बुलडाण्यात ग्रामसेवकांचे कामबंद

बुलडाण्यात ग्रामसेवकांचे कामबंद
बुलडाण्यात ग्रामसेवकांचे कामबंद

बुलडाणा : ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या प्रलंबित विविध मागण्यांची सोडवणूक न केल्याने या कर्मचाऱ्यांनी सोमवारी (ता. २५) कामबंद आंदोलन सुरू केले. येत्या १ मार्चला पंचायत समित्यांसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा करर्मचाऱ्यांतर्फे देण्यात आला .

गटविकास अधिकाऱ्यांना निलंबनाबाबत दिलेले अधिकार रद्द करा, कालबद्ध पदोन्नती प्रकरणे निकाली काढा, ग्रामसेवकांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे हिशेब मिळावेत, ग्रामसेवक-ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या वेतनातून कपात करून अपघात विम्याचा भरणा करावा, नरेगाअंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांना देयके त्यांच्या बॅंक खात्यात वर्ग करावीत, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांवर एकतर्फी कारवाई न करता शासन निर्णयानुसार सर्वांवर कारवाई करावी, ग्रामसेवकांना अतिरीक्त मेहनताना द्यावा, निलंबित ग्रामसेवकांना पुनर्स्थापित करून विभागीय चौकशी प्रकरणे निकाली काढावीत, आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरित करावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचे सरचिटणीस प्रशांत जामोदे, जिल्हाध्यक्ष विठ्ठल चव्हाण यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा सुुर केला आहे. मात्र यावर योग्य तोडगा न काढल्याने सोमवारपासून कामबंद आंदोलन छेडले असल्याची माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com