सांगलीत शेतकऱ्यांसाठी ५४ कोटींचा कर्जपुरवठा मंजूर

सांगलीत शेतकऱ्यांसाठी ५४ कोटींचा कर्जपुरवठा मंजूर
सांगलीत शेतकऱ्यांसाठी ५४ कोटींचा कर्जपुरवठा मंजूर

सांगली  : ‘‘जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वतीने बिगरशेती व शेती कारणासाठी ४४६ सभासद संस्थांना ५४ कोट ५१ लाख रुपये कर्जपुरवठा मंजूर करण्यात आला आहे’’, अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी दिली.  

जिल्हा बॅंकेच्या कार्यकारी समितीची सभा नुकतीच अध्यक्ष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत बिगरशेती व शेतीसाठी एकूण ५४ कोटी ५१ लाख रुपये कर्ज पुरवठा करण्यास मंजुरी दिली. बिगर शेतीमध्ये एका साखर कारखान्याचे हंगामपूर्व ३० कोटी रुपयांचे अल्पमुदत कर्ज मंजूर करण्यात आले. 

पगारदार नोकरांमध्ये ८५ सभासदांना ९ कोटी ५५ लाख रुपये, शेतकरी घर बांधणीसाठी ६ सभासदांना ४५ लाख रुपये, वाहन खरेदीसाठी ७ सभासदांना ६५ लाख रुपये, बॅंक सेवक कर्जामध्ये २० सेवकांना १ कोटी ४३ लाख रुपये, स्वयंसहाय्यता बचत गटामध्ये ५९ गटांना ७३ लाख रुपये, जेएलजी गटामध्ये ६० गटांना एक कोटी २ लाख रुपये, थेट कर्जपुरवठामध्ये दहा कर्जदारांना एक कोटी ६८ लाख रुपये, पगारदार नोकर संस्थेला तीन कोटी रुपये कर्जपुरवठा मंजूर करण्यात आला. बिगरशेतीसाठी ४८ कोटी ५२ लाख रुपये एकूण कर्जपुरवठा मंजूर केला.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com