Agriculture news in Marathi Grants in seven talukas provide relief to tired camp operators | Page 2 ||| Agrowon

सात तालुक्‍यांतील अनुदान थकलेल्या छावणीचालकांना दिलासा

टीम अॅग्रोवन
शनिवार, 30 मे 2020

नगर ः पशुधन जगविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या चारा छावण्यांसाठी चालकांचा मोठ्या प्रमाणात झालेला खर्च लक्षात घेऊन, जिल्हा प्रशासनातर्फे जून २०१९ मधील प्रलंबित असलेले अनुदान आज वितरित करण्यात आले. सात तालुक्‍यांतील १६२ चाराछावण्यांचे अनुदान चार कोटी सात लाख ६९ हजार २१२ असून, छावणी चालकांच्या खात्यांवर ही रक्कम थेट जमा करण्यात आली. त्यामुळे छावणी चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नगर ः पशुधन जगविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या चारा छावण्यांसाठी चालकांचा मोठ्या प्रमाणात झालेला खर्च लक्षात घेऊन, जिल्हा प्रशासनातर्फे जून २०१९ मधील प्रलंबित असलेले अनुदान आज वितरित करण्यात आले. सात तालुक्‍यांतील १६२ चाराछावण्यांचे अनुदान चार कोटी सात लाख ६९ हजार २१२ असून, छावणी चालकांच्या खात्यांवर ही रक्कम थेट जमा करण्यात आली. त्यामुळे छावणी चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गतवर्षी शासन निर्देशानुसार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी प्रशासनाच्या दफ्तरी दाखल झालेल्या परिपूर्ण प्रस्तावांची पडताळणी करीत ५११ चाराछावण्यांना अटी व शर्तींसह मंजुरी दिली. यांपैकी ५०४ चाराछावण्या प्रत्यक्षात सुरू झाल्या होत्या. त्यांत दाखल झालेल्या लहान-मोठ्या पशुधनाची संख्या तीन लाख ३५ हजार होती. या पशुधनासाठी चारा-पाणी पशुखाद्य व इतर व्यवस्था करताना छावणीचालकांचा होणारा दैनंदिन खर्च मोठा होता.

अनुदानाची रक्कम छावणीचालकांना मिळावी, यादृष्टीने प्रशासनाने सतर्कता राखत, जून २०१९मधील अनुदानाची मागणी शासनाकडे नोंदवली होती. त्यानुसार अनुदानापोटी राज्य सरकारकडून प्राप्त झालेले चार कोटी सात लाख ६९ हजार २१२ रुपये वितरित करण्यात आले. जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या निर्देशानुसार निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांच्या मार्गदर्शनाखाली छावणीचालकांच्या बॅंक खात्यांवर रक्कम जमा करण्यात आली.

तालुकानिहाय छावण्या (कंसात अनुदान रुपयांत)
नगर २५ (७६७००६२)
पाथर्डी २५ (६४००६१४)
शेवगाव ५० (९५४८७१८)
कर्जत ११ (३६०३७७२)
श्रीगोंदे २५ (५२८४९४२)
जामखेड २५ (८१३५३४५)
नेवासे ०१ (१२५७५९)

इतर बातम्या
सीईटीऐवजी गुणांद्वारे कृषी...अमरावती ः बारावीनंतर कृषी अभ्यासक्रमाला...
वीजबिले माफ न केल्यास कंपनीचे कार्यालय...बुलडाणा ः लॉकडाउनच्या काळातील तीन महिन्यांचे...
सत्तास्थापनेसाठी भाजपकडूनच विचारणा केली...मुंबई : सहा महिन्यांपूर्वी राज्यात सत्तास्थापन...
वऱ्हाडात दूधाचे दर स्थिरअकोला ः या भागातील दूध संघ डबघाईस आल्याने दूध...
वाशीम जिल्ह्यावर खरिपात पावसाची कृपावाशीम ः जिल्ह्यात यंदाच्या मोसमात आत्तापर्यंत...
वर्धा जिल्ह्यात दूध उत्पादकांना दराचा...नागपूर ः लॉकडाउनमुळे मागणी घटल्याचे सांगत खासगी...
नाशिकमध्ये कमी दूध दरामुळे उत्पादकांची...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार...
वीज बिले माफ न केल्यास उद्रेक ः...नाशिक : लॉकडाऊन काळात वीज कंपन्यांनी घरगुती वीज...
एचटीबीटी कपाशीची शेतकऱ्यांकडून पाहणीअकोला ः शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य मिळावे...
दुर्मीळ निलमणी आमरीचे सातपुड्यात...जळगाव ः जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगा या अनेक...
दूध पावडरला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान...इस्लामपूर, जि. सांगली ः कोरोना सारख्या साथीत...
भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश;तरीही चार...पुणे: पंतप्रधान पॅकेजमधून राबविण्यात आलेल्या...
अकोला जिल्ह्यात सोयाबीन उगवणशक्तीबाबत...अकोला ः  सोयाबीन पिकाची पेरणी जुलैच्या...
अन्नधान्य पिकांच्या योजनांसाठी २७ कोटीपुणे: राज्यातील अन्नधान्य पिकांच्या योजनांसाठी...
ग्लायफोसेट वापराच्या मसुद्याविरुद्ध दाद...पुणे: केंद्र सरकारने ग्लायफोसेट तणनाशकाच्या...
सोयाबीन बियाणे कंपन्यांवर राज्यात ४६...औरंगाबाद ः सोयाबीनच्या बोगस बियाण्यामुळे पिकाची...
दूध व्यवसाय झाला आतबट्ट्याचा; शेतकरी...पुणेः मागील काही वर्षांपासून संकटात असलेल्या दूध...
राज्यात पाऊस जोर धरण्याची शक्यता पुणे : मॉन्सून सक्रिय होण्याचा पोषक हवामान होत...
विश्वजित माने प्रभारी कृषी आयुक्तपुणे : राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची...
कोल्हापुरात आज घरगुती वीज बिलांची होळी ...कोल्हापूर  : दिल्ली सरकारने शंभर...