उस्मानाबादमध्ये हरभरा विक्रीसाठी २० हजारावर शेतकऱ्यांची नोंदणी

उस्मानाबाद : जिल्ह्यात हरभऱ्याच्या खरेदीसाठी सुरु करण्यात आलेल्या १४ केंद्रांवर २० हजार ५७७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
Gram for sale in Osmanabad Registration of over 20,000 farmers
Gram for sale in Osmanabad Registration of over 20,000 farmers

उस्मानाबाद : जिल्ह्यात हरभऱ्याच्या खरेदीसाठी सुरु करण्यात आलेल्या १४ केंद्रांवर २० हजार ५७७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. 

जिल्ह्यात हरभऱ्याच्या खरेदीसाठी उस्मानाबाद, नळदुर्ग, भूम, वाशी, लोहारा, गुंजोटी, कानेगाव, दस्तापूर, ढोकी, तुळजापूर, कळंब, येडशी, शिराढोन व पार्डी या १४ ठिकाणी हमी दर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले.

यांपैकी पार्डी वगळता सर्व १३ केंद्रांवर २० हजार ५७७ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली. त्यांपैकी जवळपास १० केंद्रांवरील ७१३२ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खरेदीसाठी एसएमएस पाठविण्यात आले. त्यांपैकी ४ हजार २८२ शेतकऱ्यांकडील ५२ हजार ३४४ क्विंटल ७१ किलो हरभरा २६ मे पर्यंत खरेदी करण्यात आला. हेक्टरी ८ क्विंटल ५ किलो उत्पादकतेनुसार या खरेदी केलेल्या हरभऱ्याचे चुकारे देणे बाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

जिल्ह्यात तुरीच्या खरेदीसाठी ११ केंद्रे सुरू करण्यात आली होती. या केंद्रांवरून खरेदी करण्यात आलेल्या एकूण तुरीपैकी जवळपास निम्म्या तुरीचे चुकारे शेतकऱ्यांना मिळणे बाकी आहे. तुरीच्या खरेदीसाठी ५ हजार ३७७ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. यांपैकी ५ हजार ३७५ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खरेदीचे एसएमएस पाठविण्यात आले. त्यापैकी २७२६ शेतकऱ्यांकडील २० हजार ७९३ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. त्यांपैकी १५३० शेतकऱ्यांकडील ११५२७ क्विंटल ४० किलो तुरीचे ६ कोटी ६८ लाख ५८ हजार ९२० रुपयाचे चुकारे शेतकऱ्यांना देण्यात आले. उर्वरित तूरीचे चुकारे देणे बाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com