भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या संचालकांनी ''कॅच द रेन'' या भूजल योजनेच्या जनजागृती अभियानाच
अॅग्रो विशेष
ग्रामसभांना ३१ मार्चपर्यंत परवानगी नाहीच
ग्रामसभा घेण्याबाबत परवानगी देण्यात आली होती. मात्र, आताच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुका व अद्याप सरपंचांची निवड झाली नसल्याने ग्रामसभा घेण्यास ३१ मार्चपर्यंत स्थगिती दिली आहे.
अकोला : राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये कोविड-१९च्या अनुषंगाने मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून ग्रामसभा घेण्याबाबत परवानगी देण्यात आली होती. मात्र, आताच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुका व अद्याप सरपंचांची निवड झाली नसल्याने ग्रामसभा घेण्यास ३१ मार्चपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.
शासनाकडून १५ जानेवारीला काढलेल्या परिपत्रकानुसार कोरोनाचे नियम पाळून ग्रामसभा घेण्याबाबत परवानगी दिल्या गेली होती. मात्र, राज्यात नुकत्याच ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. अद्याप सरपंचांची निवड झालेली नाही. मुदत संपलेल्या बऱ्याच
ग्रामपंचायतींच्या ठिकाणी प्रशासक नियुक्त करण्यात आलेले आहेत. यापैकी प्रशासकाकडे एकापेक्षा अधिक ग्रामपंचायतींचा कार्यभार सोपविण्यात आलेला आहे. यामुळे प्रशासकास एकाचवेळी एका पेक्षा अधिक ठिकाणी ग्रामसभेचे अध्यक्षस्थान भूषविणे शक्य होणार नाही. त्यामुळे ग्रामसभा घेणे परिणामकारक होणार नाही, कोरोनाचे सावट कायम आहे. ही कारणे देत ग्रामसभांना ३१ मार्च २०२१पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. ग्रामसेवक संघटनेने नुकतीच ग्रामविकास खात्याच्या मंत्र्यांची भेट घेत ग्रामसभा स्थगित ठेवण्याची मागणी केली होती. याची दखल घेत शासनाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या स्वाक्षरीचे पत्र बुधवारी (ता.२०) काढण्यात आले आहे.
- 1 of 672
- ››