नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीत ५७ टक्क्यांनी घट 

निर्यातीसाठी मागणी चांगली आहे. मात्र काढणीसाठी आलेल्या मालाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे निर्यातीस अडचणी येत आहेत. भुरी, डाऊनी व थंडीमुळे वाढलेले तडे जाण्याचे प्रमाण त्यामुळे गुणवत्तापूर्ण व प्रतवारी असलेला माल कमी उपलब्ध होत आहे. - विलास शिंदे, अध्यक्ष, सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी
grapes export
grapes export

नाशिक : राज्यातून होणाऱ्या द्राक्ष निर्यातीत एकट्या नाशिक जिल्ह्याचा ९१ टक्के वाटा आहे. मात्र सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेली अतिवृष्टी, सातत्याने होणाऱ्या हवामान बदलांचा द्राक्षांना चांगलाच फटका बसला असून, निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन निम्म्यावर आले आहे. परिणामी, नाशिकमधून होणाऱ्या द्राक्ष निर्यातीत ५७ टक्के इतकी घट झाली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांच्या अर्थकारणावर परिणाम झाला आहे. 

२०१९ मध्ये ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कसमादे पट्ट्यातील पूर्वहंगामी बागांमध्ये मोठ्या प्रमाणात माल खराब झाला. त्यामुळे पूर्वहंगामी निर्यातीत मोठी पिछाडी झाली. त्यांनतर डिसेंबर महिन्यात द्राक्ष निर्यात सुरळीत होण्याची चिन्हे असताना नोव्हेंबरच्या अतिवृष्टीमुळे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. त्यामुळे या वर्षी जिल्ह्यातून परदेशात होणारी द्राक्ष निर्यात निम्म्यावर आली आहे. 

राज्यातून दरवर्षी युरोप, रशिया, दुबई, श्रीलंका, चीन आदी देशांत द्राक्षांची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. त्यात युरोपियन देशांसह रशिया व दुबई मार्केटला मोठी मागणी आहे; मात्र घटलेली उत्पादकता, मालाची नासाडी व घसरलेल्या प्रतवारीचा परिणाम निर्यातीवर झाला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावधीनंतर निर्यात सुरळीत होईल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे चालू हंगामातील उभ्या असलेल्या पिकाचा अंदाज पाहता निर्यातीसाठी द्राक्ष कमी उपलब्ध होतील, मात्र उपलब्ध चांगल्या मालाला दर मिळेल, असे सांगण्यात येत आहे.  ही आहेत प्रमुख कारणे : 

  • अतिवृष्टीमुळे जिरलेले घड 
  • घडकुजचा प्रादुर्भाव 
  • तयार मालांना तडे जाऊन बुरशी, रस शोषणारी पाकोळीचा प्रादुर्भाव 
  • दव पडत असल्याने देठावरची डाऊनी, करपा बुरशीजन्य रोगांमुळे मालाची प्रतवारी घटली 
  • जानेवारीतील थंडी व दवामुळे काळ्या वाणांना तडे जात आहेत. 
  • ‘ग्रेपनेट’नोंदणी  ग्रेपनेट निर्यातक्षम प्लॉट नोंदणी : १०२६२  एकूण नोंदणी क्षेत्र (हेक्टर) : ६८४९ 

    द्राक्ष निर्यात स्थिती (२० जानेवारीअखेर) 

    निर्यात देश २०२८-१९ २०१९-२० घट (टक्के) 
    युरोपियन देश २४६८ १५७३ ३७
    नॉन युरोपियन देश १०९६४ ४२६४ ६१ 

    देशनिहाय निर्यात (टनांत) 

    रशिया १०११३ ४२१६ 
    दुबई ५०० १५ 
    श्रीलंका २०० १८ 
    चीन १५१

    प्रतिक्रिया सप्टेंबर महिन्यात घेतलेल्या छाटण्यांमधील एकरी ५ ते ६ टन उत्पादन घटले आहे. करपा, मणी पोखरणारी अळी, तसेच जानेवारी महिन्यातील थंडीमुळे काढणीला आलेल्या मालाला तडे जात असल्याने मालाची नासाडी वाढली आहे.  -रोहिदास पाटील, द्राक्ष उत्पादक, निळवंडी, ता. दिंडोरी  मागील वर्षीच्या तुलनेत निर्यातक्षम दर २० ते ३० टक्क्यांनी जास्त आहेत. सफेद व काळ्या वाणांच्या गुणवत्तेवर दर मिळत आहेत. मात्र ७० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे.  -खंडू शेवाळे, द्राक्ष उत्पादक, भुयाणे, ता. सटाणा  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com