agriculture news in marathi, grampanchayat election, solapur, maharashtra | Agrowon

सोलापूर जिल्ह्यातील ६६२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची तयारी
टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 एप्रिल 2019

सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच आता राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. ऑक्‍टोबर २०१९ ते डिसेंबर २०२० कालावधीत जिल्ह्यातील ६६२ ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने आतापासूनच तयारीला सुरवात केली आहे. या गावांची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मागितली आहे. 

सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच आता राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. ऑक्‍टोबर २०१९ ते डिसेंबर २०२० कालावधीत जिल्ह्यातील ६६२ ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने आतापासूनच तयारीला सुरवात केली आहे. या गावांची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मागितली आहे. 

जनतेतून सरपंच निवडण्याचा निर्णय झाल्यानंतर जिल्ह्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आवश्‍यक असलेली प्रभागरचना करून ठेवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने माहिती मागविण्यात आली आहे. गावांची लोकसंख्या, मुदत पूर्ण होत असलेला कालावधी यासह इतर माहिती मागविण्यात आली आहे. जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक ग्रामपंचायती या निवडणुकीला सामोरे जात असल्याने जिल्हा प्रशासनाच्या वतीनेही या निवडणुकांची चोख तयारी करण्यात येत आहे. 

मोठ्या ग्रामपंचायतींचा समावेश 
सोलापूर जिल्ह्यातील अकलूज, नातेपुते, महाळुंग, वैराग, वडाळा, बोरामणी, अनगर, मोडनिंब, करकंब, भोसे, नागणसूर, नान्नज, कुर्डू, भाळवणी, कासेगाव, कडलास, कोळा, शेटफळ, आष्टी, कुरूल, पेनूर, मांडवे, फोंडशिरस, वागदरी, महूद या मोठ्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. अनगरचे सरपंचपद सर्वसाधारण, अकलूज सर्वसाधारण महिला, नातेपुते ओबीसी, वैराग अनुसूचित जाती महिला आणि मोडनिंब येथील सरपंचपद सर्वसाधारण आहे. या मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये प्रथमच जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्याने यासह इतर मोठ्या गावांमध्ये चुरस बघायला मिळणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख...सोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११...
सोलापुरात यंदाही खरीप कोरडाचसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला....
नाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा...नाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या...
नाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर...नाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव,...
परभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील...परभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी...
टंचाईस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती सादर...हिंगोली : टंचाईस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत...
जालना जिल्ह्यात दुधाचे पैसे दोन...जालना : जिल्ह्यातील जामवाडी, गणेशपूर, नळणी, येवता...
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली...औरंगाबाद  : मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर...
सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीपसांगली ः जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये झालेल्या...
कंडारी पाणी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी...जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम...
शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित...नागपूर ः विकासाच्या संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व...
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती...सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर...
कापसाच्या हमीभावात ५०० रुपयांनी वाढ...अमरावती   ः राज्याची कमी असलेली कापूस...
दमदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्व...पुणे  ः जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर,...
नगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही...नगर  ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर...
पावसाअभावी धुळे, जळगाव जिल्ह्यांत...जळगाव  ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार...
नागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ...नागपूर  ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत...मुंबई  : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री...
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...