किसान रेल्वेद्वारे मिळाला द्राक्ष वाहतुकीचा पर्याय

नांदेड विभागातील नगरसुल (ता.येवला) स्थानकावरून किसान रेल्वेद्वारे द्राक्ष अवघ्या ३० तासात निम्म्या खर्चाने थेट बांगलादेश सीमाभागात पाठविण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे.
Grape transport option available by Kisan Railway
Grape transport option available by Kisan Railway

नाशिक : ‘‘जिल्ह्यातून थेट बांगलादेश बाजारासाठी ट्रकच्या माध्यमातून द्राक्षपुरवठा केला जातो. मात्र हा पर्याय नेहमी खर्चिक, वेळखाऊ व अडचणींचा ठरत आहे. त्यामुळे मालाच्या प्रतवारीवर परिणाम होत आहे. त्यामुळे अडचणी येतात. मात्र दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील नगरसुल (ता.येवला) स्थानकावरून किसान रेल्वेद्वारे द्राक्ष अवघ्या ३० तासात निम्म्या खर्चाने थेट बांगलादेश सीमाभागात पाठविण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यातच एकूण भाड्यावर ५० टक्के सूट मिळत आहे. 

शेतमाल वाहतुकीत सुरक्षित व जलद वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने ''किसान रेल्वे''ची संकल्पना आणली. यासह शेतमाल पुरवठ्याला प्रोत्साहन देण्यासाठी अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाने ‘ऑपरेशन ग्रीन्स-टॉप टू टोटल’च्या अंतर्गत किसान रेल्वेद्वारे शेतमाल वाहतुकीवर ५० टक्के वाहतूक सवलत देण्याची घोषणा केली.

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील नगरसुल स्थानकावरून पश्चिम बंगालमधील गौर मालदा रेल्वे स्थानकावरून थेट ७० टन माल प्रायोगिक तत्त्वावर पाठविण्यात आला. त्यास प्रतिकिलो २.७५ रुपये खर्च आला. किमान वेळेत, कमी खर्चात व चोरी न होता माल पोचला. आता बनगाव रेल्वे स्थानकावर थेट बांगलादेश सीमेवर माल पाठविण्यात येईल.

किसान रेल्वेतून द्राक्ष कमी वेळात व कमी खर्चात जात असल्याने फायदा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दरात काही अंशी फायदा होईल.  - नामदेव पानगव्हाणे, द्राक्ष उत्पादक, उगाव, ता. निफाड

सुरवातीला ७० टन द्राक्ष बांगलादेशमध्ये पाठवले. प्रतिकिलो २.७५ रुपये प्रमाणे थेट गौर मालदा येथे माल पोचला. तर, ट्रकने प्रतिकिलो मागे ८ रुपये खर्च येत असल्याचे वाहतूकदारांचा म्हणणे आहे. त्यामुळे खर्च निम्म्यावर आला. यापुढे द्राक्ष वाहतूक रेल्वेने वाहतूक वाढेल.  - नंदकुमार बोरा, रेल्वे कारटिंग एजंट, निफाड, जि. नाशिक.

सध्या ही प्रक्रिया नगरसुल रेल्वे स्थानकावरून होत आहे. भुसावळ विभागाच्या कुंदेवाडी स्थानकावरून थांबा मिळाल्यास कामकाजात अधिक सुलभता येईल. त्यामुळे द्राक्ष उत्पादक भागातील स्थानिक रेल्वे स्थानकावरून कामकाज व्हावे.   - कैलास भोसले, कोषाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com