agriculture news in Marathi grapes chopping pending due to variation in weather Maharashtra | Agrowon

सांगली जिल्ह्यात द्राक्ष फळ छाटणी लांबणीवर 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात अर्ली फळ छाटणीस प्रारंभ होतो.  फळ छाटणीची तयारी पूर्ण झाली असली तरी यंदाच्या द्राक्ष हंगामावर बदलत्या वातावरचे सावट निर्माण झाले आहे.

सांगली ः जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात अर्ली फळ छाटणीस प्रारंभ होतो.  फळ छाटणीची तयारी पूर्ण झाली असली तरी यंदाच्या द्राक्ष हंगामावर बदलत्या वातावरचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून छाटणीस प्रारंभ होण्याचा अंदाज द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

जिल्ह्यात सुमारे १ लाख २५ हजार एकर क्षेत्रावर द्राक्ष बागेची लागवड आहे. वास्तविक पाहता दरवर्षी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात अर्ली फळ छाटणी घेण्यास सुरुवात होते. ही फळ छाटणी मिरज तालुक्याच्या पूर्व भागात होते. सप्टेंबरच्या पंधरा दिवसात १० ते१५ टक्के क्षेत्रावरील फळ छाटणी पूर्ण होते.

त्यानंतर फळ छाटणीस गती येते. सप्टेंबर अखेर ६० ते ७० टक्के फळ छाटणी पूर्ण होते. उर्वरित छाटणी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होते. मुळात द्राक्ष बाजारपेठेत लवकर आली की त्याला अपेक्षित दर मिळतो. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी आगाप फळ छाटणीस प्राधान्य देतो. नाताळ सणाच्या दरम्यान द्राक्षे बाजारात विक्रीस येतात.

मात्र, गेल्यावर्षी अतिपावसाने द्राक्षाचे मोठे नुकसान झाले. उत्पादनातही घट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागला. त्यानंतर कोरोनाचे संकट आले. त्यातूनही मार्ग काढत शेतकऱ्यांनी द्राक्षाची विक्री केली. यंदाही हवामान खात्याने अतिवृष्टी होईल असा अंदाज व्यक्त केला होता. त्यामुळे शेतकरी धास्तावले. परंतु पावसाला उशिरा सुरुवात झाली.

द्राक्ष पट्ट्यातही मुसळधार पाऊस झाला. गेल्यावर्षीसारखी परिस्थिती निर्माण होणार का? असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात येत होता. परंतु पावसाने उघडीप दिली. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा दमदार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतली. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी सप्टेंबरमध्ये फळ छाटणीचे नियोजन सुरु केले.

ऑक्टोबरमध्ये होईल प्रारंभ
गतवर्षी परतीच्या पावसाने द्राक्ष बागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने फळ छाटणी थांबवली. त्यातच मजुरांचा प्रश्न भेडसावत होता. यंदाच्या द्राक्ष हंगामावर सातत्याने बदलत्या वातावरणाचे सावट असल्याने सप्टेंबरमध्ये सुरु होणारी फळ छाटणी निम्मा महिना संपला तरी अजून सुरु झाली नाही. यामुळे फळ छाटणी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरु करण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी केले आहे.

प्रतिक्रिया
गेल्यावर्षी पावसाने बागांचे मोठे नुकसान झाले. त्यात यंदाही द्राक्ष पिकाला पोषक असे वातावरण नाही. द्राक्ष हंगामावर बदलत्या वातावरणाचे सावट असल्याने शेतकरी हवामानाचा अंदाज घेत आहेत.
- सतीष जाधव, द्राक्ष उत्पादक शेतकरी, सोनी, ता. मिरज


इतर अॅग्रो विशेष
तिढा सुटावा लवकर!मागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...
कांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...
वऱ्हाडातील मोठे, मध्यम प्रकल्प तुडुंबअकोला ः वऱ्हाडात बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने...
मध्य महाराष्ट्र, कोकणात वादळी पावसाचा...पुणे ः महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर...
पावसाचा कहर, पिकांची नासाडी सुरुचपुणे ः राज्यात पावसाचा जोर वाढतच आहे. रविवारी (ता...
सांगली : डाळिंब बागांचे ५० कोटींहून...सांगली ः डाळिंबाला अगोदर निसर्गाची साथ मिळाली...
`क्रॉपसॅप`मध्ये ३३ कोटींची कपात पुणे: कोविड १९ मुळे ग्रामीण भागात तयार झालेल्या...
पशुपालन,दूध प्रक्रियेतून वाढविला नफाशिरसोली (जि.जळगाव) येथील डिगंबर रामकृष्ण बारी...
संरक्षित शेतीतून शाश्वत उत्पादनाकडे...वाढत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि बदलते हवामान...
बळीराजालाच बळी देण्याचा प्रकार?शेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...
नाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...
बुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१...बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची...