अवकाळी पावसामुळे द्राक्षबागांवर संकट

चालू वर्षी द्राक्ष हंगाम अडचणीचा असताना मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे. उत्पादन कमी होणार हे नक्की असताना साखर उतरण्याच्या अवस्थेत असलेल्या बागांना तडे गेले आहेत. तर दुसरीकडे डाऊनी व भुरीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. - भारत निमसे, द्राक्ष उत्पादक, मानूर, ता. नाशिक
grape spraying
grape spraying

नाशिक : अतिवृष्टीच्या तडाख्यात द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीत हंगाम पुन्हा उभा राहिला. कामे सुरू होऊन थंडीमध्ये वाढ झाल्याने डाऊनीनंतर भुरीचा प्रादुर्भाव दिसून येत असताना बुधवारी (ता. २५) जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे द्राक्षबागांवर अवकाळीचे संकट आले आहे.  जिल्ह्यात निफाड, चांदवड, दिंडोरी, नाशिक, येवला, सिन्नर तालुक्यांमध्ये तुरळक प्रमाणात जरी पाऊस झाला असला, तरी द्राक्ष बागांमध्ये तयार होत असलेल्या घडांचे नुकसान होण्याची भीती द्राक्ष उत्पादकांनी बोलून दाखवली आहे. पट्ट्यात पडलेल्या अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादकांचा जीव टांगणीला लागला आहे.  अनेक बागांमध्ये द्राक्ष पाणी उतरण्याच्या अवस्थेत आहेत. अशा बागांमध्ये ३० टक्के नुकसान झाले आहे. अगोदरच वाढलेली थंडी व धुक्यामुळे डाऊनी व भुरीचा प्रादुर्भाव कायम आहेच. त्यात हा अवकाळी पाऊस द्राक्ष उत्पादकांसाठी बाधक ठरला आहे. झालेल्या पावसामुळे व वातावरण ढगाळ असल्याने बागांवर फवारणी करण्यासाठी द्राक्ष उत्पादकांची धावपळ उडाली आहे. 

प्रतिक्रिया पाऊस कमी असला तरी आता द्राक्षबागांमधील नुकसान वाढणार आहे. घडांमध्ये कुज, तडे जाण्याचे प्रमाण वाढत आहे. तापमानात होणाऱ्या बदलामुळे द्राक्ष बागांवर विविध रोगांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आता उत्पादन खर्चात वाढ होईल व उत्पन्न घटणार.  - राजेंद्र कळमकर, द्राक्ष उत्पादक, मोहाडी, ता. दिंडोरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com