नाशिक : कसमादे पट्ट्यात खरड छाटण्या अंतिम टप्प्यात

नाशिक : कसमादे पट्ट्यात खरड छाटण्या अंतिम टप्प्यात
नाशिक : कसमादे पट्ट्यात खरड छाटण्या अंतिम टप्प्यात

नाशिक : पूर्वहंगामी द्राक्षउत्पादनांसाठी कसमादे भाग आघाडीवर असतो. मात्र चालू वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे हा हंगाम मोठ्या प्रमाणावर अडचणीत सापडला आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांचे कोट्यवधी रुपयांचे मोठे नुकसान झाले. तरी आता पुन्हा नव्या उमेदीने येथील शेतकरी उभा राहिला असून द्राक्षबागांच्या खरड छाटण्यांना वेग आला असून कामे अंतिम टप्प्यात आहेत.  प्रयोगशील द्राक्षउत्पादकांचा भाग म्हणून कसमादे भागाने जगात ओळख निर्माण झाली आहे. मात्र हा हंगाम हातातून गेल्यानंतरही द्राक्ष उत्पादक पुढील नियोजनात व्यस्त झाले आहेत. मागील वर्षी कमी पावसामुळे या भागात पाण्याची टंचाई जाणवू लागली असल्याने सिंचनाचे व्यवस्थापन करत करून बागा जगविल्या होत्या. मात्र काढणी हंगाम सुरू होण्याच्या ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याच्या दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक बागा जमीनदोस्त झाल्यातर काही बागांमध्ये मालाला तडे जाऊन मोठ्या प्रमाणावर मालाची सड होऊन बुरशी लागल्याने माल मातीमोल झाला. त्यामुळे लाखो रुपये उत्पादनखर्च करून उत्पन्न हाती आलेले नाही. त्यामुळे दरम्यानच्या काळात शेतकरी चिंतेत होता. हातचे भांडवल जाऊनही उत्पन्न पदरी न पडल्याने मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना येथील शेतकरी करत आहे. बागलाण भागातील पिंगळवाडे, वाजगाव, कोडबेल, टेंभे, तळवाडे, गोराणे, बिजोटे, भुयाणे, किकवारी खुर्द आणि बुद्रुक, अमरावतीपाडा, पारनेर, डोंगरेज, मुंगसे, द्याने, बिलपुरी, श्रीपुरवडे, दसाणे, लखमापूर यांसह मालेगाव तालुक्यातील सातमाने, जळगाव, गाळणे, दाभाडी, आघार तसेच देवळा तालुक्यातील वाजगाव,खर्डा,लोहणेर,भावडे,कणकापूर या भागात खरड छाटण्यांची कामांना वेग आला आहे. प्रतिक्रिया... पूर्वहंगामी द्राक्ष बागांचे नियोजन करून मोठ्या कष्टातून माल तयार केला.मात्र अतिवृष्टी च्या तडाख्यात मोठे नुकसान झाले आहे.तरी आता पुन्हा नवी उमेद घेऊन कामाला सुरुवात केली आहे.  - संदीप भामरे, द्राक्ष उत्पादक, पिंगळवाडे, ता. सटाणा 

मागील वर्षी पाण्याची टंचाई असताना बागा जगविल्या. त्यात माल काढणीला येऊन सर्व मेहनत हातातून गेली. आता खरड छाटणीनंतर सिंचनाचे व्यवस्थापन करावे लागेल. यासाठी पुन्हा कामाला सुरुवात केली आहे.  -अरुण भामरे, द्राक्ष उत्पादक, पिंगळवाडे, ता. सटाणा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com