औरंगाबादमध्ये कैरी खातेय भाव; द्राक्षाचे दर स्थिर

औरंगाबाद : आठवडाभरात जवळपास चार वेळा आवक झालेली कैरी औरंगाबाद बाजार समितीमध्ये भाव खाते आहे.
Grape prices stable
Grape prices stable

औरंगाबाद : आठवडाभरात जवळपास चार वेळा आवक झालेली कैरी औरंगाबाद बाजार समितीमध्ये भाव खाते आहे. चार वेळा मिळून ४१ क्‍विंटल आवक झालेल्या कैरीचे सरासरी दर ४७५० ते ९००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. आठवड्यात दोनवेळा कैरीला १० हजार रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला होता.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये २२ ते २७ फेब्रुवारी दरम्यान द्राक्षाची २५४ क्‍विंटल आवक झाली. त्यांना सरासरी ३२५० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाले. बाजरीची जवळपास २२७ क्‍विंटल आवक झाली. २१ ते ६५ क्‍विंटल आवक झालेल्या बाजरीला सरासरी १०५० ते ११०० रुपये दर मिळाले. हरभऱ्याची आठवड्यात केवळ तीन वेळा आवक झाली. एकूण केवळ २० क्‍विंटल आवक झालेल्या हरभऱ्याला सरासरी ३५०० ते ४५९९ रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

मक्याची एकूण आवक ५२१ क्‍विंटल झाली. ४३ ते १७२ क्‍विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झाली. दर सरासरी ११७३ ते १३४८ रुपये मिळाला. तुरीची एकूण आवक २३० क्‍विंटल झाली. ४ ते १२५ क्‍विंटल आवक झालेल्या तुरीला सरासरी ६१०० ते ५५१३ रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.  ज्वारी २६२६ ते २९७५ रुपये 

ज्वारीची काढणी सुरू झाली आहे. तिची आठवडाभरात एकूण ८८९ क्‍विंटल आवक झाली. तिला सरासरी २६२६ ते २९७५ रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. एकवेळ ज्वारीला ३८०० रुपये प्रतिक्‍विंटलपर्यंतचा दर मिळाला. सोयाबीनची केवळ दोन वेळा आवक झाली. २९ क्‍विंटल आवक झालेल्या सोयाबीनचे सरासरी दर ४१५० ते ४३०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com