द्राक्ष उत्पादकांची ११ लाखांची फसवणूक 

वसई येथील दोघा व्यापाऱ्यांनी कासेगाव (ता. पंढरपूर) येथील चार शेतकऱ्यांचे १७ हजार ९३१ किलो द्राक्ष नेली. मात्र त्याचे पैसे न देता त्यांची ११ लाख ३७ हजार ७२० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडीस आला आहे.
Grape growers cheated of Rs 11 lakh
Grape growers cheated of Rs 11 lakh

सोलापूर ः वसई येथील दोघा व्यापाऱ्यांनी कासेगाव (ता. पंढरपूर) येथील चार शेतकऱ्यांचे १७ हजार ९३१ किलो द्राक्ष नेली. मात्र त्याचे पैसे न देता त्यांची ११ लाख ३७ हजार ७२० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडीस आला आहे. १४ एप्रिल रोजी सकाळी दहा ते १९ एप्रिल रोजी सायंकाळी सहा या वेळेत ही घटना घडली. याप्रकरणी त्या दोघा व्यापाऱ्यांविरुद्ध येथील रुग्णालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेमंत दिलीप चव्हाण, मोहम्मद असरफ मोहम्मद सलमान (दोघे रा. पंचशील, ए/५, कृष्णा टाउनशिप, अंबती मार्ग, वसई, ठाणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोन्ही संशयित व्यापाऱ्यांची नावे आहेत. याप्रकरणी द्राक्ष बागायतदार शेतकरी अर्जुन यशवंत जाधव (वय ३५) व अप्पा देशमुख यांनी फिर्याद दिली आहे. 

हेमंत चव्हाण व मोहम्मद असरफ यांनी जाधव यांच्यासह गावातील अप्पा देशमुख, निजाम जमादार आणि अक्षय देशमुख या शेतकऱ्यांकडून द्राक्ष करार करून नेली होती. १४ एप्रिल ते १९ एप्रिल या सहा दिवसांच्या कालावधीत त्यांच्याकडून ११ लाख ३७ हजार ७२० रुपयांची १७ हजार ९३१ किलो द्राक्ष नेली. पण पैसे दिले नाहीत. त्यानंतरही त्यांच्याकडे पाठपुरावा केला. पण त्यांनी दाद दिली नाही. त्यामुळे जाधव यांनी पोलिस स्टेशन गाठून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक किरण अवचर तपास करीत आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com