सांगली जिल्ह्यातून द्राक्ष निर्यातीस प्रारंभ

कोरोनामुळे लॉकडाऊन होता. त्यामुळे निर्यात करता आली नाही. परंतू गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातून द्राक्षाची निर्यात सुरु झाली आहे. कंटनेर उपलब्धतेनुसार द्राक्षाची निर्यात पूर्ण होईल. - डी. एस. शिलेदार, कृषी अधिकारी (निर्यात), सांगली
grapes
grapes

सांगली : द्राक्ष निर्यातीस परवानगी मिळाल्याने जिल्ह्यातून सहा कंटेनर द्राक्ष युरोपला तर आखाती देशांत ३२ कंटनेर असे ३८ कंटनेरची निर्यात झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सुत्रांनी दिली. द्राक्षाची निर्यात सुरु झाल्याने द्राक्ष उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यातून द्राक्षाची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. २०१९ मध्ये अतविृष्टी आणि महापूर यामुळे द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बागा उशीरा घेतल्या. यंदा २०१० शेतकऱ्यांनी द्राक्षाची निर्यात करण्यासाठी नोंदणी केली असून १११२ हेक्टर निर्यातक्षम द्राक्षाचे क्षेत्र आहे. द्राक्षाची नोंदणीही कमी झाली होती. यंदाचा निर्यातक्षम हंगाम जानेवारीत सुरु झाला. सरुवातीच्या काळात युरोपसह आखाती देशात द्राक्षाची निर्यात झाली. मात्र, जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पसरला. या विषाणूचा देशातसुध्दा प्रादुर्भाव झाला. 

दरम्यानच्या काळात द्राक्षाची काढणी सुरु होती. परंतू कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव होऊ नये म्हणून देश बंद केला. अगोदरच शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांनी निर्यातक्षम द्राक्षाची खरेदी केली होती. या द्राक्षाची प्रतवारी, पॅकींग करुन शीतगृहात ठेवली होती. यावेळी वाहतूक बंद होती. तसेच निर्यासाठी परवानगीही बंद केली होती. त्यामुळे निर्यात होवू शकली नाही. निर्यात कधी सुरु होते, याकडे द्राक्ष उत्पादकांसह व्यापाऱ्यांचे लक्ष लागून होते. शासनाने द्राक्षाची निर्यात सुरु होण्यासाठी कंटनेरला परवानगी दिल्याने वाहतूक सुरळीत सुरु झाली आहे. त्यामु़ळे निर्यात करण्यासाठी निर्यातदारही पुढे आले आहे. तीन दिवसांपासून जिल्ह्यातून द्राक्षाची निर्यात सुरु झाली आहे. युरोपसह आखाती देशात सांगलीची द्राक्षे जावू लागली आहेत. सध्या जिल्ह्यातून ३८ कंटनेर द्राक्षाची निर्यात झाली आहे. शीतगृहात साठा जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून खरेदी केलेली ७० ते ८० कंटेनर म्हणजे ८४० ते ९६० टन द्राक्ष व्यापाऱ्यांनी शीतगृहात ठेवली आहेत. सध्या निर्यातीस परवानगी मिळाली असली तरी, द्राक्ष पाठविण्यास कंटेनर उपलब्ध होत नाहीत. जसजसे कंटनेर उपलब्ध होतील तसतशी द्राक्षे निर्यात होतील.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com