agriculture news in marathi, grapes export status, sangli, maharashtra | Agrowon

सांगली जिल्ह्यातून १० हजार ६०० टन द्राक्ष निर्यात
टीम अॅग्रोवन
रविवार, 25 मार्च 2018
निर्यातक्षम द्राक्षांना चांगला दर मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांचा ओढा निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेण्याकडे वाढला आहे. यामुळे या द्राक्ष क्षेत्रात दरवर्षी वाढ होते आहे.
- मकरंद कुलकर्णी, कृषी उपसंचालक, सांगली.
सांगली ः दर्जेदार द्राक्षांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या सांगली जिल्ह्यातून आतापर्यंत सुमारे १० हजार ६०० टन द्राक्षे युरोपसह आखाती देशात निर्यात करण्यात आली आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा निर्यातीत तब्बल दोन हजार टनांनी वाढ झाली आहे. यंदाच्या हंगामात द्राक्षाची एकूण १५ हजार मेट्रीक टन निर्यात होण्याची शक्‍यता वर्तवली जाते आहे.
 
सांगली जिल्ह्यात दरवर्षी निर्यातक्षम द्राक्ष क्षेत्रात वाढ होत आहे. अनेक शेतकरी पाणीटंचाईवर मात करीत दर्जेदार द्राक्ष उत्पादन घेण्यास प्राधान्य देत आहे. जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी युरोप आणि आखाती देशात द्राक्ष पाठण्यात सरस झाले आहेत. गेल्या पाच वर्षांचा आढावा पाहिल्यास यंदाच्या हंगामात जिल्ह्यातून उच्चांकी द्राक्षाची निर्यात झाली आहे. यंदाचा हंगाम १५ एप्रिलच्या दरम्यान, संपण्याची शक्‍यता असून पंधरा हजार मेट्रीक टन द्राक्षाची निर्यात होईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
 
गेल्यावर्षी १२९१शेतकऱ्यांनी ६७७.८१ हेक्‍टर क्षेत्राची ऑनलाइन पद्धतीने निर्यातीसाठी नोंदणी केली होती. यंदा यात वाढ होत १९५८ शेतकऱ्यांनी १०३०.५० हेक्‍टर क्षेत्राची नोंद केली आहे. आजअखेर १० हजार ६०० मेट्रीक टनाची निर्यात झाली आहे. युरोपमध्ये ५९७ कंटेनर तर आखाती देशात ३१६ कंनेटर जिल्ह्यातून रवाना झाले आहेत. 
 
गेल्या काही वर्षांत नियमित द्राक्ष उत्पादनाबरोबरच निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनास प्राधान्य दिले जात आहे. प्रामुख्याने तासगाव, खानापूर, आणि मिरज तालुक्‍याचा पूर्व भागातील शेतकरी द्राक्ष निर्यात करताहेत. यंदा निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन असलेल्या क्षेत्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. मात्र शेतकऱ्यांनी अडचणींवर मात करून विक्रमी उत्पादन घेतले आहे.
--------------

इतर ताज्या घडामोडी
...अन् आमचं स्वप्नच पुरानं खरडून नेलं पटवर्धन कुरोली, पंढरपूर, जि. सोलापूर : आधीच दोन...
जायकवाडी कालव्याच्या पाण्यामुळे पीक...परभणी : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून...
एमएआयडीसी’च्या सक्षमीकरणासाठी...मुंबई : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास...
उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत...उस्मानाबाद  ः खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपात...
गंगापूर धरण क्षेत्रात पावसाचे पुनरागमन...नाशिक  : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
कृषी सहायकांच्या अडचणी न सोडविल्यास २०...अकोला ः अमरावती विभागातील कृषी सहायक ते कृषी...
हवामान बदलाचा शेती, शेतकऱ्यांच्या ...नांदेड  ः हवामान बदलामुळे येत असलेल्या...
अमरावती कृषी विभागातील ३२ टक्के पदे...अमरावती  :  रिक्‍त पदांमुळे...
शेतकरी राजकारण अन् जाती-धर्मात अडकला :...नाशिक ः शेतकऱ्यांचे प्रश्न कमी होण्यापेक्षा ते...
शिरसाईचे पाणी लाभार्थ्यांसाठी मृगजळचउंडवडी, जि. पुणे : पावसाळा सुरु होवून अडीच महिने...
विम्याचे दावे निकाली काढा; आयआरडीएआयचे...नवी दिल्ली : पुराचा फटका बसलेल्या कर्नाटक,...
उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरूचसिमला/धर्मशाला : उत्तर भारतात विशेषतः हिमालयाच्या...
आता चर्चा फक्त व्याप्त काश्‍मीरवर :...काल्का, हरियाणा : पाकिस्तानप्रती कठोर भूमिका घेत...
पुण्यात वांगी, तोंडली, गाजरासह...पुणे   ः राज्यातील पूरस्थिती...
सिंधूताई विखे पाटील यांचे निधनशिर्डी, जि. नगर : दिवंगत माजी खासदार बाळासाहेब...
महाजनादेश यात्रेला बुधवारपासून नंदूरबार...नंदुरबार ः राज्यातील पूरस्थितीमुळे स्थगित झालेली...
पुणे बाजार समिती प्रशासकपदी वर्णी...पुणे  : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे...
प्रतिकूल हवामानामुळे जुन्नर तालुक्यातील...नारायणगाव, जि. पुणे  : दोन महिन्यांपासून...
नगर जिल्ह्यातील दहा ते अकरा तालुक्यांवर...नगर  ः राज्याच्या काही भागांत जोरदार पावसाने...
पीक नुकसानीबाबत शेतकऱ्याने मांडली कृषी... कऱ्हाड, जि. सातारा ः घरात हुतं नव्हतं...