agriculture news in marathi, grapes crop damage due to rain, pune, maharashtra | Agrowon

इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌ध्वस्त

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

फुलोऱ्यातील द्राक्ष बागांना मोठा फटका या पावसाने दिला असून, फवारण्या करूनही उपयोग होईल अशी चिन्हे नाहीत. सुप्तावस्थेतील डाऊनीसाठी पोषक काळ असल्याने मणी व घडांवरही त्याचा फटका दिसू लागला आहे.
- भारत शिंदे, उपाध्यक्ष, बारामती तालुका फलोत्पादक संघ

भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील चार हजार एकरावरील द्राक्षबागांना गेल्या पाच दिवसांपासून होत असलेल्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. फुलोऱ्याच्या स्थितीतील अंदाजे १२०० एकर द्राक्षबागा उद्‌ध्वस्त झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

इंदापूर तालुक्‍यातील बोरी, काझड, शिंदेवाडी, भरणेवाडी, शेळगाव, निमगाव केतकी, वरकुटे, अंथुर्णे, कळस, बिरंगुडी, कडबनवाडी अशा विविध भागांत द्राक्षबागांचे मोठे क्षेत्र आहे. ८ जुलैपासून या तालुक्‍यात तीन टप्प्यांत द्राक्षबागांची छाटणी केली जाते व बहार धरला जातो. मात्र ८ जुलैपासून ते ५ ऑक्‍टोबरपर्यंत छाटणी झालेल्या बागांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे. 

इंदापूर तालुक्‍यात हंगामातील अंदाजे २०० एकरांवरील द्राक्षबागा असून त्यातील घडांतील मणी या पावसाने फुटले आहेत. या बागांचे पूर्णतः नुकसान झाले असून द्राक्ष उत्पादक हवालदिल झाले आहेत. पूर्वहंगामी या बागांबरोबरच ज्या बागा सध्या फुलोऱ्यात व घड तयार होण्याच्या स्थितीत आहेत, त्या बागांना डाऊनीचा मोठा फटका बसला असून मणी व घडांवरही डाऊनीचा प्रादुर्भाव या वेळी पहिल्यांदाच दिसत असल्याची माहिती द्राक्ष उत्पादकांनी दिली. 

या वर्षी नुकसान प्रचंड होणार आहे. २०१७ नंतर द्राक्ष उत्पादकांचा खर्च तर वाया जाणारच, मात्र पुन्हा कर्जाच्या खाईत जातील अशी भीती वाटते, असे बोरी (ता. इंदापूर) येथील द्राक्ष निर्यांतदार 
रामचंद्र शिंदे यांनी सांगितले.

 


इतर ताज्या घडामोडी
पदोन्नती प्रकरणात ‘पंदेकृवि’ने काढले...अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
महात्मा फुले कृषी विद्यापीठात आजपासून...नगर  ः कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या...
महाराष्ट्रात २२ जिल्ह्यांमध्ये `कोरोना`...पुणे : निम्म्याहून अधिक महाराष्ट्राला जेमतेम २८...
केळी पिकवून विकण्यासाठी अखेर...परभणी : ‘लॅाकडाऊन’मुळे केळीच्या दरात मोठी घसरण...
कोल्हापुरात वादळी वाऱ्यासह पाऊस कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी (ता.५) सायंकाळी...
जनावरांतील उष्माघाताचे नियंत्रणउन्हाच्या संपर्कात आल्यामुळे जनावरांच्या शरीराचे...
अकोल्यात भाजीपाला, फळविक्रीची ११०...अकोला ः सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्यातील...
‘वीज दर कपातीत शेतकऱ्यांवरील अन्याय दूर...अकोला ः राज्य वीज नियामक आयोगाने नुकतीच उद्योग,...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात फुले...नांदेड : ‘लॅाकडाऊन’मुळे नांदेडसह अन्य ठिकाणच्या...
फूल विक्रीचा व्यवसाय डबघाईस; फेकून...शिरपूरजैन, जि. वाशीम : येथील फूल उत्पादक शेतकरी...
बेदाणा निर्मितीसाठी आवश्यक रसायने...नाशिक : द्राक्षापासून बेदाणा निर्मितीसाठी...
नाशिक जिल्ह्यात बेदाणा निर्मितीच्या...नाशिक : ऐन द्राक्ष हंगामाच्या अंतिम टप्प्यात...
मराठवाड्यात फळे, भाजीपाल्याची ८१ हजार...औरंगाबाद : एकीकडे दररोज सकाळीच भरणाऱ्या किरकोळ...
माळीनगरमध्ये आता नीरापासून गुळ उत्पादन लवंग, जि. सोलापूर : सध्या नीरा उत्पादनाचा हंगाम...
आरोग्य कर्मचाऱ्यासांठी सुरक्षेची पूर्ण...नाशिक : जिल्हा सामान्य रुग्णालयातील ‘कोरोना’...
अमरावती बाजार समितीची ३२ अडत्यांवर...अमरावती ः किरकोळ भाजी विक्री न करण्याचे आदेश...
‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यातील महत्वाचा...मुंबई : ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यातील महत्वाचा,...
सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे...सोलापूर : कोरोना विषाणु संसर्गाच्या...
इस्लामपूरकरांना भाजीपाल्यासह साखरवाटप नवेखेड, जि. सांगली : बोरगाव (ता. वाळवा)...
राज्यातील अतिरिक्त १० लाख लिटर दूध...संगमनेर, जि.नगर : कोरोना विषाणूचा...