agriculture news in marathi, grampanchayats are allowed to construct an independent building, mumbai, maharashtra | Agrowon

राज्यातील १२१ ग्रामपंचायतींना स्वतंत्र इमारत बांधण्यास मंजुरी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 29 सप्टेंबर 2018

मुंबई  : बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत राज्यातील आणखी १२१ ग्रामपंचायतींना कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत बांधण्यास ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली. याचा शासन निर्णयही जारी झाला आहे. प्रत्येकी १२ लाख रुपयांच्या निधीतून या इमारती उभारण्यात येणार आहेत.

मुंबई  : बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत राज्यातील आणखी १२१ ग्रामपंचायतींना कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत बांधण्यास ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली. याचा शासन निर्णयही जारी झाला आहे. प्रत्येकी १२ लाख रुपयांच्या निधीतून या इमारती उभारण्यात येणार आहेत.

बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेच्या सुधारित शासन निर्णयानुसार इमारत नसलेल्या राज्यातील सर्वच ग्रामपंचायतींना स्वतंत्र इमारत मिळणार आहे. या अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयासाठी शासनाकडून १५ लाख रुपये मिळणार असून २०१८-१९ या वर्षासाठी ५५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील एक हजारापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ज्या गावांमध्ये ग्रामपंचायतींना कार्यालयासाठी इमारत नाही, अशा ग्रामपंचायतींचा स्वतंत्र इमारत बांधण्यासाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणीयोजनेंतर्गत समावेश करण्यात आला आहे.

या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात ३०२, दुसऱ्या टप्प्यात ५४ तर आता तिसऱ्या टप्प्यात १२१ ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे. योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात बीड जिल्ह्यातील ६४, दुसऱ्या टप्प्यात २१ तर आता तिसऱ्या टप्प्यात ९ ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आला आहे. आता परळी तालुक्यातील परचुंडी, धारूर तालुक्यातील वरकटवाडी, पांगरी केज तालुक्यात पळसखेडा, काशीदवाडी अंबाजोगाई तालुक्यातील धावडी, माजलगांव तालुक्यात ढोरगांव, ब्रह्मगांव या ग्रामपंचायतींना नवीन इमारतीसाठी मंजुरी देण्यात आली आहे.

ग्रामविकास विभागाने त्यासोबतच राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या प्रशस्त आणि आधुनिक अशा ८० इमारतींना मंजुरी देऊन वेळेत निधी वितरीत केला. या इमारतींची बांधकामे सध्या अंतिम टप्प्यात आहेत.  २०१४-१५ या वर्षी ३ इमारतींना ५.४८ कोटी, २०१५-१६ मध्ये २४ इमारतींना ६३.५९ कोटी, २०१६-१७ मध्ये २५ इमारतींना ६५.२० कोटी तर २०१७-१८ मध्ये २८ इमारतींना ४० कोटी अशा एकूण ८० इमारतींना १७५ कोटींचा निधी दिला आहे.

इतर ताज्या घडामोडी
वाशीम जिल्ह्यात रब्बीत होणार एक लाख...वाशीम : जिल्ह्यात या रब्बी हंगामासाठी एक लाख...
खानदेशातील बाजारांमध्ये ज्वारीची आवक...जळगाव : अतिपावसामुळे खानदेशात ज्वारीचे आतोनात...
कापूस वेचणीला परप्रांतीय मजुरांचा आधारअकोला : अकोट तालुक्यातील ग्राम तरोडा व परिसरात...
अमरावती जिल्ह्यात २४५० कोटींचे नुकसानअमरावती : मॉन्सुनोत्तर पावसामुळे जिल्ह्यात तीन...
नाशिक जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्टरवर...नाशिक : ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे जिल्ह्यातील...
 बारामती उपविभागात ४३ हजार हेक्टरवरील...पुणे ः मॉन्सूनोत्तर पावसाने बारामती...
मराठवाड्यात ४१ लाख ४९ हजार हेक्टरवरील...औरंगाबाद  : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील ४१...
पुणे बाजार समितीत ‘आंबेमोहर’च्या दरात...पुणे  ः आंबेमोहर तांदळासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी...सोलापूर  ः कोरड्या आणि ओल्या दुष्काळामुळे...
नगर : रब्बी ज्वारीचा १ लाख ९१ हजार...नगर  ः मॉन्सूनोत्तर पाऊस जोरात झाला असला तरी...
सातारा जिल्ह्यात रब्बीची १३ टक्के...सातारा  : जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्याने...
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत...अर्धापूर, जि. नांदेड  : शेतकऱ्यांच्या...
शिवसेनेची गुरुवारी तुरंबे येथे ऊस परिषदकोल्हापूर  : येत्या गळीत हंगामासाठी ऊस दर...
आंदोलनाचा दणका; केळी पीकविमा...अकोला  ः २०१८-१९ या वर्षात केळी उत्पादक...
ऊस दराबाबत आज कोल्हापुरात बैठककोल्हापूर : यंदाच्या ऊस दरावर सकारात्मक तोडगा...
शिवसेनाप्रमुखांचा आज स्मृतिदिनमुंबई  : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा...
पीकविम्यासाठी पुण्यात चौथ्या दिवशीही ...पुणे  ः गेल्या वर्षीचा खरीप पीकविमा न...
औरंगाबादमध्ये कोबी १००० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
ढगातील हिमकणांच्या निर्मितीची प्रक्रिया...एकत्रित प्रकारच्या ढगांमध्ये हवेच्या उभ्या...
किमान तापमानात घसरण, थंडीला सुरुवातमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा...