Grapes and pomegranates in Partur taluka were excluded from compensation
Grapes and pomegranates in Partur taluka were excluded from compensation

परतूर तालुक्‍यातील द्राक्ष, डाळिंब नुकसान भरपाईतून वगळले

जालना : परतूर तालुक्‍यातील डाळिंब, द्राक्ष फळपीक शासनाच्या नुकसान भरपाईत नसल्याची बाब पुढे आली आहे. क्षेत्र आहे, नुकसान झाले. मात्र, शासनाच्या नुकसान भरपाईच्या कक्षेत का आलो नाही, असा प्रश्‍न आता शेतकरी उपस्थित करीत आहेत.

जालना  : परतूर तालुक्‍यातील डाळिंब, द्राक्ष फळपीक शासनाच्या नुकसान भरपाईत नसल्याची बाब पुढे आली आहे. क्षेत्र आहे, नुकसान झाले. मात्र, शासनाच्या नुकसान भरपाईच्या कक्षेत का आलो नाही, असा प्रश्‍न आता शेतकरी उपस्थित करीत आहेत.  

सततचा पाऊस, अतिवृष्टी, पूर आदींमुळे जिल्ह्यातील खरीप व फळपिकांचे मोठे नुकसान झाले. माहितीनुसार प्रत्यक्ष पेरणी झालेल्या ६ लाख ५५ हजार ३३७ हेक्‍टरपैकी ४ लाख २५ हजार २०५ हेक्‍टरवरील खरीप पिकांचे ३३ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झाले होते.

जिल्ह्यातील २३ हजार८०७ शेतकऱ्यांच्या १६४८९ हेक्‍टरवरील फळपिकांचे नुकसान झाले. त्याची माहिती अपेक्षित निधीसह शासनाला कळविण्यात आली होती.  माहितीनुसार, जिल्ह्यातील जालना तालुक्‍यातील  चिकू, संत्रा, लिंबू, बदनापूर तालुक्‍यातील पपई, चिकू, संत्रा, लिंबू, केळी, भोकरदन तालुक्‍यातील द्राक्ष, पपई, पेरू, मोसंबी, चिकू, संत्रा, सीताफळ, लिंबू केळी, जाफराबाद तालुक्‍यातील द्राक्ष, पपई, पेरू, चिकू, संत्रा, सीताफळ, लिंबू, केळी, परतूर तालुक्‍यातील द्राक्ष, डाळिंब, मोसंबी, चिकू, संत्रा, सीताफळ, मंठा तालुक्‍यातील पेरू, चिकू, संत्रा,  सीताफळ, लिंबू, केळी, अंबड तालुक्‍यातील, पेरू, चिकू, संत्रा, सीताफळ, लिंबू, केळी, घनसावंगी तालुक्‍यातील पेरू, लिंबू ही फळपिक नुकसान भरपाईतून वगळण्यात आली. 

सातोना येथील प्रगतिशील शेतकरी बाळासाहेब बीडवे म्हणाले, ‘‘डाळिंबांच्या ३ एकर २० गुंठे बागेतील हस्त बहार अतिपावसाने पूर्ण: गळून गेला. याशिवाय त्यांच्या ३ एकर २० गुंठे द्राक्ष बागेतील ५० टक्‍के नुकसान झाले. शासनाने खरीप पिकांसाठी हेक्‍टरी १० हजार, तर फळपिकांसाठी हेक्‍टरी २५ हजाराची मदत जाहीर केली. त्यातून नुकसान काही अंशी भरून निघेल, असे वाटत होते. परंतु, द्राक्ष व डाळिंब पीक नुकसान भरपाईतून वगळल्याने वंचित राहावे लागत आहे.’’ 

‘परिसरातील ८० ते ९० टक्‍के द्राक्ष बागा अतिपाऊस  व हवामानाच्या बदलत गेल्या. ज्या पिकासाठी कर्ज घेतले, त्या पिकांवर ते खर्च केले. पण पीक हातचे गेले. आता उचललेल्या कर्जाची फेड कशी करावी. पिके गेली, तरी कर्ज भरावंच लागतं. शासनाची नुकसानभरपाई अजून पोहोचली नाही. - चंद्रकांत क्षीरसागर, द्राक्ष उत्पादक शेतकरी, कडवंची

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com