agriculture news in Marathi, grapes new variety for juice, Raisins, Maharashtra | Agrowon

रस, मनुक्यासाठी द्राक्षाचे नवे वाण
अमित गद्रे
सोमवार, 2 एप्रिल 2018

पुणे : येथील आघारकर संशोधन संस्थेने बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन रस आणि मनुकानिर्मितीसाठी ‘एआरआय-५१६’ ही नवी जात विकसित केली आहे. सध्या देशभरातील सात संशोधन केंद्रांवर या जातीचा इतर पाच रसांच्या द्राक्ष जातींच्या बरोबरीने तुलनात्मक अभ्यास सुरू आहे. राज्यातील द्राक्ष बागायतदारांकडेही या जातीच्या चाचण्या सुरू आहेत. पुढील वर्षी ही जात लागवडीसाठी उपलब्ध होईल, असे संस्थेतील तज्ज्ञांनी सांगितले.

पुणे : येथील आघारकर संशोधन संस्थेने बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन रस आणि मनुकानिर्मितीसाठी ‘एआरआय-५१६’ ही नवी जात विकसित केली आहे. सध्या देशभरातील सात संशोधन केंद्रांवर या जातीचा इतर पाच रसांच्या द्राक्ष जातींच्या बरोबरीने तुलनात्मक अभ्यास सुरू आहे. राज्यातील द्राक्ष बागायतदारांकडेही या जातीच्या चाचण्या सुरू आहेत. पुढील वर्षी ही जात लागवडीसाठी उपलब्ध होईल, असे संस्थेतील तज्ज्ञांनी सांगितले.

द्राक्ष जातीच्या संशोधनाबाबत आघारकर संशोधन संस्थेच्या अनुवंशिकी व वनस्पती पैदास विभागातील तज्ज्ञ डॉ. सुजाता तेताली म्हणाल्या, की सन १९७१ पासून द्राक्षाच्या नवीन जातीच्या विकासाबाबत संशोधन सुरू आहे. आम्ही बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन रस आणि मनुकानिर्मितीला उपयुक्त ठरणारी ‘एआरआय-५१६’ ही द्राक्ष जात विकसित केली. कटावबा आणि ब्यूटी सिडलेस या जातींच्या संकरातून ही जात विकसित करण्यात आली आहे. द्राक्ष मणी निळसर काळ्या रंगाचे आहेत.

रस आणि मनुक्याला वैशिष्ट्यपूर्ण रंग आणि स्वाद असल्यामुळे बाजारपेठेत निश्चितपणे मागणी मिळेल. आम्ही या जातीतून येत्या काळात बिनबियाची जात विकसित करत आहोत. अजून किमान ३ ते ४ जाती येत्या काळात शेतकऱ्यांना आम्ही उपलब्ध करून देत आहोत. या संशोधनासाठी संस्थेतील एस. पी. करकमकर, एस. व्ही. फाळके यांचे सहकार्य लाभले आहे. 

एआरआय-५१६ जातीची वैशिष्टे 

 • मण्याचा रंग निळसर काळा. मण्यात मऊ बी. खाण्यासाठी, मनुका, रस आणि वाईनसाठी उपयुक्त.
 • फळ छाटणीपासून ११० ते १२० दिवसांत तयार.
 • लांबट व सुटसुटीत गोलाकार मणी, एकसमान 
 • घडाची पक्वता.
 • १०० मण्याचे वजन ः १५० ते १९० ग्रॅम.
 • साखरेचे प्रमाण ः २२ ते २४  अंश ब्रीक्स, आम्लता ०.४ ते ०.६ टक्के.
 • रसाचे प्रमाण ः ६० ते ७० टक्के.
 • केवडा व भुरी रोगास मध्यम आणि करपा रोगास प्रतिकारक.
 • जीएच्या वापराची गरज नाही. लागवड आणि पीक व्यवस्थापन खर्च कमी.
 • प्रतिवेल १५ किलो उत्पादन. शीतगृहात आठ दिवस साठवणूक क्षमता.
   

औषधी गुणधर्म 

 •  ॲन्टीआॅक्सिडंट घटकांनीयुक्त. यामध्ये रेस्वेरेट्रॉल असल्याने कोलेस्र्टॉल नियंत्रणात राहण्यास मदत.
 •  रसाचे सेवन केल्याने स्थूलता आणि रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत. पचनास पूरक.
 •  चेतासंस्थांचे संरक्षण, मानसिक विकारावर उपयोगी.

इतर अॅग्रो विशेष
चित्रकलेसह पूरक व्यवसायात भरले यशाचे...नगर जिल्ह्यात माका (ता. नेवासा) येथील सुरेश गुलगे...
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची...बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने (जि. पुणे)...
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
विविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...
उत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...
‘पक्षाघाता’च्या साथीत कायदा बासनात"व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर...
चिंता वाढविणारी उघडीपराज्यात मॉन्सूनच्या पावसाचा काहीसा जोर कमी झाला...
ऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश...
पीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे  : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू...
कमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...
शेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...
मराठवाड्यात दुष्काळाची धग कायमऔरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला,...
मराठा उमेदवारांच्या खुल्या प्रवर्गातील...मुंबईः मराठा आरक्षणाला स्थगिती असताना खुल्या...
मराठवाड्यात ४८ टक्‍के पेरणी; पिके...औरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाच्या ४९ लाख ९६...
बिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...