agriculture news in Marathi, Grampanchayat got separate agri ward , Maharashtra | Page 2 ||| Agrowon

ग्रामपंचायतींना मिळाला कृषी कक्ष

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

राज्यात गावपातळीवर तलाठी व ग्रामसेवकांना कार्यालये आहेत. मात्र, कृषी विभागात सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या कृषी सहायकांना झाडाखाली किंवा लोकांच्या घरात बसून कामे करावी लागत होती. आता त्याला ग्रामपंचायतीत हक्काची जागा मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनादेखील सरकारी योजना आणि कृषी सल्ला तातडीने मिळू शकेल.
- कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे

पुणे : राज्यातील साडेअकरा हजार कृषी सहायकांना अखेर हक्काची जागा मिळणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ‘कृषी कक्ष’ उपलब्ध करून देण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. 

कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी कामकाजाची सूत्रे स्वीकारताच सर्वप्रथम कृषी सहायकांची समस्या सोडविण्याचा निर्धार केला होता. “प्रत्येक ग्रामपंचायतीत कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यासाठी कक्ष असावा. तेथे कृषी सहायकांना टेबल, खुर्ची, कपाट असे कार्यालयीन साहित्य मिळावे,” अशी सूचना डॉ. बोंडे यांनी मांडली होती.  

कृषी सहायकांना यामुळे हक्काची जागा मिळाली असून या कक्षात फलक लावला जाणार आहे. त्यावर कृषी कर्मचाऱ्याचे नाव, मोबाईल क्रमांक, कामाचे दिवस आणि वेळ देखील नमूद केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही. कृषी सहायकांना मिळालेली ही एकप्रकारची दिवाळी भेट आहे, अशी माहिती आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली. 

राज्यातील जिल्हा परिषदांच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामंपचायतींमध्ये किमान १५० ते २०० चौरस फुटाची जागा कृषी विभागाला तात्काळ देण्यासाठी संबंधित जिल्हा परिषदांकडून पाठपुरावा केला जाणार आहे. 

ग्रामपंचायतींमध्ये जागा मिळताच तेथे कक्ष उभारणीसाठी साहित्य उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कृषी सचिव एकनाथ डवले यांनी कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्याकडे सोपविली आहे. सर्व जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कृषी आयुक्तांच्या नियंत्रणाखाली या उपक्रमाचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  

 “गावपातळीवर कृषी सहायकांना जागा मिळताच फर्निचरची व्यवस्था आयुक्तांनी करावी. कृषी सहायकांचे वेळापत्रक तयार करून ग्रामपंचायतीमध्ये लावावे. हेच वेळापत्रक जिल्हा प्रशासनाच्या वेबसाईटवरदेखील प्रदर्शित करावे,” असेही आदेश शासनाने दिले आहेत.


इतर अॅग्रो विशेष
सांगलीत तूर खरेदी ठप्पसांगली ः जिल्ह्यात हेक्टरी २५७ किलोच तूर खरेदी...
राज्यात गारठा वाढलापुणे  : उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह...
चीनला द्राक्ष निर्यात सुरूसांगली ः जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेल्या...
‘लिंकिंग’बाबत कंपन्यांना नोटिसापुणे  : रासायनिक खतांच्या बाजारपेठेत होत...
बाजार समित्यांच्या निवडणुका होणार...मुंबई  ः राज्यातील कृषी उत्पन्न बाजार...
भाजीपाला शेतीतून पेलल्या साऱ्या...लग्नानंतर अवघ्या तीन वर्षातच पतीच्या निधनामुळे...
कांद्यावरील निर्यातबंदी हटविली;...नवी दिल्ली : चार महिन्यापूर्वी कांद्यावर...
सूक्ष्म सिंचन योजनेचा सात वर्षानंतर...अकोला ः सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना...
कोल्हापुरातील गूळ हंगाम अंतिम टप्प्यातकोल्हापूर : यंदाचा गूळ हंगाम अंतिम टप्प्यात येत...
पाणीवापराचे तंत्र समजून निर्यातक्षम...सिंचन व्यवस्थापन हा प्रयोगशील व प्रगतिशील शेतीतील...
सकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमानातील वाढीबरोबरच किमान...
थेट सरपंच निवड रद्दमुंबई: थेट सरपंच निवड रद्द करणारे विधेयक मंगळवारी...
निर्यात न करणाऱ्या कारखान्यांच्या साखर...कोल्हापूर : देशातील ज्या साखर कारखान्यांनी...
कर्जमाफीची पहिली यादी जाहीर; ६८...मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री...
राज्यात उन्हाचा चटका कायम पुणे : राज्याच्या हवामानात वेगाने बदल होत आहेत....
‘पीएम-किसान’ योजनेत शेतकऱ्यांना ५१ हजार...नवी दिल्ली: केंद्र सरकारने गेल्या वर्षी पंतप्रधान...
शेतकरी कर्जमाफीवरून विरोधकांचा गदारोळ मुंबई: शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारने एकही आश्वासन...
खारपाणपट्ट्यात पिकले गोड अॅपेल बोरअंधेरा कितना भी घना क्यू ना हो, दिया जलाना कहाँ...
कृषी शिक्षणाचा खर्चही आता लाखाबाहेर पुणे : राज्यातील खासगी कृषी शिक्षण संस्थांच्या...
निवृत्त जवानाचा अनुकरणीय शेळी-...सुर्डी (जि. सोलापूर) येथी हिरोजीराव शेळके यांना...