agriculture news in marathi Gramsevaks opposes todays Gramsabhas | Page 3 ||| Agrowon

आजच्या ग्रामसभांना ग्रामसेवकांचा विरोध 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 2 ऑक्टोबर 2021

राज्याच्या ग्रामविकास विभागाने आज (ता. २) ग्रामपंचायतींना ऑफलाइन किंवा ऑनलाइन पद्धतीने ग्रामसभा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र सरकारच्या या निर्णयाला महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेने विरोध केला आहे. 

नगर : राज्याच्या ग्रामविकास विभागाने आज (ता. २) ग्रामपंचायतींना ऑफलाइन किंवा ऑनलाइन पद्धतीने ग्रामसभा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र सरकारच्या या निर्णयाला महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेने विरोध केला आहे. 

राष्ट्रीय सण १५ ऑगस्ट, २ ऑक्टोबर, १ मे या दिवशी ग्रामसभा नको, असे धोरण निश्‍चित झालेले असताना ग्रामविकास विभागाने हे परिपत्रक काढणे, ही विसंगती आहे. ग्रामसभा आयोजनाचे परिपत्रक रद्द करण्याची मागणी संघटनेने केली आहे. याबाबत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना पाठविलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे, की ग्रामसभा घेण्याबाबत धोरण निश्‍चित करण्यात आलेले असून, मे, ऑगस्ट, ऑक्टोबर महिन्यांत, तसेच २६ जानेवारीला ग्रामसभा घेण्यात याव्यात, असे स्पष्टपणे नमूद आहे. असे असताना मागील शासननिर्णय संदर्भ विचारात न घेता पुनःपुन्हा नव्याने पत्र, परिपत्रक काढले जाते. त्यामुळे या ग्रामसभा धोरणाची यशस्वी अंमलबजावणी होत नाही. 

२७ एप्रिल २०१८च्या धोरणाची अंमलबजावणी करून २ ऑक्टोबरच्या ग्रामसभेचे पत्रक रद्द करावे. संपूर्ण राज्यामध्ये कुठेही २ ऑक्टोबरला ग्रामसभा होणार नाहीत. नगर जिल्ह्यात सुद्धा २ ऑक्टोबरला ग्रामसभा न होता संपूर्ण ऑक्टोबर महिन्यामध्ये आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये रीतसर ग्रामसभांचे आयोजन करण्यात येईल. त्यामध्ये सर्व विषयसूचीनुसार अंमलबजावणी करण्यात येईल. तरी ग्रामसेवकांना कोणीही सक्ती करू नये, अशी भूमिका ग्रामसेवक संघटनेनी मांडली आहे. 


इतर ताज्या घडामोडी
सांगलीत दोन महिन्यांत डीएपीचा रॅक आलाच...सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामाची पेरणी ५२...
जिल्हा बॅंक निवडणुकीतून खासदार...सांगली ः जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या पंचवार्षिक...
सांगली मार्केट यार्डात हळद-गूळ...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
खानदेशात कापसाच्या खेडा खरेदी दरात वाढजळगाव : खानदेशात कापसाची किमान ८६०० व कमाल ९२००...
तमिळनाडूला पावसाने झोडपले..चेन्नई : तमिळनाडूत चेन्नईसह अनेक जिल्ह्यात...
एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच; सरकारकडून...मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये...
‘आत्मा’ कर्मचाऱ्यांची पगार कपातीविरोधात...नागपूर : केंद्र सरकारनेच नव्या मार्गदर्शक...
तेलंगणातून भाताचे खरेदीसाठी मुख्यमंत्री...हैदराबाद : केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात...
२०२० मध्ये व्यापाऱ्यांच्या आत्महत्या...नवी दिल्ली : गेली दोन वर्षे कोरोनाचा विळखा...
सांगलीच्या परवान्यावर कर्नाटकात परस्पर...सांगली : येथील वसंतदादा मार्केट यार्डातील संतगोळ...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच, शेतकऱ्यांच्या...सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गात गेल्या सहा-सात...
लखीमपूर खेरी हिंसाचार : माजी...नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील...
मत्स्यपालनामध्ये खाद्याचा योग्य वापर...माशांच्या वाढीसाठी सकस व प्रथिनयुक्त आहाराची गरज...
वातावरण बदलाविरुद्ध क्रांतीच्या तीन दिशाभारताच्या उत्तर भागामधील सर्वांत जास्त...
हिरवी मिरची, कोबी, शेवगा दरांत वाढपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
कंटेनर्सची टंचाई पुढील वर्षीही...पुणे : चालू वर्षीत शेतीमालासह इतर वस्तूंच्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊससिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्याच्या काही भागांत शनिवारी...
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा तीस टक्के...रत्नागिरी ः दिवाळीत पडलेल्या मुसळधार पावसामुळे...
नाशिकमध्ये अवकाळीमुळे भात पिकांचे मोठे...नाशिक : ऐन दिवाळीच्या सणाला हवामान विभागाने...
गडचिरोलीत कृषिपंपांना २४ तास वीजपुरवठा...गडचिरोली ः वीज वितरणचे वरिष्ठ अधिकारी कृषिपंपाला...