agriculture news in Marathi, grapes harvesting slow, Maharashtra | Agrowon

होळीमुळे द्राक्ष काढणी मंदावली
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 मार्च 2019

नाशिक : द्राक्षपट्ट्यात द्राक्ष काढणीसाठी आदिवासी भागातून मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ उपलब्ध होत असते. मात्र होळीच्या सणासाठी मजूर गावाकडे जात असल्याने काढणीचे काम मंदावले आहे. त्यातच सणामुळे देशांतर्गत असलेली द्राक्षाच्या मागणी व दरात वाढ झाली आहे. उत्तर भारतातील बाजारपेठेत द्राक्षांचा उठाव वाढला आहे. सध्या बांगलादेश देशमध्ये आवक वाढली आहे, तर युरोप व रशियातील निर्यात स्थिर आहे.

नाशिक : द्राक्षपट्ट्यात द्राक्ष काढणीसाठी आदिवासी भागातून मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ उपलब्ध होत असते. मात्र होळीच्या सणासाठी मजूर गावाकडे जात असल्याने काढणीचे काम मंदावले आहे. त्यातच सणामुळे देशांतर्गत असलेली द्राक्षाच्या मागणी व दरात वाढ झाली आहे. उत्तर भारतातील बाजारपेठेत द्राक्षांचा उठाव वाढला आहे. सध्या बांगलादेश देशमध्ये आवक वाढली आहे, तर युरोप व रशियातील निर्यात स्थिर आहे.

 देशांतर्गत बाजारपेठेत द्राक्षांच्या आवकेत सध्या काही प्रमाणात घट झाली आहे. वाढत्या उन्हाळ्याबरोबरच गोड, रसाळ द्राक्षांना मागणी वाढली. रंगीत वाणांमध्ये शरद सीडलेस, नानासाहेब पर्पल, जम्बो सीडलेस या वाणांची द्राक्षे ९० टक्के आटोपली असून, केवळ १० टक्केच माल शिल्लक आहे. रंगीत वाणांची आवक कमी झाल्याने मागणी वाढली आहे. त्यास चांगला बाजारभाव आहे.

टणकपणा आणि चवीमुळे रंगीत द्राक्षांना देशांतर्गत बाजारपेठेत चांगले दर मिळत आहेत. गत सप्ताहात जम्बो सीडलेस, नानासाहेब पर्पल या वाणांचे दर ९० रुपयांपर्यंत पोचले आहे. फेब्रुवारी महिन्यात द्राक्षांना थंडीचा फटका बसला होता. द्राक्ष फुगवणीसाठी व साखर उतरण्यास यंदा १५ दिवस उशीर झाल्याने योग्य वेळी हे वाण बाजारात येऊ शकले नाही. येत्या काळात वाढत्या उन्हामुळे मागणी व दरात वाढ होण्याची चिन्हे आहेत. 

मागील वर्षाच्या तुलनेत चालू वर्षी द्राक्ष उत्पादनात वाढ झाल्याने बाजारभाव स्थिर होते. मात्र उत्तर भारतातील ओसरलेली थंडी यामुळे मागणीत वाढ झाल्याने व्यापारी द्राक्ष उत्पादकांकडे मालाची मागणी करीत आहेत. अशा परिस्थितीत होळीच्या सणामुळे मजुरांनी दांडी मारल्याने मालाच्या पुरवठ्यात अडचण येणार आहे. साधारणपणे स्थानिक बाजारपेठेत ५ ते १० रुपयांनी बाजारभाव वाढले आहेत. अावक मंदावल्यामुळे व मजूरटंचाईमुळे बाजारभाव उसळण्याची शक्यता आहे, असे जाणकारांनी सांगितले आहे. 

इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...