आटपाडी तालुक्यातून डाळिंब निर्यातीला ब्रेक

युरोपियन राष्ट्रांना रेसिड्यू फ्री (कीटकनाशक विरहित) डाळिंबाची दरवर्षी अडीचशे कंटेनर देशातून आणि आटपाडी तालुक्‍यातून शंभर कंटेनर निर्यात होत होती.
pomegranate
pomegranate

सांगली  : युरोपियन राष्ट्रांना रेसिड्यू फ्री (कीटकनाशक विरहित) डाळिंबाची दरवर्षी अडीचशे कंटेनर देशातून आणि आटपाडी तालुक्‍यातून शंभर कंटेनर निर्यात होत होती. यंदा अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसल्याने निर्यातीचा टक्का कमी झाला आहे. यंदा देशातून दहा, तर आटपाडीतून जेमतेम दोन कंटेनरची कशीबशी निर्यात होईल, असे चित्र आहे. आटपाडी तालुक्यातून आखाती देश, दुबई, बांगलादेश या देशांनाही हे डाळिंब पाठविले जातात. गेल्या काही वर्षांपासून तालुक्यातून युरोपलाही डाळिंबाची निर्यात होऊ लागली आहे. त्यामुळे शेतकरी निर्यातक्षम डाळिंब उत्पादन घेण्याकडे वळला आहे. शेतकरी गटशेतीच्या माध्यमातून डाळिंबाची निर्यात करू लागले आहेत.

याचा बसला फटका

  • पाच महिने वेळोवेळी पाऊस 
  • अतिवृष्टीमुळे डाळिंब वाचविण्याचे आव्हान 
  • स्थानिक बाजारपेठेत चांगले दर
  • शेतकऱ्यांनी बागा वाचविण्याला दिले प्राधान्य
  • तालुक्‍यातून केवळ एकाच कंटेनरची निर्यात
  • दराची स्थिती (किलो/रुपये) गत हंगाम :  निर्यातीसाठी : ८० ते १२०  स्थानिक दर  :५० ते ८०  सुरू हंगाम निर्यातीसाठी : २२५  स्थानिक दर : १५०  प्रतिक्रिया गेल्या वर्षी आटपाडी तालुक्‍यातून १०० कंटेनरची युरोपियन राष्ट्रांना निर्यात झाली होती. यंदा एकच कंटेनर आतापर्यंत गेला असून, अजून कसातरी एक कंटेनर जाईल. युरोपियन राष्ट्रांची निर्यात खूप खाली आली आहे. - विजय मरगळे, डाळिंब उत्पादक, तडवळे, ता. आटपाडी

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com