Agriculture news in Marathi A gram was harvested in Jalgaon | Page 4 ||| Agrowon

जळगावात हरभरा आला कापणीला

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 जानेवारी 2021

जिल्ह्यात रब्बीची पेरणी २०० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रात झाली आहे. बाजरीची पेरणी अलीकडेच पूर्ण झाली आहे. यातच वेळेत किंवा ऑक्टोबरमध्ये पेरणी केलेले हरभरा पीक पक्व होत आहे. त्याची कापणी, मळणीची प्रक्रिया पुढील आठवड्यात अनेक भागांत सुरू होईल, अशी स्थिती आहे.

जळगाव ः जिल्ह्यात रब्बीची पेरणी २०० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रात झाली आहे. बाजरीची पेरणी अलीकडेच पूर्ण झाली आहे. यातच वेळेत किंवा ऑक्टोबरमध्ये पेरणी केलेले हरभरा पीक पक्व होत आहे. त्याची कापणी, मळणीची प्रक्रिया पुढील आठवड्यात अनेक भागांत सुरू होईल, अशी स्थिती आहे.

जिल्ह्यात रब्बी पिकांमध्ये हरभऱ्याची पेरणी अधिक झाली आहे. सुमारे ८५ हजार हेक्टरवर हरभरा पीक आहे. पेरणी यंदा अतिपावसाने अनेक भागांत रखडली होती. तर काही शेतकऱ्यांनी मूग, उडदाचे क्षेत्र रिकामे झाल्यानंतर लागलीच पूर्वमशागत करून काळ्या कसदार जमिनीत कोरडवाहू हरभरा वाणांची पेरणी उरकली होती. ऑक्टोबरच्या मध्यानंतर पेरणी केलेल्या हरभरा पिकात दाणे पक्व होत आले आहेत.

थंडी कमी आहे. उष्णता वाढत आहे. कमाल तापमानात वाढ नोंदविली गेली आहे. तसेच किमान तापमानही १५ अंश सेल्सिअसपर्यंत आहे. तापमानवाढ झाल्याने पिकातील ओलावा स्थिती झपाट्याने कमी होत असतानाच पीक पक्व होण्याची प्रक्रिया या महिन्यात वेगात सुरू झाली. दाणे पक्व होऊन पीक पिवळे पडत आहे. काही भागांत शेतकरी कापणी व मळणीची तयारी करीत आहेत. यावल, चोपडा, जळगाव, रावेर या तालुक्यांतील तापी, गिरणा नदीकाठच्या भागात काळी कसदार जमीन आहे.

या भागात कोरडवाहू हरभरा अधिक होता. त्याची कापणी पुढील आठवड्यात सुरू होईल. कापणी मजुरांच्या मदतीने करून घ्यावी लागते. मजुरीचे दरही विविध गावांमध्ये निश्‍चित केले जात आहेत. कापणीनंतर एक किंवा दोन दिवस हरभरा जागेवरच पडू दिला जातो. तो वाळल्यानंतर एका ठिकाणी गोळा करण्याची प्रक्रिया सुरू होते. यात मजुरी अधिक लागते. यंदा पिकाची स्थिती कमी थंडी, प्रतिकूल वातावरणामुळे हवी तशी नाही. यामुळे उत्पादन किंवा उत्पादकता कशी असेल, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे.


इतर ताज्या घडामोडी
पूर्वमोसमी पावसामुळे कडबा मातीमोलविसापूर, जि. सातारा : उत्तर खटावमधील रब्बीचा...
वादळी नुकसानीची उपमुख्यमंत्र्यांकडून...पंढरपूर तालुक्यातील बार्डी आणि करकंबच्या पूर्व...
सांगलीत पाऊस, गारपीट फळबागांचे मोठे...सांगली : जिल्ह्याच्या विविध भागात वादळी वारे,...
अमरावती जिल्ह्यात सिंचन प्रकल्पांच्या...अमरावती : जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची प्रलंबित...
सोलापूर : वादळी पाऊस पाठ सोडेनासोलापूर : गेल्या तीन-चार दिवसांपासून सातत्याने...
पन्नास वर्षांपासून आदिवासी पाडे...साल्हेर, जि. नाशिक ः बागलाण तालुक्यातील पश्चिम...
विद्यापीठनिर्मित जैविक उत्‍पादने...परभणी :  जमिनीत अनेक प्रकारच्‍या बुरशी असतात...
नगर जिल्ह्यात सातपटीने वाढल्या फळबागा नगर : नगर जिल्ह्यात यंदा १२ हजार ८६५...
पावसानंतरचे द्राक्ष बाग व्यवस्थापनगेल्या काही दिवसांपासून बऱ्याच ठिकाणी विजांच्या...
लवंगी, बेडगी, लाल मिरचीला नगरच्या...नगर ः नगर येथील बाजार समितीत गेल्या दोन ते अडीच...
कापूस बियाणे दरवाढीचा शेतकरी...जळगाव ः खानदेशात कापूस पीक प्रमुख आहे. पण या...
पोटनिवडणुकीत ३५ गावांच्या पाण्याचा...सोलापूर ः पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा...
बेदाणा हंगाम बाकी; परराज्यातील कामगार...सांगली ः देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
गैरव्यवहाराच्या आरोपावरून निरी...नागपूर : राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन...
नाशिक : मोकळ्या मैदानावर भाजीपाला...नाशिक : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
अवकाळीमुळे रत्नागिरीतील आंबा उत्पादक...रत्नागिरी : हवामान विभागाच्या अंदाजानुसार...
काबुली हरभऱ्याच्या दरात किंचित सुधारणाजळगाव : खानदेशात काबुली हरभरा दर यंदा टिकून आहेत...
सिंचन वाढविण्यासाठी ‘मिशन’मोडवर काम कराअमरावती : सिंचन प्रकल्पाचा लाभ शेतकरी बांधवांना...
प्रयत्नांची पराकाष्ठा करणे...बुलडाणा : कोणत्याही परिस्थितीत धीर न सोडता...
नांदेड विभागात गाळप हंगाम अंतिम टप्प्यातनांदेड : नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर)...