मागण्यांसाठी ग्रामसेवकांचे राज्यव्यापी धरणे आंदोलन

मागण्यांसाठी ग्रामसेवकांचे राज्यव्यापी धरणे आंदोलन
मागण्यांसाठी ग्रामसेवकांचे राज्यव्यापी धरणे आंदोलन

अकोला ः प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामसेवक संघटनेने शुक्रवारी (ता. ९) राज्यभर तालुकास्तरावर धरणे आंदोलन केले. वऱ्हाडात राज्यव्यापी आंदोलन राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे यांच्या नेतृत्वात झाले. बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा पंचायत समिती कार्यालयात महात्मा गांधी पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करून त्यास सुरवात करण्यात आली. ग्रामसेवकांच्या प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी यापूर्वी केलेल्या आंदोलनावेळी सरकारने केवळ आश्‍वासन देऊन बोळवण केल्याने शुक्रवारपासून राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्यात येत आहे, असे जामोदे यांनी सांगितले. आंदोलनांमध्ये मंगळवारी (ता. १३) जिल्हा परिषदांसमोर धरणे आंदोलन, शुक्रवारी (ता. १६) विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन, रविवारी (ता. १८) पालकमंत्र्यांना निवेदन आणि गुरुवारपासून (ता. २२) राज्यभर काम बंद आंदोलन करण्यात येईल. राज्यातील २२ हजार ग्रामसेवकांच्या प्रश्नांसाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com