agriculture news in marathi grapes advisory | Agrowon

द्राक्ष पीक : पावसामुळे उद्भवलेल्या समस्या, उपाययोजना

डॉ. आर. जी. सोमकुंवर
गुरुवार, 22 ऑक्टोबर 2020

सध्याच्या परिस्थितीचा विचार करता, सर्व द्राक्ष विभागामध्ये पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जमिनीमध्ये मुळांच्या कक्षेत पाणी साचले आहे. त्यामुळे मुळांचे कार्य जवळपास थांबले असल्याचे चित्र आहे. पावसामुळे द्राक्ष बागेत आर्द्रता वाढलेली आहे, त्यामुळे खालील परिस्थितीचा सामना करावा लागेल.
 

सध्याच्या परिस्थितीचा विचार करता, सर्व द्राक्ष विभागामध्ये पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जमिनीमध्ये मुळांच्या कक्षेत पाणी साचले आहे. त्यामुळे मुळांचे कार्य जवळपास थांबले असल्याचे चित्र आहे. पावसामुळे द्राक्ष बागेत आर्द्रता वाढलेली आहे, त्यामुळे खालील परिस्थितीचा सामना करावा लागेल.

मुळांची कार्यक्षमता संपलेली आहे
द्राक्ष वेलीची मुळे कार्यरत राहण्याकरिता जमिनीमध्ये वापसा असणे गरजेचे असते. वापसा स्थितीमध्ये  जमिनीत मोकळी हवा खेळत राहील व पांढरी मुळे तयार होतात. हीच पांढरी मुळे जमिनीतील उपलब्ध पाणी व अन्नद्रव्ये शोषून वेलीस पुरवठा करेल. मात्र, सद्यस्थितीमध्ये बागेतील मातीमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे मुळे काळी पडली असावी किंवा कुजलेली असावी. अशी कुजलेली मुळे कोणत्याही कामाची राहत नाही. उलट ती नुकसानकारक ठरतात. वेलीची मुळे सक्षम असल्यास, ती क्षमतेप्रमाणे किंवा उपलब्ध परिस्थितीनुसार संजीवकांची निर्मिती करतात आणि त्याचा पुरवठा वेलीला केला जातो. सध्याच्या पाऊस आणि मातीमध्ये पाणी साचल्याच्या स्थितीमध्ये मुळांना त्यांची कार्ये करणे शक्य होणार नाही. 

उपाययोजना 

  • द्राक्ष बागेत दोन ओळींच्या मध्यभागातील माती काढून किंवा चरी घ्यावी. बोदामधील पाणी निघून जाण्याकरिता उपाययोजना कराव्यात. 
  • पावसाळी परिस्थितीमुळे वेलीवरील पाने पिवळी पडलेली दिसून येतील. म्हणजेच काही अन्नद्रव्यांची कमतरता वेलीवर दिसेल. अशा परिस्थितीत जमिनीतून ड्रिपद्वारे खतांची उपलब्धता करण्यापेक्षा फवारणीद्वारे उपलब्धता करावी. पिकावरील कमतरतेनुसार फवारणीच्या माध्यमातून योग्य त्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची पूर्तता करावी. 
  • पाऊस संपल्यानंतर लगेच बोद खोदण्याची घाई करू नये. जमीन वापश्यामध्ये आल्यानंतरच बोद मोकळे करावेत. तसेच बोदाच्या बाजूने ट्रॅक्टरच्या साह्याने चारी घेतल्यास पांढरी मुळी तयार होण्यास मदत होईल.
  • वापसा परिस्थिती आल्यानंतरच अन्नद्रव्यांची पूर्तता जमिनीतून करावी. भारी जमीन ओली असताना, अशी कार्यवाही केल्यास जमीन कडक होईल व भेगा पडतील. 

घड जिरण्याची समस्या 
द्राक्ष वेलीमध्ये फळ छाटणीनंतर जोमदार व सक्षम घड निघण्याच्या दृष्टीने बागेतील वातावरण कोरडे असावे. मात्र, डोळा फुटण्याच्या अवस्थेत (पोंगा अवस्था) जास्त पाऊस झाल्यास किंवा ढगाळ वातावरणामुळे वेलीमध्ये अचानक जिबरेलिन्सचे प्रमाण वाढते. परिणामी वेलीचा जोम वाढतो. सध्या बाग फक्त पोंगा अवस्थेत असल्यामुळे जोम जरी प्रत्यक्षात दिसत नसला तरी, अप्रत्यक्षपणे त्या घडाचे रूपांतर बाळीमध्ये किंवा बाळी घडात होते. अशा परिस्थितीमुळे मागील हंगामात चांगला तयार झालेला घड वाया जातो.  

उपाययोजना 

  • वेलीमध्ये सायटोकायनीनचे प्रमाण वाढण्यासाठी सायटोकायनीनयुक्त संजीवकांची फवारणी करावी.  
  • वेलीचाजोम नियंत्रणात ठेवण्यासाठी पालाशची फवारणी उपयुक्त ठरते. डोळे कापसलेल्या परिस्थितीत १ ते १.५ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे पालाशची फवारणी करावी.

बागेतील फळ कुजेची समस्या
फळ छाटणीनंतर काडीवरील डोळे फुटतात. पाच पानांच्या अवस्थेत द्राक्ष घड बाहेर येतो. प्रीब्लुम अवस्थेतील या नाजूक वयातील घडांवर पावसाचे पाणी साचून राहिल्यास कुजेची समस्या निर्माण होते. पावसाळी वातावरणात वेलीच्या वाढीचा जोम जास्त असतो. अशा परिस्थितीमध्ये पानांची लवचिकता सुद्धा वाढते. या परिस्थितीत वेल हवेतून अन्नद्रव्य शोषून घेते. पानांची पुन्हा लवचिकता वाढण्यास मदत होते.  वेलीवर आर्द्रता वाढते. यापूर्वी उपलब्ध असलेल्या डाऊनी मिल्ड्यूच्या बिजाणूंच्या वाढीस प्रोत्साहन मिळते. त्यामुळे कूज आणि डाऊनी मिल्ड्यू या दोन्ही रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो.

उपयायोजना  

  • फेलफुटी त्वरित काढून घ्याव्यात. असे केल्यास, कॅनोपीमधील गर्दी कमी होऊन हवा खेळती राहण्यास मदत होईल. परिणामी बागेतील आर्द्रता कमी होऊन रोगांचा प्रादुर्भाव टळेल.
  • रोग नियंत्रणाकरिता फवारणी केल्यास त्याचे कव्हरेज चांगले मिळेल. परिणामी रोग नियंत्रणात राहण्यास मदत होईल. 
  • बागेत वाढ नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीने पोटॅशची उपलब्धता जमिनीतून (१ ते १.५० किलो प्रति हेक्टर ३ ते ४ दिवस) व फवारणीतून (१.५ ते २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी) करावी.

संपर्क : डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८
(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.


इतर ताज्या घडामोडी
ट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...
जनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...
खानदेशात अत्यल्प पेरणीजळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा...
नांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची...नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर...
परभणीत १२.६४ टक्के पेरणीपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात...
देशात वीज पडून दरवर्षी दोन हजार...पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ...
कांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणानाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची...
अन्नद्रव्यांवरून खतांचे व्यवस्थापन...गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध...
आंबेओहळ प्रकल्पात  ३० टक्के पाणीसाठाकोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ...
वनौषधी पानपिंपरीचे दर वाढल्याने...अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट,...
नुकसान टाळण्यासाठी  मिश्र पिकांवर भरराळेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली...
यवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्तयवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे...
सांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २...
सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज...वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या...
पुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर...
प्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र; ...मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...
काळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरीवर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री...
संत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी...अमरावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार...
मॅग्नेट ः फलोत्पादन पिकांसाठी एकात्मिक...राज्यातील कृषी हवामान विभागनिहाय फळे, भाजीपाला व...
शेतीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी...हरितक्रांतीनंतर काही दशकांमध्ये विपरीत परिणाम...