agriculture news in Marathi grapes damage by hailstorm Maharashtra | Agrowon

द्राक्ष आगारावर गारपिटीचा आघात 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 मार्च 2021

जिल्ह्यातील कडवंची परिसरातील नाव्हा, वरुड, धारकल्याण, कडवंची, नंदापूर आदी गावशिवारातील अनेक द्राक्ष बागांना बुधवारी (ता २४) रात्री गारपिटीचा तडाखा बसला.

जालना : जिल्ह्यातील कडवंची परिसरातील नाव्हा, वरुड, धारकल्याण, कडवंची, नंदापूर आदी गावशिवारातील अनेक द्राक्ष बागांना बुधवारी (ता २४) रात्री गारपिटीचा तडाखा बसला. उत्पादन हाती येणाऱ्या बागांतील पीक काही क्षणांतच गारपिटीने होत्याचे नव्हते केल्याची माहिती द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी दिली. 

कडवंची, धारकल्याण, वरुड, नाव्हा, नंदापूर, अंभोरेवाडी, वखारी आदी जवळपास दहा ते पंधरा गावांत सुमारे ५००० एकरांवर द्राक्ष बागा क्षेत्र विस्तारले आहे. यंदाचा हंगाम द्राक्ष हंगाम सातत्याने प्रतिकूल परिस्थिती सह संकटाची मालिका घेऊन आला. आधी बागा न फुटल्याने आधीच द्राक्ष उत्पादकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यात आता उत्पादनक्षम असलेल्या बागांवर गारपिटीचा आघात झाल्याने द्राक्ष उत्पादकांची कंबरडे मोडले आहे.

बुधवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास काही वेळ झालेल्या गारपिटीने द्राक्षाचे घड जमिनीवर पाडले. तर वेलींना असलेल्या घडातील द्राक्षमणी मोठ्या प्रमाणात दुखापतग्रस्त केले. याशिवाय गारपीट पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे काही द्राक्ष बागांचे आधारवडही कोसळले. 

वरुड शिवारात द्राक्ष पिकाबरोबरच हरभरा, गहू या काढणीला आलेल्या रब्बी पिकांसह भाजीपाला, कांदा आदी पिकांचे ही मोठे नुकसान झाल्याची माहिती शेतकरी व कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. तालुका कृषी अधिकारी संतोष गाडे यांच्यासह कडवंची, वरुड आदी गावचे कृषी सहायक, तलाठी प्रशासकीय यंत्रणेचे घटक गुरुवारी (ता २५) सकाळीच प्रत्यक्ष पाहणी साठी वरुड, धारकल्याण, नंदापूर, कडवंची, नाव्हा आदी परिसरांत फिरत होते. प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचा प्राथमिक अंदाज वरिष्ठ प्रशासनाला कळविला जाणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी संतोष गाडे यांनी दिली. विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचा तत्काळ लाभ मिळण्याची मागणी शेतकरी वर्गामधून होत आहे. 

प्रतिक्रिया
जवळपास तीन एकरातील काढणीला आलेल्या द्राक्ष बागेला गारपिटीचा तडाखा बसला. केवळ माझ्याच नव्हे तर गावशिवारातील अनेक बागांचे गारपिटीने मोठे नुकसान केले. 
- सोपान क्षीरसागर, द्राक्ष उत्पादक, कडवंची 

जवळपास अडीच एकरांतील द्राक्ष बागेतून किमान ३०० क्विंटल द्राक्ष उत्पादन होणे अपेक्षित होते. बुधवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास काही क्षणांत गारपिटीने माझ्या बागेतील द्राक्षांचा जमिनीवर सडा केला. जे द्राक्षमणी घडाला उरले तेही फुटले आहेत. नुकसान झालेल्या क्षेत्रापैकी सव्वा एकराचा विमा उतरवू शकलो, तर सव्वा एकर क्षेत्र बिना विम्याचे आहे. काही कळायच्या आत मोठे नुकसान झाले. 
- बाबूराव अंभोरे, अंभोरेवाडी, जि. जालना 


इतर अॅग्रो विशेष
मॉन्सूनच्या प्रवाहाला पोषक स्थिती पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अरबी...
महिनाभरातच गाईच्या दूधदरात ८ रुपये कपात नगर ः कोरोना लॉकडाउनमुळे दुधाची मागणी कमी...
काबुली हरभऱ्याच्या दरात घसरणीची शक्यता...नवी दिल्ली ः देशात यंदा काबुली हरभऱ्याचे उत्पादन...
ग्राम कृषी विकास समित्या स्थापन करा :...पुणे ः कोरोना लॉकडाउनमुळे राज्याच्या खरीप...
पीकविम्यासाठी राज्यात बीड मॉडेल ः ...अमरावती : प्रशासकीय खर्च आणि दहा टक्के नफा अशी...
उसाचे गाव बेले रेशीम शेतीत चमकलेकोल्हापूर जिल्हयात बेले (ता. करवीर) या छोट्या...
अल्पभूधारकाचा शास्त्रीय दुग्ध...नाशिक जिल्ह्यातील कोळगाव (ता. निफाड) येथील...
एक लाख हेक्टरवर फळबागांचे उद्दिष्ट पुणे ः कोविड १९ च्या साथीची स्थिती राज्यभर असली...
‘महाडीबीटी’त आता बियाण्यांचाही समावेश पुणे : राज्य शासनाने महाडीबीटी पोर्टलमध्ये आता...
पूर्वमोसमीचा प्रभाव कमी होणार पुणे ः मध्य प्रदेशचा आग्नेय भाग आणि परिसरात ते...
तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पुणे : राज्यातील काही भागांत पूर्वमोसमी पावसाचा...
हापूसच्या ४० हजार पेट्या थेट...रत्नागिरी ः उत्पादक शेतकरी ते थेट ग्राहक ही साखळी...
कडधान्य उत्पादनात ६५ टक्के वाढ पुणे ः देशातील कडधान्य उत्पादनात २००७-०८ पासून...
घरपोच चारा, दुग्धोत्पादन यातून अरोली...नागपूर जिल्ह्यातील अरोली गावातील पंचेचाळीस...
विदर्भात पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व कोकणच्या काही...
कृषी सेवा केंद्रचालक, कर्मचाऱ्यांना लस...पुणे ः राज्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेकडो टन कलिंगडे...सिंधुदुर्गनगरी : कोरोना निर्बंधामुळे जिल्ह्यातील...
खानदेशात केळीची कमी दरात खरेदी जळगाव ः खानदेशात नवती केळी बागांची काढणी सुरू...
निर्यातीच्या केळीला १३०० रुपये दर जळगाव ः खानदेशातून आखातात किंवा परदेशात केळी...
शेतीशाळांची ‘एसओपी’ निश्‍चित पुणे ः शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या शेतीशाळांसाठी...