agriculture news in Marathi, grape yard chopped due to water scarcity, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

सांगली जिल्ह्यात पाण्याअभावी द्राक्षबागेवर कुऱ्हाड

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

सांगली ः पावसाळा संपत आला तरी तासगाव तालुक्याच्या पूर्व भागात समाधानकारक पाऊस झाला नाही. बंद सिंचन योजनांमुळे शेतकऱ्यांच्या विहिरी, बोअरची पाणीपातळी घटली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. पाण्याअभावी या भागातील द्राक्ष बागेवर शेतकऱ्यांनी कुऱ्हाड चालवली आहे.

सांगली ः पावसाळा संपत आला तरी तासगाव तालुक्याच्या पूर्व भागात समाधानकारक पाऊस झाला नाही. बंद सिंचन योजनांमुळे शेतकऱ्यांच्या विहिरी, बोअरची पाणीपातळी घटली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. पाण्याअभावी या भागातील द्राक्ष बागेवर शेतकऱ्यांनी कुऱ्हाड चालवली आहे.

तासगाव तालुका द्राक्ष उत्पादनासाठी अग्रेसर आहे. सुरवातीच्या काळात अत्यल्प क्षेत्र होते. परंतु त्यानंतर या भागातील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकाऐवजी द्राक्ष पीक घेऊ लागले. उपलब्ध भांडवल, कर्ज घेऊन, बोअर, विहिरी असे स्रोत निर्माण करून शेतकरी द्राक्ष शेतीकडे वळले. द्राक्षबागा लागवडीचा खर्च अधिक असला तरी ठोक उत्पन्न देणारे पीक असल्याने भागात द्राक्ष क्षेत्र गतीने वाढले. 

सावळज पूर्व भागात दुष्काळी स्थितीमुळे भीषण पाणीटंचाई आहे. गतवर्षी आणि यंदा तालुक्याच्या पूर्व भागात पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे द्राक्ष शेती धोक्यात आली आहे. पूर्व भागात शेती व पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे. नागरिक व जनावरांना प्यायला पाणी नाही. यंदा द्राक्ष हंगामाच्या सुरवातीपासूनच टॅंकरने पाणी घालून द्राक्ष बागा जगविण्याची धडपड करत होते. 

पूर्व भागात सलग तीन वर्षांपासून निर्सगाची अवकृपा राहिली. द्राक्ष पीक शेतकऱ्यांपुढे पाण्याचे आव्हान राहिले. २०१६, २०१७, २०१८ या तीन वर्षांत पाऊस कमी झाल्याने भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली. एकरी एक ते दोन लाख गुंतवणुकीच्या द्राक्षपिकावर अस्मानी संकट कोसळले. पावसाचा अभाव व बंद सिंचन योजनांमुळे शेतकऱ्यांच्या विहिरी, बोअरची पाणी घटले. काही कोरड्या पडल्या. पाण्याअभावी यंदाच्या सप्टेंबरला छाटण्या लांबणीवर पडत आहेत. हंगाम प्रारंभीच पाणी कमी पडू लागल्याने शेतकरी बागांवर कुऱ्हाड चालवत आहेत.


इतर अॅग्रो विशेष
सांगलीत तूर खरेदी ठप्पसांगली ः जिल्ह्यात हेक्टरी २५७ किलोच तूर खरेदी...
राज्यात गारठा वाढलापुणे  : उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह...
चीनला द्राक्ष निर्यात सुरूसांगली ः जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेल्या...
‘लिंकिंग’बाबत कंपन्यांना नोटिसापुणे  : रासायनिक खतांच्या बाजारपेठेत होत...
बाजार समित्यांच्या निवडणुका होणार...मुंबई  ः राज्यातील कृषी उत्पन्न बाजार...
भाजीपाला शेतीतून पेलल्या साऱ्या...लग्नानंतर अवघ्या तीन वर्षातच पतीच्या निधनामुळे...
कांद्यावरील निर्यातबंदी हटविली;...नवी दिल्ली : चार महिन्यापूर्वी कांद्यावर...
सूक्ष्म सिंचन योजनेचा सात वर्षानंतर...अकोला ः सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना...
कोल्हापुरातील गूळ हंगाम अंतिम टप्प्यातकोल्हापूर : यंदाचा गूळ हंगाम अंतिम टप्प्यात येत...
पाणीवापराचे तंत्र समजून निर्यातक्षम...सिंचन व्यवस्थापन हा प्रयोगशील व प्रगतिशील शेतीतील...
सकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमानातील वाढीबरोबरच किमान...
थेट सरपंच निवड रद्दमुंबई: थेट सरपंच निवड रद्द करणारे विधेयक मंगळवारी...
निर्यात न करणाऱ्या कारखान्यांच्या साखर...कोल्हापूर : देशातील ज्या साखर कारखान्यांनी...
कर्जमाफीची पहिली यादी जाहीर; ६८...मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री...
राज्यात उन्हाचा चटका कायम पुणे : राज्याच्या हवामानात वेगाने बदल होत आहेत....
‘पीएम-किसान’ योजनेत शेतकऱ्यांना ५१ हजार...नवी दिल्ली: केंद्र सरकारने गेल्या वर्षी पंतप्रधान...
शेतकरी कर्जमाफीवरून विरोधकांचा गदारोळ मुंबई: शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारने एकही आश्वासन...
खारपाणपट्ट्यात पिकले गोड अॅपेल बोरअंधेरा कितना भी घना क्यू ना हो, दिया जलाना कहाँ...
कृषी शिक्षणाचा खर्चही आता लाखाबाहेर पुणे : राज्यातील खासगी कृषी शिक्षण संस्थांच्या...
निवृत्त जवानाचा अनुकरणीय शेळी-...सुर्डी (जि. सोलापूर) येथी हिरोजीराव शेळके यांना...