वऱ्हाडात हरभऱ्याच्या लागवडीला आला वेग

अकोला ः रब्बी हंगामासाठी पोषक परिस्‍थिती आहे. त्यामुळे यंदा सरासरीपेक्षा अधिक लागवड होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हरभऱ्याची वऱ्हाडात सुमारे एक लाख ४० हजार हेक्टरवर पेरणी झाली. तर गव्हाची सुमारे २० हजार हेक्टरपर्यंत लागवड झाली आहे.
Of grammar at the wharad Accelerated planting
Of grammar at the wharad Accelerated planting

अकोला ः रब्बी हंगामासाठी पोषक परिस्‍थिती आहे. त्यामुळे यंदा सरासरीपेक्षा अधिक लागवड होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हरभऱ्याची वऱ्हाडात सुमारे एक लाख ४० हजार हेक्टरवर पेरणी झाली. तर गव्हाची सुमारे २० हजार हेक्टरपर्यंत लागवड झाली आहे.

वऱ्हाडात प्रामुख्याने रब्बी हंगामात हरभऱ्याची लागवड अधिक केली जाते. कमी व्यवस्थापनात हे हमखास पीक येत असल्याने दरवर्षी शेतकऱ्यांचा त्याकडे कल वाढत आहे. यंदा या भागातील सर्वच प्रकल्प तुडुंब आहेत. शिवाय ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस झाला. त्यामुळे जमिनीतील ओल रब्बी लागवडीसाठी फायदेशीर ठरली आहे. विहिरींची पातळीसुद्धा या वर्षी बऱ्यापैकी वाढलेली आहे. 

खरिपातील सोयाबीनची काढणी पूर्ण झाली. त्यामुळे हे शेतकरी रब्बीच्या तयारीला लागले आहेत. परंतु यंदाच्या हंगामात खताचे दर अव्वाच्या सव्वा वाढल्याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. शिवाय, सिंचनासाठी पुरेशी वीजही मिळत नाही. आठवड्यातील चार दिवस शेतकऱ्यांना संपूर्ण रात्र जागून सिंचनाला वेळ द्यावा लागतो आहे.

कृषी विभागाच्या माहितीनुसार, बुलडाणा जिल्ह्याचे हरभरा पिकाखालील सरासरी क्षेत्र १ लाख १६ हजार २२७ हेक्टर आहे. यापैकी आतापर्यंत ७०८३१ (६१ टक्के) हेक्टरवर पेरणी झाली. अकोल्याचे सरासरी क्षेत्र ९० हजार हेक्टर, तर पेरणी ३१९३७ हेक्टरवर झाली. वाशीम जिल्ह्यात ५४९३७ हेक्टर सरासरीच्या तुलनेत ३६२७० हेक्टरवर म्हणजेच ६६ टक्के पेरणी झाली. गव्हाच्या लागवडीचा वेग फारसा वाढलेला नाही. बुलडाणा जिल्ह्यात ६५०४ (१७ टक्के) हेक्टरवर पेरणी झाली. 

मक्याची लागवड जेमतेम 

रब्बी हंगामात बुलडाणा जिल्ह्यात मक्याची विदर्भात सर्वाधिक लागवड होत असते. सुमारे १० हजार हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. या जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १३०० हेक्टरवर लागवड झाली आहे. ही लागवड डिसेंबरमध्ये पूर्ण होईल, असा अंदाज आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com