सोलापुरात द्राक्ष, डाळिंबाचे दर स्थिर

सोलापुरात द्राक्ष, डाळिंबाचे दर स्थिर
सोलापुरात द्राक्ष, डाळिंबाचे दर स्थिर

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात द्राक्ष, डाळिंबाची आवक बऱ्यापैकी राहिली. पण मागणीही स्थिरावल्याने त्यांचे दरही टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात द्राक्षाची आवक रोज २०० ते ३०० पेट्या, डाळिंबाची अर्धा ते एक टनापर्यंत आवक राहिली. द्राक्ष, डाळिंबाची सर्व आवक ही स्थानिक भागातूनच झाली. द्राक्षाची आवक उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी आणि मोहोळ भागांतून झाली. तर डाळिंबाची आवक माढा, मंगळवेढा, सांगोला भागांतून झाली. गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून त्यांच्या आवक आणि दरात काहीसे चढ-उतार होत आहेत. पण या सप्ताहात ते पूर्णपणे स्थिर राहिले. 

द्राक्षाला चार किलोच्या पेटीला किमान किमान १०० रुपये, सरासरी १३० रुपये आणि सर्वाधिक १६० रुपये असा दर मिळाला. तर डाळिंबाला प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी २५०० रुपये आणि सर्वाधिक ६००० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय मोसंबी आणि पपईचे दरही जैसे थेच राहिले. मोसंबीची आवक जेमतेम रोज १०० ते १५० पेट्या आणि पपईची केवळ ४ ते ६ क्विंटलपर्यंत राहिली. मोसंबीला पेटीला किमान २०० रुपये, सरासरी ३०० रुपये आणि सर्वाधिक ५०० रुपये तर पपईला क्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी ३०० रुपये आणि सर्वाधिक ४०० रुपये दर मिळाला.

फळभाज्यामध्ये वांगी, ढोबळी मिरची, कोबी यांचे दरात किंचित चढ-उतार राहिला. त्यांची आवक ही रोज प्रत्येकी १० ते ४० क्विंटलपर्यंत राहिली. वांग्याला प्रतिक्विंटल किमान ३०० रुपये, सरासरी ९०० रुपये आणि सर्वाधिक १५०० रुपये, ढोबळी मिरचीला किमान ८०० रुपये, सरासरी ११०० रुपये आणि सर्वाधिक १३०० रुपये तर कोबीला किमान ७०० रुपये, सरासरी ८०० रुपये आणि सर्वाधिक १००० रुपये असा दर मिळाला. मेथी, कोथिंबिरीची आवक ही प्रत्येकी ८ ते १० हजार पेंढ्यांपर्यंत राहिली. मेथीला शंभर पेंढ्यांसाठी  ५०० ते ७०० रुपये, कोथिंबिरीला ४०० ते ६०० रुपये असा दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com