agriculture news in marathi grapes advisory | Agrowon

जास्तीच्या ओलाव्यामुळे येणाऱ्या समस्यावरील उपाययोजना

डॉ. आर. जी. सोमकुंवर
शुक्रवार, 22 मे 2020

गेल्या आठवड्यात बऱ्याच भागात पाऊस झाला व काही ठिकाणी पावसासोबत गारपीट झाली. या परिस्थितीमुळे बागेत ओलावा जास्त निर्माण झाला, तापमान कमी झाले व आर्द्रता वाढली. यामुळे येत असलेल्या अडचणी व त्यावरील संभावित उपाययोजना पुढीलप्रमाणे...

गेल्या आठवड्यात बऱ्याच भागात पाऊस झाला व काही ठिकाणी पावसासोबत गारपीट झाली. या परिस्थितीमुळे बागेत ओलावा जास्त निर्माण झाला, तापमान कमी झाले व आर्द्रता वाढली. यामुळे येत असलेल्या अडचणी व त्यावरील संभावित उपाययोजना पुढीलप्रमाणे...

सूक्ष्मघड निर्मितीची अवस्था 
या अवस्थेत वेलीची वाढ नियंत्रित असणे गरजेचे असते. ही वाढ नियंत्रणात ठेवण्याकरिता नत्र पूर्णपणे बंद करून पाण्याची मात्रासुद्धा जवळपास अर्ध्यापर्यंत आणली जाते. याचाच परिणाम म्हणजे वेलीत सायटोकायनीनचे प्रमाण वाढते व जिबरेलीनची मात्रा कमी होते. शरीशशास्त्रीय दृष्ट्या वेलीमध्ये सूक्ष्मघड निर्मितीसंदर्भात आवश्यक असलेले न्युक्लिक ॲसिडचे प्रमाण सुद्धा यामुळे वाढते. परिणामी काडीच्या प्रत्येक डोळ्यामध्ये सूक्ष्म घडनिर्मिती होते. या अवस्थेतील बागेमध्ये नुकत्याच झालेल्या पावसामुळे दोन ओळीतील कार्यरत नसलेल्या मुळीसुद्धा पांढरी मुळांच्या रुपातून आता कार्यरत व्हायला लागली. या भागात उपलब्ध असलेले व वापरात न आलेले अन्नद्रव्ये आता या मुळांद्वारे उचलले जाईल. परिणामी वेलीचा जोम वाढताना दिसून येईल.

उपाययोजना 

  • कोणत्याही परिस्थितीत वाढ नियंत्रणात ठेवणे हीच महत्त्वाची उपाययोजना असेल. यासाठी पालाशची उपलब्धता फवारणी तसेच जमिनीतून करणे गरेजेची असेल. आपल्या बागेत पाऊस किती झाला, व या अवस्थेत वेलीचा जोम किती आहे, यावरून पालाशची मात्रा ठरवावी.
  • वेलीमध्ये सायटोकायनीनचे प्रमाण वाढवण्यासाठी संजीवकांचा वापर यावेळी महत्त्वाचा असेल. सबकेन केल्यानंतर निघालेल्या बगलफुटीवरील पाने चारपेक्षा जास्त असली तरी ६ बीए १० पीपीएम व युरासील २५ पीपीएम या प्रमाणात फवारणी यावेळी करून घ्यावी. बरेच बागायतदार या दोन्ही संजीवकांची फवारणी एकत्र करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, असे न करता दोन फवारणीमध्ये चार ते पाच दिवसाचा फरक आवश्यक असेल.
  • स्फुरदाचा वापर यावेळी महत्त्वाचा असतो. या परिस्थितीत ०-४०-३७ या विद्राव्य खताची २ ते २.५ ग्रॅम प्रती लीटर या प्रमाणे तीन ते चार फवारण्या तीन ते चार दिवसाच्या अंतराने कराव्यात. तसेच ठिबकद्वारे स्फुरदाची उपलब्धता करावयाची झाल्यास २ ते ३.५ किलो प्रती एकर या प्रमाणे दोन ते तीन वेळा तीन दिवसाच्या अंतराने उपलब्धता करावी. जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण किती आहे, यानुसार किती वेळा खत द्यावयाचे हे ठरवावे.
  • मातीचा व पाण्याचा सामू जास्त असल्यास तसेच पाण्याचा टिडिस (टोटल डिसॉल्वड सॉल्ट्स - एकूण विद्राव्य क्षार) जास्त असलेल्या परिस्थितीतही ०-४०-३७ हे खत चांगल्या प्रकारे काम करत असल्याचे वाचनात आले. अशाच प्रकारे इतर ग्रेड्स उपलब्ध असल्यास वापरता येईल.

बगलफुटी वाढण्याची समस्या
बागेमध्ये वाढलेल्या ओलाव्यामुळे व कार्यक्षम मुळीची संख्या जास्त झाल्यामुळे पाणी व अन्नद्रव्यांची उचल वाढेल. या उपलब्ध आर्द्रता व ओलाव्यामुळे वेलीची रस तयार होण्याची व वहनाची क्रिया तितक्याचे जोमाने वाढेल. परिणामी वेलीच्या कॅनोपीवर दाब निर्माण होईल. यामुळे फक्त शेंड्याकडील फूट वाढणार नाही, तर कधी न निघणाऱ्या बगलफूटीही तितक्याच जोमाने वाढताना दिसतील. ज्या बागेत ५-६ दिवसापूर्वी सबकेन करिती काडीचे पिंचिंग केले होते, अशा ठिकाणी तयार होत असलेला मुख्य डोळा (टायगर बड) आधी फुटताना दिसेल. बरेच बागायातदार अशा परिस्थितीत बगलफुटी काढतात, त्यामुळे हा डोळ्याला वाढण्याकरिता पूर्ण वाव मिळतो.

उपाययोजना

  • पुढील एक आठवड्याकरिता बगलफुटींची आहे तशीच वाढ होऊ देणे. या वाढीस उत्तेजन देण्याकरिता युरिया २ ते ३ ग्रॅम प्रती लीटर पाणी या प्रमाणे फवारणीसुद्धा घेता येईल. शेंड्याकडील वाढ जितकी जोरात गेली, तितका मागचा डोळा (टायगर बड) फुटायचा थांबेल.
  • संजीवकांचा विशेषतः वाढविरोधकांचा वापर व पालाशचा वापर या कालावधीत टाळणे महत्त्वाचे असेल.

गारपीटमुळे तुटलेल्या काड्या
नुकत्याच झालेल्या गारपीटमुळे मालकाडी तयारहोत असलेल्या बागेत बऱ्यापैकी नुकसान झालेले दिसते. या ठिकाणी काडी कोवळी असल्यामुळे गारांचा मार बसला. काही परिस्थितीत काडीवर जखम झाली तर काही ठिकाणी काडी पूर्णपणे मोडली. ओलांड्याची ककाडी जुनी होत असल्यामुळे त्यावर गारांचा मार बसून कमी ते जास्त प्रमाणात जखमा झालेल्या दिसून येतात. या परिस्थितीत बागायतदार ओलांडा कट करण्याचा विचार करत आहेत. मात्र, ओलांडा कट करणे या वेळी हिताचे नसेल.

उपाययोजना

  • गारपीट झालेल्या बागेत त्वरीत कॉपर ऑक्सिक्लोराईड २ ग्रॅम प्रती लीटरप्रमाणे फवारणी करून घ्यावी. तिसऱ्या दिवशी ट्रायकोडर्मा ५ मि.लि. प्रती लीटर पाणी या प्रमाणे एक फवारणी करावी. यामुळे काडीवर झालेली जखम पुढील काळात पसरण्याची शक्यता कमी होईल.
  • तुटलेली काडी एक डोळा खाली येऊन कट करून घ्यावी. ज्यामुळे नवीन फूट लवकर निघण्यास मदत होईल. काडीवर जास्त प्रमाणात जखम झाली असेल, अशा परिस्थितीमध्येच काडीचा पुन्हा रिकट घेता येईल. परंतू जखम जास्त नसल्यास शक्यतोवर एक डोळा खाली जाऊन कट करावे. त्यातून वाढ करून घ्यावी.
  • ज्या ठिकाणी कॅनोपी पूर्ण होती, अशा ठिकाणी काडीवर जखम कमी झाली असेल, मात्र बगलफुटींवर मार बसला असावा. अशा परिस्थितीत बगलफुटीचा एक ते दोन पान राखून शेंडा मारून घ्यावा. यानंतर निघालेल्या एक पान अवस्थेत स्फुरद व पालाशयुक्त खतांची एखादी फवारणी करून घ्यावी. ( उदा. ०-४०-३७ हे विद्राव्य खत एक ते दीड ग्रॅम प्रती लीटर पाणी.)
  • ज्या बागेत जोम वाढत आहे, अशा ठिकाणी पालाश २.५ ते ३ ग्रॅम प्रति लीटरप्रमाणे फवारणी करता येईल.

संपर्क- डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८
(संचालक, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.)


इतर फळबाग
आधुनिक पद्धतीने करा संत्रा लागवडविशिष्ट अशी आंबट गोड चवीबरोबर प्रतिकारशक्ती...
उन्हाळ्यातील केळी बागेचे व्यवस्थापनउष्णलाटांमुळे बागेतील तापमान वाढते, आर्द्रता कमी...
नियोजन संत्रा बाग लागवडीचे..हलक्‍या जमिनीत निचरा चांगला होतो. मात्र या...
असे करा द्राक्षबागेतील स्ट्रोमॅशिअम...खोडकिडीचे प्रौढ भुंगेरे साधारणतः मान्सूनपूर्व,...
दर्जेदार पेरू, सीताफळाच्या उत्पादनावर भरमाझ्याकडे पेरू आणि सीताफळाची लागवड आहे. पेरूच्या...
गावोगावी फिरून विकली पंधरा टन द्राक्ष कोरोनामुळे बाजार समित्या बंद झाल्या, व्यापारीही...
जास्तीच्या ओलाव्यामुळे येणाऱ्या ...गेल्या आठवड्यात बऱ्याच भागात पाऊस झाला व काही...
केळी पीलबागेचे व्यवस्थापन, खर्च कमी... माझी काळी कसदार दहा एकर शेती आहे. दोन...
आरोग्यदायी कलिंगडकलिंगडात जीवनसत्त्व अ आणि क भरपूर प्रमाणात असून...
थेट ग्राहकांना विकली २० टन द्राक्ष   बागेत द्राक्ष घड काढणीला आले आणि कोरोनाचे...
‘हापूस'च्या नऊ हजार पेट्यांची ...हंगाम तोंडावर आला असतानाच कोरोनाने देशभरात पाय...
सीताफळातून लाभले आर्थिक स्थैर्यपांगारे (ता.पुरंदर,जि.पुणे) येथील प्रयोगशील...
लिंबूवर्गीय फळपीक सल्लाशेतीमध्ये काम करण्याची परवानगी असली तरी ते काम...
डाळिंब सल्लामृग बहार / अर्ली मृग बहार (जून - जुलै...
फळझाडांचे आच्छादन, ठिंबक सिंचन महत्वाचेउन्हाळ्यात फळबागांना पाण्याची टंचाई जाणवते. अशा...
संत्रा पिकाची पाने पिवळी पडण्याची कारणे...संत्रा बागेत पाने पिवळी पडण्याची समस्या अनेक...
द्राक्षबागेतील अवस्थांनुसार व्यवस्थापनसध्याच्या काळात बागेतील घडांच्या स्थितीनुसार...
असे करा दर्जेदार चिकू उत्पादनाचे नियोजनचिकू फळांना योग्य दर मिळण्यासाठी योग्य आकार व...
द्राक्षबागेतील वेगवेगळ्या अवस्थांनुसार...सध्याच्या परिस्थितीमध्ये द्राक्ष बागेत वेगवेगळ्या...
अवकाळी पावसानंतर लिंबूवर्गीय फळबागेचे...स ध्या अनेक जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह...