द्राक्षबाग नुकसानभरपाई अडकली लालफितीत

वांगी (ता. कडेगाव) येथील दोन शेतकऱ्यांची प्रत्येकी एकरभर द्राक्ष बाग दोन महिन्यांपूर्वी पडलेल्या हलक्या पावसाने द्राक्षघड कुजल्याने उद्ध्वस्त झाली.
grapes damage
grapes damage

वांगी, जि. सांगली : वांगी (ता. कडेगाव) येथील दोन शेतकऱ्यांची प्रत्येकी एकरभर द्राक्ष बाग दोन महिन्यांपूर्वी पडलेल्या हलक्या पावसाने द्राक्षघड कुजल्याने उद्ध्वस्त झाली. यातील एकाने द्राक्ष बागेचा विमा उतरविला होता. तो मिळण्यासाठी सलग दोन महिने त्यांनी शासकीय कार्यालयाचे आणि विमा कंपनीचे उंबरठे झिजविले. मात्र नियमांचा बाऊ दाखवीत त्यांना जिकडेतिकडे उडवाउडवीची उत्तरे मिळाली.  वांगी (ता. कडेगाव) येथील युवा शेतकरी जितेंद्र वाघमोडे यांनी चांगली असणारी नोकरी वडिलांच्या इच्छेविरुद्ध सोडली. आणि शेतीचा ध्यास घेतला. गतवर्षी एक एकर द्राक्ष बाग लावली ती यंदा वेळेपूर्वी पिकण्यासाठी अत्यंत कष्ट घेतले तसेच फवारणीसाठी हजारो रुपये खर्च केले. बाग ऐन बहरात आली. रुपये ३५० प्रति चार किलो प्रमाणे व्यापाऱ्याशी व्यवहार ठरला. १० जानेवारीला द्राक्षघड काढायचे ठरले आणि त्यापूर्वीच ०६ जानेवारीला पावसाने घात केला. पावसाचे पाणी द्राक्षघडात साचून द्राक्षघड कुजू लागले.  द्राक्ष बागेसाठी कर्ज घेताना सोसायटीने जिल्हा बँकेमार्फत विमा उतरविला होता. द्राक्ष बाग तर वाया गेली, सुमारे ४ लाख रुपये नुकसान झाले. आता विम्याचा तरी हातभार लागतोय का? यासाठी सोसायटी, जिल्हा बँक, विमा एजन्सी, तालुका कृषी अधिकारी आणि तहसील कार्यालय इत्यादी ठिकाणी चार-चारदा चकरा मारल्या. मात्र अखेर पदरी निराशा पडली.  जानेवारीत पडणाऱ्या पावसाने नुकसान झाले, तर त्यासाठी शासकीय धोरणच नाही. तसेच एकट्याचेच नुकसान झाले आहे. मग एकट्यासाठी नवीन नियम करायचा का, असे त्यांना तहसील कार्यालयातून सुनावण्यात आले. पंचनामा करण्याचे आदेश नाहीत. त्यामुळे नुकसान होऊनही आम्ही हतबल आहोत. अशी प्रतिक्रिया तालुका कृषी कार्यालयातून मिळाली. मार्चनंतर पाहू, असे मोघम उत्तर विमा एजन्सीने दिले. अशा प्रकारे या शेतकऱ्याची ससेहोलपट झाली असून, आता नुकसानभरपाई मिळणारच नाही. ही त्यांना खात्री झाली आहे. 

प्रतिक्रिया सदर शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. मात्र त्या दिवशीचे पर्जन्यमान व नुकसानग्रस्त शेतकरी संख्या यामधून हे नुकसान कागदोपत्री नियमात बसत नाही.  - बी. जी. कदम, तालुका कृषी अधिकारी, कडेगाव 

नुकसानाबाबत झालेल्या अन्यायाचा आणि लालफितीच्या कारभाराचा ‘पाढा’ कृषी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांच्यासमोर कथन करणार आहे.  - जितेंद्र वाघमोडे,  द्राक्ष बागायतदार शेतकरी, वांगी 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com