Agriculture news in marathi; Gramsevak union delegation meets CM | Agrowon

ग्रामसेवक संघटनेच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

टीम अॅग्रोवन
शनिवार, 27 जुलै 2019

अकोला ः राज्यातील ग्रामसेवक संवर्गाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सचिवस्तरीय पाठपुराव्याला यश येत नसल्याने ग्रामसेवक संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांची भेट घेत चर्चा केली. 

अकोला ः राज्यातील ग्रामसेवक संवर्गाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सचिवस्तरीय पाठपुराव्याला यश येत नसल्याने ग्रामसेवक संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांची भेट घेत चर्चा केली. 

संघटनेचे राज्य अध्यक्ष एकनाथराव ढाकणे यांच्या नेतृत्वात राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे, कोशाध्यक्ष  संजीव निकम, जळगाव जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस प्रशांत तायडे, वर्धा जिल्हाध्यक्ष हेमंत भोमले, सरचिटणीस प्रवीण खोंडे, विवेक धवड, हितेश  ईमाने उपस्थित होते. सह्याद्री अतिथिगृहावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्यांशी पाचव्या वेतन आयोगातील तरतुदीप्रमाणे सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगातील तरतुदी नुसार ग्रामसेवक संवर्गावर शिक्षक, तलाठी, कृषी सहाय्यक यांच्या तुलनेत कसा अन्याय झाला ही बाब सविस्तरपणे मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आली.

ग्रामसेवकांच्या विविध अडचणी असून आजवर झालेल्या बैठकांमध्ये ठोस तोडगा निघालेला नाही. सरपंच परिषदेप्रमाणे ग्रामसेवक परिषदेचे आयोजन लवकरच करण्याचे व प्रलंबित प्रश्नी त्यांच्या समक्ष वित्त विभाग व ग्रामविकास विभागाची संयुक्त बैठक संघटना प्रतिनिधींसमवेत घेण्याचे, प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याने ग्रामसेवकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मत सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी व्यक्त केले.


इतर बातम्या
राज्यासह देशात शिवजयंती उत्साहात साजरीपुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी...
शेतकरीभिमुख संशोधनावर भर : कुलगुरू डॉ....अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
नगर जिल्ह्यामध्ये कमी पाण्यावरील फळझाडे...नगर : पाच वर्षांपासून दुष्काळाशी सामना करताना...
लेखी आश्वासनानंतर बाजार समिती...नाशिक : शासनाने जाहीर केलेला महाभाई भत्ता मिळावा...
लातूर विभागात सूक्ष्म सिंचनातील ११...नांदेड : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत यंदा...
खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यातजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे....
सातारा : अधिकृत विक्रेत्यांकडून...सातारा : बाजार समितीच्या आवारातील...
ग्रामीण पर्यटन विकासाचा ‘शिवनेरी...पुणे ः गड किल्ल्यांच्या पर्यटनाच्या माध्यमातून...
हवामानबदलाशी लढण्यासाठी एक हजार कोटी...पुणे ः जागतिक हवामानबदलाची समस्या संपूर्ण जगासमोर...
‘एफएसएसएआय’च्या नव्या ‘सीईओ’विषयी...पुणे: भारतीय अन्न सुरक्षितता व मानके...
राज्यात उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याने...
कापसाचे ६४७ कोटींचे चुकारे थकीतअमरावती ः बाजारात दर कोसळल्याने महाराष्ट्र राज्य...
‘म्हैसाळ’मधून पाणी सोडण्याच्या हालचालीसांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी...
पीकविमा र‍कमेसाठी शेतकऱ्यांचा रास्ता...अमरावती  ः पीकविम्याची रक्‍कम कर्ज खात्यात...
‘पणन’ची कापूस खरेदी उच्चांकी दिशेनेऔरंगाबाद : महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन...
शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीत ८५ स्वराज्यरथ...पुणे : ‘‘पुण्यात शिवजयंती महोत्सव समितीतर्फे आज...
बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांत दहशतअमरावती  ः गावशिवारात एकाच आठवड्यात दोनदा...
पिंपळनेरला कांदा मार्केट दोन मार्चला...पिंपळनेर, जि. धुळे : शेतीमाल विक्रीनंतर...
महिला बचत गट आर्थिक प्रगतीचा मार्ग ः...सोलापूर  ः  महिला बचतगट हे ग्रामीण...
जळगाव जिल्ह्यात रब्बीचा पेरा १७१ टक्केजळगाव  ः रब्बी हंगामातील उत्पादनाची...