वाळवा तालुक्‍यात द्राक्ष उलाढालीत सात कोटींची घट शक्‍य

grape turnover may decrease by seven crores in Walwa
grape turnover may decrease by seven crores in Walwa

वाळवा, जि. सांगली : अतिवृष्टीने द्राक्षशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा उलाढालीत सात कोटींची घट येण्याची शक्यता आहे. सरासरी ४०० एकरांतील द्राक्षबागा शेतकऱ्यांनी यंदा सोडल्या आहेत. विशेष बाब म्हणजे दरवर्षी केवळ द्राक्ष उत्पादनातून या परिसरात ५० कोटींची उलाढाल होते. 

येथील शेतक-यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत दर्जेदार द्राक्ष उत्पादनात भरारी घेतली आहे. काळ्या द्राक्षाचे कोठार म्हणून या परिसराची राज्य आणि देशात ओळख आहे. परिसरात सुमारे तीन हजार एकरांत द्राक्षशेती आहे. शरद, शरद सोनाक्का, प्लेम, सुपर सोनाक्का जातीची द्राक्षे या परिसरात उत्पादित होतात. अगदी अंगठेबहाद्दर ते इंजिनिअर, डॉक्‍टर, वकील, नोकरशहा या उत्पादनात पाय रोऊन आहेत. मात्र गेल्या काही वर्षात द्राक्ष उत्पादनावर लहरी नैसर्गिक हवामानाचे संकट आले आहे. 

अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या जिवावर उठला आहे. दरातील चढउतार पाहिल्यास सरासरी प्रतिकिलो चाळीस रुपये दर मिळतो. यंदा जवळपास दोन हजार एकर द्राक्षांची पीक छाटणी झाली होती. पावसामुळे जवळपास पाचशे एकरातील द्राक्षबागा शेतकऱ्यांनी यंदा सोडल्या आहेत. त्यामुळे साधारण नऊ कोटी रुपयांची हानी झाल्याचा अंदाज आहे. 

अनेक शेतकरी बाजारातील पत राहावी म्हणून वस्तुस्थिती सांगत नाहीत. मात्र शासनाने भरपाई दिली, तरच या भागातील शेतकरी तरणार आहे. अन्यथा विदर्भ, मराठवाड्यासारखी परिस्थिती संभवते. दरवर्षी द्राक्षांचे किमान दहा हजार टन उत्पादन होते. यंदा मात्र चार हजार टनांनी उत्पादन घटणे शक्य आहे.  

दृष्टिक्षेप...

  •    दरवर्षी दोन हजार एकरांत उत्पादन.
  •    एकरी पाच ते सात टन उत्पादन.
  •    ४० टक्के उत्पादन खर्च. 
  •    दर सरासरी ४० रुपये प्रतिकिलो. 
  •    दक्षिण भारतात विक्री. 
  •    दरवर्षी ५० कोटींची उलाढाल. 
  •    दोन ते तीन लाख रुपये एकरी निव्वळ उत्पन्न.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com