर्षी तर काही ग्रामसभांच्या लिलावाला ठेकेदार देखील पोहचले नाही. त्यामुळे काही ग्रामसभांना तेंदूपत्त्या पासून रुपयाचे उत्पन्न मिळाले नाही. वनविभागाच्या युनिटला ही फार कमी भाव मिळाला होता. त्यामुळे ग्रामसभांचे मोठे नुकसान झाले होते. या वर्षी मात्र तेंदूपत्त्याला चांगला भाव व मागणी आहे. काही गावांमध्ये तेंदूपत्त्याचा दर जवळपास दहा हजार रुपये प्रति स्टॅंडर्ड बॅग पर्यंत पोहोचला आहे. बहुतांश गावाच्या लिलावाची प्रक्रिया आटोपली आहे. त्यामुळे यावर्षी तेंदूपत्ता पासून चांगले उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com