शेतकरी सन्मान निधी योजनेच्या दोन वर्षपूर्तीच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या
बातम्या
जळगावात हरभरा आला कापणीला
जिल्ह्यात रब्बीची पेरणी २०० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रात झाली आहे. बाजरीची पेरणी अलीकडेच पूर्ण झाली आहे. यातच वेळेत किंवा ऑक्टोबरमध्ये पेरणी केलेले हरभरा पीक पक्व होत आहे. त्याची कापणी, मळणीची प्रक्रिया पुढील आठवड्यात अनेक भागांत सुरू होईल, अशी स्थिती आहे.
जळगाव ः जिल्ह्यात रब्बीची पेरणी २०० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रात झाली आहे. बाजरीची पेरणी अलीकडेच पूर्ण झाली आहे. यातच वेळेत किंवा ऑक्टोबरमध्ये पेरणी केलेले हरभरा पीक पक्व होत आहे. त्याची कापणी, मळणीची प्रक्रिया पुढील आठवड्यात अनेक भागांत सुरू होईल, अशी स्थिती आहे.
जिल्ह्यात रब्बी पिकांमध्ये हरभऱ्याची पेरणी अधिक झाली आहे. सुमारे ८५ हजार हेक्टरवर हरभरा पीक आहे. पेरणी यंदा अतिपावसाने अनेक भागांत रखडली होती. तर काही शेतकऱ्यांनी मूग, उडदाचे क्षेत्र रिकामे झाल्यानंतर लागलीच पूर्वमशागत करून काळ्या कसदार जमिनीत कोरडवाहू हरभरा वाणांची पेरणी उरकली होती. ऑक्टोबरच्या मध्यानंतर पेरणी केलेल्या हरभरा पिकात दाणे पक्व होत आले आहेत.
थंडी कमी आहे. उष्णता वाढत आहे. कमाल तापमानात वाढ नोंदविली गेली आहे. तसेच किमान तापमानही १५ अंश सेल्सिअसपर्यंत आहे. तापमानवाढ झाल्याने पिकातील ओलावा स्थिती झपाट्याने कमी होत असतानाच पीक पक्व होण्याची प्रक्रिया या महिन्यात वेगात सुरू झाली. दाणे पक्व होऊन पीक पिवळे पडत आहे. काही भागांत शेतकरी कापणी व मळणीची तयारी करीत आहेत. यावल, चोपडा, जळगाव, रावेर या तालुक्यांतील तापी, गिरणा नदीकाठच्या भागात काळी कसदार जमीन आहे.
या भागात कोरडवाहू हरभरा अधिक होता. त्याची कापणी पुढील आठवड्यात सुरू होईल. कापणी मजुरांच्या मदतीने करून घ्यावी लागते. मजुरीचे दरही विविध गावांमध्ये निश्चित केले जात आहेत. कापणीनंतर एक किंवा दोन दिवस हरभरा जागेवरच पडू दिला जातो. तो वाळल्यानंतर एका ठिकाणी गोळा करण्याची प्रक्रिया सुरू होते. यात मजुरी अधिक लागते. यंदा पिकाची स्थिती कमी थंडी, प्रतिकूल वातावरणामुळे हवी तशी नाही. यामुळे उत्पादन किंवा उत्पादकता कशी असेल, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे.
- 1 of 1536
- ››