Agriculture news in Marathi Grants on tools of private entrepreneurs | Agrowon

खासगी उद्योजकांच्या अवजारांवर अनुदान

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 ऑगस्ट 2021

राज्यातील कृषी विद्यापीठे तसेच खासगी छोट्या उद्योजकांनी तयार केलेली नावीन्यपूर्ण अवजारे अनुदानाच्या कक्षेत आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

पुणे ः राज्यातील कृषी विद्यापीठे तसेच खासगी छोट्या उद्योजकांनी तयार केलेली नावीन्यपूर्ण अवजारे अनुदानाच्या कक्षेत आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

केंद्र शासनाचे कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि राज्य पुरस्कृत यांत्रिकीकरण योजना अशा तीन योजनांतून शेतकऱ्यांना कृषी यंत्रे आणि अवजारे खरेदीसाठी अनुदान मिळते. मात्र असे अवजार किंवा यंत्र नोंदणीकृत व शासनाच्या मान्यता यादीत असावे, अशी अट टाकण्यात आलेली आहे. त्यामुळे या यादीबाहेरच्या अवजारांना सध्या अनुदान मिळत नाही. 

यादी बाहेरच्या अशा अवजारांना राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेत आणले जाणार आहे. यामुळे चारही कृषी विद्यापीठांना त्यांची अवजारे तसेच विविध जिल्ह्यांमधील ७० पेक्षा जास्त खासगी यंत्र उत्पादकांनाही त्यांची अवजारे अनुदानित किमतीत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता येतील.

कृषी विद्यापीठांनी तयार केलेली, तसेच संयुक्त कृषी संशोधन समितीने शिफारस केलेली, पण खासगी उद्योजकांमार्फत उत्पादित करावयाच्या अवजारांबाबत विद्यापीठांमध्ये तांत्रिक समित्या स्थापन केल्या जाणार आहेत. या समित्यांची कार्यपद्धती कृषी आयुक्त धीरज कुमार निश्‍चित करणार आहेत. 

विद्यापीठांमधील तांत्रिक समित्या प्रथम अवजारांची उपयुक्तता व नावीन्यता तपासतील. त्यानंतर स्वामित्व शुल्क (रॉयल्टी) निश्‍चित करतील. विद्यापीठे व उत्पादकांमध्ये करारदेखील होईल. ‘‘या प्रक्रियेत ठरावीक उत्पादकाची मक्तेदारी निर्माण होणार नाही. जास्तीत जास्त उत्पादकांना संधी मिळण्याची काळजी घ्यावी,’’ अशा सूचना राज्य शासनाने विद्यापीठांना दिल्या आहेत. 

विद्यापीठांशी करार केलेली उत्पादने खुल्या बाजारात विकण्याची मुभा उत्पादकाला देणे तसेच राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेत अवजारांचा समावेश करणे या दोन्ही निर्णयाचे उद्योजकांनी स्वागत केले आहे. ‘‘ही योजना राबविताना काही अडचणी उद्‌भवण्याची शक्यता आहे. मात्र परिस्थितीनुसार पुराव्यांसह अशा त्रुटी आम्ही शासनाच्या निदर्शनास आणून देऊ,’’ असे एका उद्योजकाने स्पष्ट केले.

‘शासनाच्या यादीत अवजारे समाविष्ट करून घ्यावी’
कृषी आयुक्तालयाच्या निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे संचालक दिलीप झेंडे यांच्या म्हणण्यानुसार, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नावीन्यपूर्ण अवजारे व यंत्रे अनुदानातून मिळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी विद्यापीठे आणि खासगी उत्पादकांना त्यांची अवजारे राज्य शासनाच्या यादीत समाविष्ट करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या संकेतस्थळावर सविस्तर कार्यपद्धती देण्यात आलेली आहे.


इतर अॅग्रो विशेष
देशभरात सोयाबीन ५५०० ते ७३००च्या दरम्यानपुणे : सध्या बाजारात येणाऱ्या सोयाबीनपैकी ज्या...
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : काहीशा विश्रांतीनंतर राज्यात पावसाला...
द्राक्ष बागायतदार संघाचे आजपासून ६१ वे...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे...
मूग, सोयाबीन पिकाला कोंब फुटण्याची...पुणे : राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर...
साखरनिर्यातीचे १८०० कोटींचे अनुदान मंजूरकोल्हापूर : केंद्राने २०२०-२१ या हंगामात निर्यात...
सामाजिक, मानसिक स्वास्थ्यासाठी...पुणे ः ‘‘बदलत्या परिस्थितीत सामाजिक आणि मानसिक...
द्राक्ष पिकातील कलम वर्षभर यशस्वी...महाराष्ट्रात द्राक्ष, आंबा व अन्य फळपिकांचे कलम...
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...
‘व्हीएसआय’च्या जालना केंद्रासाठी ३० कोटीपुणे ः विदर्भ, मराठवाड्याला मार्गदर्शक ठरणाऱ्या...
पेरणी ते काढणी- जपला यांत्रिकीकरणाचा वसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा...पुणे : राज्यात पुढील दोन दिवस जोरदार वारे,...
पुण्यात साकारतेय देशी गाय संशोधन आणि...पुणे ः देशी गायींच्या संवर्धनातून त्यांची...
विमा कंपन्यांना आठ हंगामांत १२ हजार...पुणे ः देशातील खासगी विमा कंपन्यांनी गेल्या आठ...
द्राक्ष हंगामात नियोजन आणि बाजारपेठेचे...अधिक परतावा देणारी पिके म्हणजे जोखीमही मोठी असते...
मागणीमुळे हरभरा दर हमीभावाच्या वर टिकूनपुणे : गेल्या आठवडाभरात हरभऱ्याला चांगली मागणी...
महुद ग्रामस्थांची एकजूट कौतुकास्पद :...सोलापूर ः वसुंधरा आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी...
उच्चशिक्षित दांपत्याची पोल्‍ट्रीत...वाशीम जिल्हयात मुठ्ठा या छोट्या गावात नीलेश व...
भरीताच्या वांग्यासह केळी अन कांद्याची...नशिराबाद (ता.. जि.. जळगाव) येथील लालचंद व यशवंत...
मध केंद्र योजनेंतर्गत साहित्य  स्वरूपात...नाशिक : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग...
ठिबक अनुदान वाटपाच्या  प्रक्रियेवर...पुणे : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून अनुदान...