खानापुरातील द्राक्ष निर्यातीच्या क्षेत्रात घट

सध्या पोषक वातावरण असल्याने द्राक्ष बागा चांगल्या आहेत. असेच वातावरण राहिल्यास द्राक्षाची निर्यात चांगली होईल. - डी. एस. शिलेदार, कृषी अधिकारी (निर्यात)
grape exports decline in Khanapur
grape exports decline in Khanapur

सांगली : जिल्ह्यातून निर्यातक्षम द्राक्षासाठी २०१० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. १११२ हेक्टरवरील द्राक्ष युरोपसह आखाती देशात जाणार आहेत. गेल्या वर्षी खानापूर तालुक्यातून ८६२ शेतकऱ्यांनी द्राक्षाची निर्यात करण्यासाठी पुढे आले होते. मात्र यंदा अतिवृष्टीमुळे याच तालुक्यात ७२९ शेतकऱ्यांनी नोंद केली आहे. गतवर्षीपेक्षा चालू वर्षी १३३ शेतकरी, तर ५५ हेक्टर क्षेत्र कमी झाले आहे. 

जिल्ह्यातून दरवर्षी द्राक्षाची निर्यात केली जाते. यामुळे परकीय चलन मोठ्या प्रमाणात जिल्ह्याला मिळते. गेल्या वर्षी २१९१ शेतकऱ्यांनी ११४६ हेक्टर क्षेत्र निर्यातीसाठी नोंदवले होते. गतवर्षी जिल्ह्यातून युरोपला ७ हजार ४२२ मेट्रिक टन म्हणजे ५८३ कंटेनर, तर आखाती देशात ६ हजार ३१ मेट्रिक टन म्हणजे ४३४ कंटनेर अशी एकूण १३ हजार ४५४ मेट्रिक टन द्राक्षाची निर्यात झाली होती. 

यंदा गेल्या वर्षीपेक्षा जास्त क्षेत्राची नोंद होईल, अशी आशा होती. मात्र हंगामाच्या सुरुवातीला महापूर त्यानंतर अतिवृष्टीमुळे द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचा परिमाण निर्यातक्षम द्राक्ष नोंदणीवर झाला आहे. वास्तविक खानापूर आणि तासगाव तालुक्यातून सर्वाधिक द्राक्षांची निर्यात होते. परंतु या तालुक्यात अतिवृष्टी आणि मॉन्सूनोत्तर पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे बागेवर डाऊणी रोगाचा प्रादुर्भाव झाला.

फुळगळ झाली. त्यामुळे द्राक्ष बागायतदारांचे नियोजन कोलमडले. त्यातूनही शेतकऱ्यांनी बागा जगविल्या. यंदाही द्राक्षाची निर्यात गेल्या वर्षी इतकी होईल, असा अंदाज द्राक्ष बागायतदारांकडून व्यक्त होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com