Agriculture news in marathi Gram Sabha will sell tendupatya | Page 2 ||| Agrowon

ग्रामसभा करणार तेंदुपत्याची विक्री 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 एप्रिल 2021

ग्रामपंचायतींना तेंदूपत्ता संकलन करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. यातील काही ग्रामसभा वनविभागामार्फत आजवर तेंदुपत्ता संकलन करीत होत्या. यावर्षी मात्र सर्वच ग्रामसभांनी स्वतः तेंदूपत्ता संकलन करण्याचा निर्णय घेतला आहे. 

गडचिरोली : पेसा (पंचायत एक्स्टेंशन टू शेडूल एरियाज) अंतर्गत असलेल्या सर्व ग्रामपंचायतींना तेंदूपत्ता संकलन करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. यातील काही ग्रामसभा वनविभागामार्फत आजवर तेंदुपत्ता संकलन करीत होत्या. यावर्षी मात्र सर्वच ग्रामसभांनी स्वतः तेंदूपत्ता संकलन करण्याचा निर्णय घेतला आहे. 

गडचिरोली जिल्ह्यात जवळपास १३०० गावे पेसाअंतर्गत मोडतात. त्यापैकी जवळपास ७०० गावे सिमेलगत असलेल्या जंगलात तेंदूची झाडे आहेत. पेसा कायद्यांतर्गत या ग्रामपंचायतींना तेंदूपत्ता संकलन करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. काही ग्रामपंचायती तेंदूपत्ता स्वतः च संकलन करून त्याची विक्री करत होत्या. तर जवळपास २५ टक्के ग्रामसभा वन विभागाच्या मार्फत तेंदूपत्ता संकलन करीत होत्या.यामध्ये तेंदूपत्ता लिलाव करण्यापासून विक्रीची प्रक्रिया वन विभागामार्फत राबविली जात होती. 

तेंदूपत्ता विक्रीतून प्राप्त उत्पन्नापैकी खर्च वजा जाता उर्वरित रक्कम वनविभाग संबंधित ग्रामसभेला देत होता. या वर्षी मात्र, एकाही ग्रामसभेने वनविभागाची मदत घेतली नाही. सर्वच ग्रामसभा स्वतः तेंदूपत्ता संकलन करीत आहेत. अनेक ग्रामसभांना आता अनुभव आल्याने त्या देखील तेंदूपत्ता संकलनाठी सरसावल्या आहेत. केसा गावाचे क्षेत्र वगळता वनविभागाकडे असलेल्या काही जंगलात तेंदूपत्ता उत्पादन होते. या वर्षी हे सर्व युनिट विकण्यात आली आहेत. विशेष म्हणजे लिलावाच्या पहिल्याच फेरीत सर्वच युनिट विकण्यात आली आहेत. त्यामुळे वनविभागाला देखील चांगले उत्पन्न मिळणार आहे. 

यंदा चांगल्या उत्पन्नाची आशा 
गेल्या दोन वर्षात तेंदुपत्ता त्याला फारशी मागणी व भावही मिळत नव्हता. गेल्या वर्षी तर काही ग्रामसभांच्या लिलावाला ठेकेदार देखील पोहचले नाही. त्यामुळे काही ग्रामसभांना तेंदूपत्त्या पासून रुपयाचे उत्पन्न मिळाले नाही. वनविभागाच्या युनिटला ही फार कमी भाव मिळाला होता. त्यामुळे ग्रामसभांचे मोठे नुकसान झाले होते. या वर्षी मात्र तेंदूपत्त्याला चांगला भाव व मागणी आहे. काही गावांमध्ये तेंदूपत्त्याचा दर जवळपास दहा हजार रुपये प्रति स्टॅंडर्ड बॅग पर्यंत पोहोचला आहे. बहुतांश गावाच्या लिलावाची प्रक्रिया आटोपली आहे. त्यामुळे यावर्षी तेंदूपत्ता पासून चांगले उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा आहे. 


इतर ताज्या घडामोडी
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...
नगरमध्ये महावितरणच्या पायाभूत सुविधांचे...नगर : कृषिपंप वीज धोरण २०२०च्या अंमलबजावणीमुळे...
धान चुकाऱ्याअभावी शेतकऱ्यांची आर्थिक...गोंदिया : गेल्यावर्षी आधारभूत दराने धान विक्री...
सांगलीत खरिपासाठी हवे ३३ हजार ६९०...सांगली  : यंदाच्या खरीप हंगामाची तयारी कृषी...
औरंगाबादमध्ये खरबुजाला सरासरी १०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
तुलनेत यंदा दुपटीने गाळपकोल्हापूर : गेल्या हंगामापेक्षा यंदाच्या हंगामात...
कृषी सल्ला : कापूस, भुईमूग, कांदा, फळ...जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे जमिनीत...
अस्वलाकडून होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी...भंडारा : जंगलालगत असलेल्या शेतीत वन्यप्राण्यांचा...
अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल, ‘...मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर...
अति उष्ण, ढगाळ हवामानआठवडा अखेरपर्यंत ते १००६ हेप्टापास्कल इतके राहतील...
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचे...पुणे ः बहुप्रतीक्षित पुणे-नाशिक सेमी हायस्पीड...
नाशिक : माथाडी युनियनकडून ‘काम बंद’नाशिक : राज्य शासनाच्या विविध माथाडी मंडळातील...
पुणे ‘जि.प.’तर्फे कर्मचाऱ्यांना मिळणार...पुणे ः ‘‘जिल्हा परिषदेच्या बक्षिस योजनेतून आता...
‘खरिपात सोयाबीनचे घरचेच बियाणे वापरा’सातारा : येत्या खरीप हंगामात  सोयाबीनचे...
वाशीम जिल्ह्यात कृषी निविष्ठा...वाशीम : जिल्ह्यातील शेतकरी, कंपनी प्रतिनिधी आणि...
रसवंतीचालक, ऊस उत्पादकांना आर्थिक...बुलडाणा : ‘‘जिल्ह्यासह राज्यभरातील लाखो शेतकरी...
‘ताकारी’तून तिसरे आवर्तन सुरूवांगी, जि. सांगली  : ताकारी योजनेतून यंदाचे...
नगर, नाशिकमध्ये १४ साखर कारखान्यांचा...नगर ः नगर, नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत २६...
सांगलीत द्राक्ष बागांची खरड छाटणी अंतिम...सांगली : पुढील हंगामातील घडांची निर्मिती आणि...
‘कादवा’कडून ३०० चा तिसरा हप्ता...नाशिक : ‘‘कादवा सहकारी साखर कारखान्याचे गळीत...