agriculture news in Marathi grapes insurance cover four time costly Maharashtra | Agrowon

पूर्वहंगामी द्राक्षाचे विमा कवच चारपट महागडे 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 जून 2021

गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील पूर्वहंगामी द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले. या पार्श्‍वभूमीवर द्राक्ष पिकाला विमा कवच देण्यात यावे, अशी मागणी होत होती.

नाशिक : गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील पूर्वहंगामी द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले. या पार्श्‍वभूमीवर द्राक्ष पिकाला विमा कवच देण्यात यावे, अशी मागणी होत होती. त्यानुसार शासनाने मृग बहरातील द्राक्ष पिकाला विमा देण्याचा निर्णय घेतला. मात्र शेतकऱ्यांचा विमा हप्त्याचा हिस्सा नियमित हंगामापेक्षा चार पटीने वाढविण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. 

‘अधिक जोखीम अधिक दर’ असे पूर्वहंगामी द्राक्ष उत्पादनाचे गणित आहे. जिल्ह्यातील कसमादे भागात अनेक शेतकरी मोठ्या प्रयोगशीलतेने द्राक्ष उत्पादन घेतात. मात्र अतिवृष्टी, अवकाळी पाऊस यामुळे अनेक अडचणी वाढतच होत्या. नियमित हंगामापेक्षा अधिक खर्च येत होता. त्यातच नुकसानीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागतो. त्यानुसार मृग बहरातील फळपीकनिहाय धोके लक्षात घेऊन ८ फळपिके समाविष्ट करण्यात आले. त्यामध्ये द्राक्ष पिकासाठी पाऊस, आर्द्रता व किमान तापमान असे धोके विचारात घेण्यात आले आहेत.

१५ जून ते १५ नोव्हेंबर असा काळ निश्‍चित करण्यात आला आहे. त्यास ३ लाख २० हजार एकरी परतावा निश्‍चित करण्यात आला आहे. नियमित आंबिया बहाराच्या तुलनेत शेतकरी हिस्सा चार पट म्हणजेच ६४ हजार ठेवण्यात आला आहे. नियमित हंगामापेक्षा शेतकरी हिस्सा अधिक असल्याने तो कमी असावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. 

तुलनात्मक फरक असा (हेक्टरी)

हंगाम संरक्षित रक्कम केंद्र हिस्सा राज्य हिस्सा शेतकरी हिस्सा 
मृग ३,२०,००० ४०,००० १,०४,००० ६४,००० 
आंबिया ३,२०,००० ८,००० ८००० १६,००० 

प्रतिक्रिया 
शासनाने जाहीर केलेल्या विमा योजनेत द्राक्ष पिकाच्या अवस्थेत होणारे नुकसान ग्राह्य धरून परतावा द्यायला हवा. शासनाने निर्णयात स्पष्टता आणावी.यासह विमा योजनेत शेतकरी हिस्सा वाढवला आहे.तो कमी करायला हवा. 
- खंडेराव शेवाळे, पूर्वहंगामी द्राक्ष उत्पादक, भुयाणे, ता. सटाणा 

नियमित द्राक्ष हंगामापेक्षा शासनाने चार पट म्हणजे ६४ हजार हप्ता केला. मात्र विमा संरक्षित रक्कम तेवढीच ठेवली आहे हे चुकीचे आहे. नियमित हंगामाच्या तुलनेत ५० ते ७५ हजार खर्च अधिक असल्याने शासनाने ही बाब विचारात घेऊन दिलासा द्यावा. जोखीम अधिक असल्याने काही बदल करावेत. 
- कृष्णा भामरे, संचालक, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, नाशिक विभाग. 


इतर बातम्या
पशुचिकित्सा व्यवसायी आंदोलनाने पशुसेवा...नगर : पशुचिकित्सा व्यवसायी (डिप्लोमा, पदविकाधारक...
अमरावती जिल्ह्यात १८३ जणांना ...अमरावती ः २०१७-१८ मध्ये फवारणीदरम्यान विषबाधेत...
पीकविम्यातील सूचनांचा केंद्राकडून...पुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेत विमा कंपन्यांच्या...
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी साडेअकरा हजार...मुंबई ः राज्यातील विविध जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे...
कोकणात काही ठिकाणी मुसळधार पुणे : कोकणात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस...
निविष्ठा वितरणातील अडचणींत लक्ष घालणार...पुणे ः राज्यात निविष्ठा वितरणात अडचणी येत असल्यास...
मराठवाड्यात सव्वा लाख हेक्टरवरील...औरंगाबाद : मराठवाड्यातील सात जिल्ह्यांतील १००३...
गोंदिया जिल्ह्यात विमाधारक शेतकरी...गोंदिया : गेल्या वर्षी जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात...
साखरेचे किमान विक्री मूल्य तातडीने...कोल्हापूर : सध्या साखर उद्योग संकटात असून,...
वर्धा : पीककर्जप्रकरणी १६ बॅंकांना नोटीसवर्धा : पीककर्ज वाटपात दरवर्षी प्रमाणे या वर्षी...
आपद्‌ग्रस्त कुटुंबांना मिळणार पाच हजाररत्नागिरी : अतिवृष्टीचा सर्वाधिक तडाखा चिपळूण,...
पूरबाधित कर्जदारांना सहकार्याची भूमिका...कोल्हापूर : जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळे नागरिक व...
सेंद्रिय शेतीचे तंत्र अंगीकारा ः डॉ. ढवणबदनापूर, जि. जालना : अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित...
अकोल्यात ३७ हजार हेक्टरचे पंचनामेअकोला : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या झालेल्या...
रुग्णालयांच्या सुरक्षेचा तपशील दाखल करा...मुंबई : रुग्णालयांच्या सुरक्षेसाठी आतापर्यंत...
परभणीत पशुधन पदविकाधारकांचे आंदोलनपरभणी ः पशुधन पदवीधारकांची जिल्हास्तरावर नोंदणी...
सातारा :बेसुमार वृक्षतोडीमुळे कोयनेचे...सातारा : कोयना धरण परिसरात मोठ्या प्रमाणात...
‘महसूल’ लोकाभिमुख करा ः आयुक्त गमेनाशिक : प्रशासनात चांगले काम केल्यास समाज देवत्व...
मोहोळ, उत्तर सोलापुरात बिबट्याची दहशत...सोलापूर ः चिंचोली, शिरापूर (ता. मोहोळ) अकोलेकाटी...
लासलगाव बाजार समितीत टोमॅटो लिलावास...नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प.पू...