सोलापूर जिल्ह्यात मदतीचे अनुदान तहसीलदारांच्या खात्यावरच

तालुक्यात १४ कोटी रुपये प्राप्त झाले होते. त्याचे वाटप झाले आहे. मदतनिधी मिळेल, त्याप्रमाणे त्याचे वाटप करण्यात येईल. - प्रदीप शेलार, तहसीलदार, बार्शी.
The grant of aid is on account of tahsildar in Solapur district
The grant of aid is on account of tahsildar in Solapur district

सोलापूर : दोन महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाकडून सुमारे ५८ कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे आला. त्यानंतर त्या-त्या तहसीलदारांकडे या रकमाही पाठवण्यात आल्या. पण अनेक गावांत आजही या मदतीचे वाटप झालेले नाही. तहसीलदारांच्या खात्यावर ही रक्कम पडून आहे, ही वस्तुस्थिती असताना, जिल्हा प्रशासनाने मात्र वाटप पूर्ण झाल्याचा दावा करून यासंबंधीचा अहवाल शासनाला पाठवला आहे.   

पंधरा दिवसांपूर्वीच ही मदत जिल्हा प्रशासनाला मिळाली. मदतीसाठी राज्य शासनाने ५८ कोटी १५ लाख रुपयांचा पहिला हप्ता दिला. अनेक गावांत तलाठी- मंडलाधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे शेतकऱ्यांच्या याद्या पूर्णपणे तयार झालेल्या नाहीत. याद्या तयार झाल्या, तर काही बँकांचे अकाउंट क्रमांक चुकले आहेत, यासारखे अनेक विषय आहेत. त्याबाबत तलाठी वा मंडलाधिकारी निवांतपणे काम करत आहेत. तहसील कार्यालयाकडूनही ढिलाई होत आहे. 

अनेक तालुक्यात प्रत्यक्षात तहसील कार्यालयातील कर्मचारी तलाठी-मंडलाधिकाऱ्यांकडून याद्याच आल्या नाहीत, ही परिस्थिती असताना शेतकऱ्यांना पैसे कधी आणि कसे मिळणार हा प्रश्न आहे. त्या आधी तालुकानिहाय पात्र शेतकऱ्यांचे पंचनामे करून आकडेवारी शासनाला कळवण्यात आली. 

वाटप नसताना अहवाल पाठवला 

गावस्तरावर याद्या तयार असतानाही त्रुटी दुरुस्त करून तहसील कार्यालयाकडे पूर्ण यादी देण्यास संबंधित तलाठी व मंडलाधिकारी विलंब करीत आहेत. याद्या तहसील कार्यालयास मिळाल्या नसताना तहसीलदारांनी मात्र वाटप झाल्याचा लेखी अहवाल जिल्हा प्रशासनाला पाठवला आणि जिल्हा प्रशासनाने पुढे तो तसाच पाठवला. 

शेतकऱ्यांमध्ये संभ्रम, संताप

प्रामुख्याने दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापुरातील मदत वाटप सर्वाधिक रखडले आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही तालुके सोलापूर शहरानजीक अर्थात जिल्हा प्रशासनाच्या हाकेच्या अंतरावरील आहेत. तरीही या भागात अशी परिस्थिती आहे, हे विशेष. प्रत्यक्षात मदत खात्यावर जमा न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असून, प्रशासनाच्या कामाबद्दल त्यांच्यामध्ये संताप आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com