Agriculture news in Marathi, Gramsevaks have no work but no salary | Agrowon

ग्रामसेवकांना काम नाही तर वेतनही नाही
टीम अॅग्रोवन
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

पुणे ः ग्रामसेवकांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनाला आठ दिवस झाले. अद्याप या आंदोलनावर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प असून, ग्रामस्थांनी अनेक कामे रखडली आहेत. दरम्यान, राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडून ग्रामसेवकांना काम नाही, तर वेतनही नाही (नो वर्क, नो पेमेंट) अशी नोटीस बजावण्यात आली आहे. परंतु, जिल्ह्यात कोणीही ग्रामसेवक कामावर हजर झाले नाही.

पुणे ः ग्रामसेवकांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनाला आठ दिवस झाले. अद्याप या आंदोलनावर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प असून, ग्रामस्थांनी अनेक कामे रखडली आहेत. दरम्यान, राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडून ग्रामसेवकांना काम नाही, तर वेतनही नाही (नो वर्क, नो पेमेंट) अशी नोटीस बजावण्यात आली आहे. परंतु, जिल्ह्यात कोणीही ग्रामसेवक कामावर हजर झाले नाही.

राज्यातील ग्रामसेवकांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर या मागण्या मान्य करून घेण्यासाठी ग्रामसेवक संघटना आक्रमक झाली आहे. शुक्रवारपासून (ता. २३) असहकार आंदोलनानंतर आता पूर्णपणे काम बंद आंदोलन पुकारले आहे. अनेक ग्रामसेवकांनी त्यांचे सही शिक्‍के आणि महत्त्वाचे प्रशासकीय साहित्य गटविकास अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची प्रशासकीय कामे बंद झाली आहेत. शनिवार आणि रविवार दोन दिवस सुटी आल्यामुळे ग्रामस्थांना अडचणी आल्या नाही. सोमवारी संप मिटेल आणि प्रशासकीय कामे सुरू होतील, अशी अपेक्षा होती. परंतु, अद्यापही संपावर तोडगा निघालेला नाही.

दरम्यान, मागील आठवड्यापासून ग्रामपंचायतींमध्ये संग्राम कक्ष चालवणाऱ्या संगणक ऑपरेटर यांनी देखील बेमुदत संप पुकारल्याने दाखले देण्याचे काम बंद आहे. या संगणक ऑपरेटर यांच्या मागण्यांवर अद्याप निर्णय झालेला नाही.

राज्य शासनाच्या आदेशानुसार ग्रामसेवकांना काम नाही तर वेतनही नाही, ही नोटीस देण्यात आली. पर्यायी व्यवस्था म्हणून, जिल्ह्यात नियुक्‍तीस असणारे कंत्राटी ग्रामसेवक यांच्याकडे ग्रामपंचायतींचा कारभार देण्याच्या सूचना पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
- संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

इतर बातम्या
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन यंदा ७०...नगर  ः जिल्ह्यात यंदा उडदाची उत्पादकता...
पीक उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न...पुणे  ः  कृषी विद्यापीठांकडून शेतकरी...
महाबळेश्वरात स्ट्रॉबेरी लागवडीस वेगसातारा  ः जिल्ह्यातील महाबळेश्वर, जावळी, वाई...
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार ः...मुंबई : आगामी पाच वर्षांत महाराष्ट्र दुष्काळमुक्त...
आम्ही सत्तेत आल्यास चार महिन्यांत...वणी, जि. यवतमाळ  ः शेतकऱ्यांना कर्जमाफी...
संत्र्याच्या आंबिया बहराला गळती; भाव...अकोला : संत्र्याच्या आंबिया बहाराला गळती...
वाशीम : मानवी साखळीतून साकारले निवडणूक...वाशीम : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवा...
नंदुरबार जिल्ह्यात पीक काढणी वेगातनंदुरबार  : जिल्ह्यात खरिपाच्या हंगामातील...
राज्यात साडेचार हजार सावकार अनधिकृतपुणे : शेतकरी आत्महत्येच्या समस्येवर प्रभावी उपाय...
सोयाबीन सुडी पेटविण्याच्या घटनांमध्ये...बुलडाणा  ः वैयक्तिक मतभेद, आपापसातील वाद आदी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः परतीचा मॉन्सून देशातून परतल्यानंतर...
चौथीच्या अभ्यासक्रमातून शिवरायांचा...मुंबई : महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण...
दुधाचे थकीत अनुदान देण्याच्या हालचालीपुणे: राज्यातील डेअरी उद्योगांचे अडकलेले...
अमरावती विभागात सोयाबीन उत्पादकता घटलीअमरावती  ः गेल्या काही वर्षांत कापसाला...
बिगर नोंदणीकृत उत्पादनासाठी हवा कायदा...सध्या खते, कीटकनाशके उत्पादन व विक्रीसाठी दोन...
आपल्या मताची किंमत दाखवून देण्याची वेळ...शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि निवडणूक या विषयांचा...
भिवापूर येथे सोयाबीन खरेदीला सुरवातभिवापूर, नागपूर  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘महाॲग्री ते महाॲग्रीटेक’ एक स्वप्नरंजन राज्यात शेतकऱ्यांची सर्व कामे ऑनलाईन होतील असे एक...
महायुतीत आमची अवस्था इकडे आड तिकडे...नाशिक  : ‘‘महायुतीच्या जागावाटपात नाराज असलो...
निवडणुकीत शेतकरी प्रश्न शोधावे लागतात...निवडणुकांतून शेतकरी सोडून सारे राजकीय घटक...