पाणीटंचाईने द्राक्ष बागा अडचणीत

पाणीटंचाई
पाणीटंचाई

सांगली ः पाऊस पडला नाही, पाणी नाही. पन्नास किलोमीटरवरून पाणी आणायची तयारी असली तरी पाणीच नाही. त्यामुळे करायचे काय? असा प्रश्न द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे. परिमाणी, छाटणी रखडली. परतीचा पाऊस झाला तरच दहा ऑक्टोबरनंतर छाटणी घेणार असे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.  जत तालुक्याच्या पूर्व भागात सुमारे ४ हजार एकर द्राक्षाची शेती आहे. या भागात दर्जेदार बेदाणानिर्मिती केला जाते. तसेच, द्राक्षेही चांगल्या दर्जाची तयार होतात. गेल्यावर्षी देखील पाणी प्रश्न होताच. मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती या गावातून एक टॅंकर चार हजार रुपयाप्रमाणे २० हजार लिटर पाणी विकत घेऊन द्राक्ष बागेला घालून बागेतून उत्पादन घेतले होते. मात्र, उत्पादनात १५ ते २० टक्क्यांनी घट आली होती. तर काहींनी बागा जगविल्या. यात त्यांना आर्थिक फटका बसला. गेल्या तीन वर्षांपासून जत तालुक्यातील पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. यंदाही पावसाळा संपत आला तरी जोरदार पाऊस झाला नाही. परिमाणी कुपनिलाका, विहिरी कोरड्याच आहेत. गेल्यावर्षी आसपासच्या गावातून पाणी मिळत होते. मात्र, यंदा गेल्यावर्षीपेक्षा बिटक परिस्थिती निर्माण झाली आहे. जत तालुक्यात लघू आणि मध्यम प्रकल्प असे मिळून २८ आहेत. मात्र, यातील ६ ते ७ प्रकल्पांत अत्यल्प पाणीसाठा आहे. तर उर्वरित प्रकल्प कोरडे आहेत. सध्या जत तालुक्यात पाणी नसल्याने कर्नाटकातून पाणी आणण्याचा विचार आहे. परंतु, कर्नाटकातून पाणी देण्यास तिथल्या जनतेने नकार दिला आहे. पाणी मिळत नसल्याने छाटणी रखडलीच आहे. छाटणीसाठी परतीच्या पावसाची प्रतीक्षा आहे. परतीचा पाऊस झाला नाही, तर बागा जगवायच्या कशा? असा प्रश्न द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे. जवळपास पाणी कुठेच नाही, त्यामुळे द्राक्ष शेती धोक्यात आली आहे. बागा वाचविण्यासाठी पाणी कुठून आणायचे असा प्रश्न पडला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com