आटपाडी, मिरजमध्ये द्राक्ष हंगाम सुरू

आटपाडी, मिरजमध्ये द्राक्ष हंगाम सुरू
आटपाडी, मिरजमध्ये द्राक्ष हंगाम सुरू

सांगली : आटपाडी आणि मिरज पूर्व भागात द्राक्षे काढणीला आली आहेत. जिल्ह्यात केवळ पाच टक्के हंगाम सुरू आहे. द्राक्ष खरेदीसाठी व्यापारी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. परंतु, मॉन्सूनोत्तर पावसाने द्राक्षाचे नुकसान झाले असल्याने फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात द्राक्ष हंगामाला गती येईल. यंदा द्राक्षाला चांगले दर मिळतील, असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.    द्राक्ष पिकावर सातत्याने संकटे आली. त्यावर मात करून शेतकऱ्यांनी द्राक्षबागा जगविल्या आहेत. सध्या आटपाडी आणि मिरज पूर्व भागात द्राक्ष हंगामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे व्यापारी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. परंतु, पावसामुळे बागांचे नुकसान झाले असल्याने हंगाम लांबवणीवर पडला आहे. त्यामुळे एकाच वेळी द्राक्ष काढणीला येण्याची शक्यता आहे.  जिल्ह्यातून द्राक्षाची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. यंदा आत्तापासून युरोपीय देशात द्राक्ष निर्यात करणारे व्यापारी दाखल झाले आहेत. यंदाच्या हंगामात निर्यातक्षम द्राक्षांना दर चांगले राहतील, असा अंदाज निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात थंडी वाढू लागली आहे. वास्तविक पाहता ही थंडी द्राक्ष मण्यांसाठी अपायकारक आहे. सध्या उशिरा फळ छाटणी घेतलेल्या बागा ६० ते ८० दिवसांच्या आहेत. थंडीमुळे मण्यांच्या फुगवणीवर परिणाम होऊ लागला आहे. तसेच मण्यात गोडी उतरत नाही. मात्र, एकाच वेळी द्राक्ष काढणीला येणार असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. सध्याचा द्राक्षाचा दर

  • दुबई : ९० रुपये किलो
  • देशांतर्गत बाजारपेठेत ः ४५ ते ७५ रुपये किलो
  • द्राक्ष हंगामाला गती आलेली नाही. सध्या अपेक्षित दर आहेत. दर्जेदार द्राक्षाला चांगले दर मिळतील अशी आशा आहे. निर्यातीचे दरही वाढतील. थंडीमुळे द्राक्ष मणी फुगवणीवर परिणाम होत असून, मण्यांत साखर उतरत नसल्याचे चित्र आहे. - विनायक पाटील, वायफळे,  ता. तासगाव, जि. सांगली.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com