नाशिकमध्ये द्राक्ष निर्यात परिषदेचे आयोजन

grapes
grapes

नाशिक : नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. परंतु दरवर्षी द्राक्ष निर्यातीच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्या अनुषंगाने द्राक्ष बागायतदार, निर्यातदार तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांना निर्यातीची संधी जाणून घेण्यासाठी ‘निर्यातक्षम द्राक्षशेती, निर्यातीमधील अडचणी व उपाययोजना'या विषयावर महा एफपीओ फेडरेशन, पुणे व कोगोपोर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने द्राक्ष निर्यात परिषदचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती 'महा एफपीओ'चे नाशिक विभाग प्रमुख व परिषदेचे संयोजक भूषण निकम यांनी दिली.  एकदिवसीय द्राक्ष निर्यात परिषदेचे आयोजन मंगळवारी (ता.११) सकाळी १० ते सायं ५ पर्यंत हॉटेल गेट वे ताज, नाशिक येथे करण्यात आले आहे. या परिषदेला माजी कृषी आयुक्त डॉ. पांडुरंग वाठारकर हे उद्‌घाटक असतील, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, प्रकल्प उपसंचालक हेमंत काळे, सत्यवान काशीद पाटील,'महा एफपीओ'चे डॉ.संजय पांढरे आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत.  'शेतमाल निर्यात' या विषयावर समूह चर्चा आयोजित करण्यात आली असून यात ''महा एफपीओ''चे डॉ. एन.बी. शेटे, माजी कृषी आयुक्त डॉ. पांडुरंग वाठारकर, कृषी उपसंचालक नरेंद्र आघाव आदी सहभागी होणार आहेत. 'निर्यातीच्या संधी व योजना' यासंबंधी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ नाशिक विभागाच्या वतीने माहिती देण्यात येणार आहे. या परिषदेसाठी नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक, निर्यातदार व शेतकरी उत्पादक कंपनी यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  तज्ज्ञ करणार मार्गदर्शन  एकदिवसीय परिषदेला द्राक्ष शेती व निर्यात क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. `द्राक्ष शेती सद्य:स्थिती' या विषयावर डॉ. संजय पांढरे, 'द्राक्ष शेतीतील समस्या' या विषयावर अखिल भारतीय द्राक्ष निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ खापरे व महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे कोषाध्यक्ष कैलास भोसले हे मार्गदर्शन करणार आहेत. 'द्राक्ष निर्यातमधील लोजीस्टिक सोल्युशन' या विषयावर आशिष अरोरा, अक्षय दिवेकर, अमित पडोळ हे माहिती देतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com