Agriculture news in marathi The grant of aid is on account of tahsildar in Solapur district | Agrowon

सोलापूर जिल्ह्यात मदतीचे अनुदान तहसीलदारांच्या खात्यावरच

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

तालुक्यात १४ कोटी रुपये प्राप्त झाले होते. त्याचे वाटप झाले आहे. मदतनिधी मिळेल, त्याप्रमाणे त्याचे वाटप करण्यात येईल.
- प्रदीप शेलार, तहसीलदार, बार्शी.

सोलापूर : दोन महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाकडून सुमारे ५८ कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे आला. त्यानंतर त्या-त्या तहसीलदारांकडे या रकमाही पाठवण्यात आल्या. पण अनेक गावांत आजही या मदतीचे वाटप झालेले नाही. तहसीलदारांच्या खात्यावर ही रक्कम पडून आहे, ही वस्तुस्थिती असताना, जिल्हा प्रशासनाने मात्र वाटप पूर्ण झाल्याचा दावा करून यासंबंधीचा अहवाल शासनाला पाठवला आहे.   

पंधरा दिवसांपूर्वीच ही मदत जिल्हा प्रशासनाला मिळाली. मदतीसाठी राज्य शासनाने ५८ कोटी १५ लाख रुपयांचा पहिला हप्ता दिला. अनेक गावांत तलाठी- मंडलाधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे शेतकऱ्यांच्या याद्या पूर्णपणे तयार झालेल्या नाहीत. याद्या तयार झाल्या, तर काही बँकांचे अकाउंट क्रमांक चुकले आहेत, यासारखे अनेक विषय आहेत. त्याबाबत तलाठी वा मंडलाधिकारी निवांतपणे काम करत आहेत. तहसील कार्यालयाकडूनही ढिलाई होत आहे. 

अनेक तालुक्यात प्रत्यक्षात तहसील कार्यालयातील कर्मचारी तलाठी-मंडलाधिकाऱ्यांकडून याद्याच आल्या नाहीत, ही परिस्थिती असताना शेतकऱ्यांना पैसे कधी आणि कसे मिळणार हा प्रश्न आहे. त्या आधी तालुकानिहाय पात्र शेतकऱ्यांचे पंचनामे करून आकडेवारी शासनाला कळवण्यात आली. 

वाटप नसताना अहवाल पाठवला 

गावस्तरावर याद्या तयार असतानाही त्रुटी दुरुस्त करून तहसील कार्यालयाकडे पूर्ण यादी देण्यास संबंधित तलाठी व मंडलाधिकारी विलंब करीत आहेत. याद्या तहसील कार्यालयास मिळाल्या नसताना तहसीलदारांनी मात्र वाटप झाल्याचा लेखी अहवाल जिल्हा प्रशासनाला पाठवला आणि जिल्हा प्रशासनाने पुढे तो तसाच पाठवला. 

शेतकऱ्यांमध्ये संभ्रम, संताप

प्रामुख्याने दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापुरातील मदत वाटप सर्वाधिक रखडले आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही तालुके सोलापूर शहरानजीक अर्थात जिल्हा प्रशासनाच्या हाकेच्या अंतरावरील आहेत. तरीही या भागात अशी परिस्थिती आहे, हे विशेष. प्रत्यक्षात मदत खात्यावर जमा न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असून, प्रशासनाच्या कामाबद्दल त्यांच्यामध्ये संताप आहे.


इतर बातम्या
नगरमध्ये पन्नास हजार क्विंटल मका खरेदी...नगर ः शासनाने बंद केलेली मका खरेदी सुरू केली. नगर...
सांगली बाजार समितीत नव्या हळदीचे सौदेसांगली ः सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे विभागात गहू क्षेत्रात ३६ हजार...पुणे ः गहू पेरणीस पोषक हवामान उशिराने तयार झाले....
संघटित कुक्कुटपालनातून ‘बर्ड फ्लू’चा...नाशिक : विभागात संघटित व शास्त्रीय पद्धतीने...
अण्णांच्या शेतकरी आंदोलनाला चार...नगर ः पीपल्स हेल्पलाइन, भारतीय जनसंसद व ‘मेरे देश...
महाराष्ट्राच्या चित्ररथावर संत...राळेगणसिद्धी, जि. नगर : प्रजासत्ताकदिनी (ता. २६)...
मराठवाड्यातील उपयुक्‍त पाण्यात दोन...औरंगाबाद : मराठवाड्यातील एकूण प्रकल्पांमधील...
जालना जिल्ह्यातील दोन केंद्रांत अडीच...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजारसमिती व उपबाजार...
पाणीपुरवठ्यापासून एकही गाव वंचित...परभणी ः  ‘‘‘हर घर नल से जल’ योजनेअंतर्गत...
लिंबूवर्गीय फळांच्या आयातीवरील बंधने...२०२१ च्या सुरवातीस ब्रिटनने युरोपीय संघाच्या एकल...
पीकविमा सरसकट द्या; ‘प्रहार जनशक्ती’ची...नांदेड : पीकविमा मंजूर व्हावा म्हणून यापूर्वी...
मनमाडमध्ये शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर...नाशिक : मनमाड येथे किसान सभेच्या वतीने ...
नगर जिल्हा बँकेची निवडणूक महाविकास...नगर :  नगर जिल्हा मध्यवर्ती सहकार बॅंकेची...
समन्यायी पाणी वाटप आव्हानात्मक विषय : ...नांदेड : समन्यायी पाणी वाटप हा दिवसेंदिवस अत्यंत...
`मका खरेदीची प्रक्रिया शुक्रवारपर्यंत...नाशिक: ‘‘मका खरेदीसाठी शासनाने ३२ जानेवारी पर्यंत...
तीन हजार महिलांना देणार रोजगार : विजय...चंद्रपूर : ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला...
पत्र्या ठोकण्याची वेळ आणू नका : राजू...सांगली : केंद्र सरकार कृषी कायदे शेतकऱ्यांवर...
मका खरेदीचे कमी उद्दिष्ट, शेतकऱ्यांसमोर...बुलडाणा : मका खरेदीसाठी शासनाने नवे उद्दिष्ट देऊन...
मागील वर्ष ठरले आजवरचे सर्वाधिक उष्णपुणे : कोरोनाचे संकट, बर्ड फ्लूची साथ आणि शेतकरी...
सांगलीत यंदा चारा टंचाई भासणार नाहीसांगली ः गेल्या वर्षी जिल्ह्यातील दुष्काळी...