ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक धास्तावले 

सांगलीजिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात काही भागांत ढगाळ वातावरण आहे. काही पावसाने हजेरी लावली आहे. त्याचा फटका द्राक्षबागांना बसतो आहे.
Grape growers panicked due to cloudy weather
Grape growers panicked due to cloudy weather

सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात काही भागांत ढगाळ वातावरण आहे. काही पावसाने हजेरी लावली आहे. त्याचा फटका द्राक्षबागांना बसतो आहे. काही ठिकाणी फुलोरावस्थेत असलेल्या बागातील फूलगळ होऊ लागली असल्याने द्राक्षबागायतदार शेतकरी धास्तावले आहेत.  सांगली जिल्ह्यात द्राक्षांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यातून येणाऱ्या उत्पन्ना या भागातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित अवलंबून असते. सध्या अनेक भागात फळ तयार होण्याच्या टप्प्यामध्ये द्राक्ष बागा आहेत. तसेच काही ठिकाणी द्राक्षमणी तयार होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र गेल्या चार ते पाच दिवसांत पाऊस पडला आहे. ढगाळ वातावरणामुळे द्राक्षावर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. काही भागात तर बागांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत.  या बदलत्या वातावरणामुळे अन्न निर्मितीची प्रक्रिया मंदावली आहे. त्यामुळे फुलोवस्थाचे गळ होऊ लागली आहे. काही ठिकाणी सकाळी दव पडत असल्याने फळ कुजीची समस्या होण्याची शक्यता आहे.  हातातोंडाशी आलेले पीक जाऊ नये यासाठी शेतकऱ्यांची सकाळपासून द्राक्षावर फवारणी करण्यासाठी खटपट सुरू आहे. पुढील काही दिवस वातावरण असेच राहिले, तर डाऊनीसह इतर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त होत आहे. द्राक्ष बागांत सातत्याने कीडकनाशकांची फवारणी करावी लागते आहे. परिणामी, उतपादन खर्चात वाढ होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. उत्पादनापेक्षा खर्च जास्त होत असल्यामुळे द्राक्ष पीक यंदाच्या वर्षी तोट्यात जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.  प्रतिक्रिया 

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने फुलोरावस्थेत असलेल्या बागांना फटका बसत आहे. त्यातही वातावरण बदलत असल्याने अन्न निर्मितीची प्रक्रिया मंदावली असल्याने फुलोरा गळीची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शिफारशीनुसार औषध फवारणी करावी.  - मारुती चव्हाण, द्राक्ष तज्ज्ञ, पलूस, जि. सांगली  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com