agriculture news in Marathi grapes over 5 thousand acre in farm Maharashtra | Agrowon

सांगलीत पाच हजार एकरावरील द्राक्षे बागेतच 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 एप्रिल 2020
  • सध्या कोरोना विषाणूमुळे द्राक्ष बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने कर्जाच्या व्याजात सवलत द्यावी. हप्ते बांधून द्यावेत. नवीन कर्ज द्यावे, तरच शेतकरी उभा राहिल. 

- चंद्रकांत लांडगे, विभागीय अध्यक्ष, द्राक्ष बागायतदार संघ, सांगली. 

सांगली: लॉकडाऊनमुळे द्राक्षाची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सुमारे ५ हजार एकरावरील द्राक्षे बागेतच असून शेतकऱ्यांना जवळपास ३५० कोटींहून अधिकचा फटका बसण्याची शक्यता असल्याचे जाणकारांनी सांगितले. त्यामुळे शासनाने कर्जमाफी द्यावी, अशी मागणी द्राक्ष उत्पादकांनी केली आहे. 

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने संपूर्ण वाहतूक बंद करण्यात आली होती. या दरम्यान, जिल्ह्यात २० हजार एकर क्षेत्रावरील द्राक्ष बागेतच होती. परंतू शेतीमाल वाहतुकीचा समावेश अत्यावश्यक सेवेत केल्याने वाहतूकीला परवानगी मिळाला. 

मात्र, देशभरातील द्राक्षाची बाजारपेठ बंद आहे. सध्या द्राक्षाला मागणी असली तरी ग्राहकांची संख्या घटली आहे. त्यामुळे शेतकरी बेदाणा निर्मिती करण्याकडे वळले. तर काहींनी द्राश्राची थेट विक्री केली. सध्या जिल्ह्यात पाच हजार एकरावरील द्राक्षाची विक्री होणे बाकी आहे. या पाच हजार क्षेत्रावरील द्राक्षाचे सुमारे ३५० कोटींचा फटका बससण्याची शक्यता आहे. 

द्राक्ष शेतीचा दृष्टिक्षेपात 
लॉकडॉऊन होण्यापूर्वी :
२० हजार एकर क्षेत्र शिल्लक होते 
बेदाणा निर्मितीस : १० हजार एकर क्षेत्रावरील वापर 
थेट विक्री : पाच हजार एकरावरील 
देशभरात विक्री : ५ हजार एकरावरील 
सध्या शिल्लक क्षेत्र : ५ हजार एकर 

शेतकरी संकटात 

  • द्राक्षावर सुरवातीपासूनच संकटाची मालिका 
  • द्राक्ष उत्पादकांची संपूर्ण कर्जमाफीची मागणी 
  • कमी व्याजदरात नवीन कर्ज उपलब्ध करुन द्यावे 
  • गेल्या पंधरा दिवसांपासून द्राक्षाची विक्री संथगतीने 

प्रतिक्रिया
अगोदरच महापूर आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. त्यातच कोरोनामुळे संपूर्ण बाजारपेठ बंद होत्या. त्यामुळे द्राक्षाची विक्री झाली नसल्याने कर्जाचा डोंगर उभा राहणार आहे. शासनाने संपूर्ण कर्जमाफी करावी. 
- मारुती चव्हाण, द्राक्ष उत्पादक शेतकरी, सांगली 


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...
शेतीसंबंधी विधेयकाविरोधात देशव्यापी...नगर ः केंद्र सरकारने काढलेल्या व आता कायद्यात...
कृषी खात्यात आजपर्यंत कोरोनाची १८१...अकोला ः राज्यात वाढत चाललेल्या कोरोनाचा फटका कृषी...
साखर निर्यात योजनेस डिसेंबर अखेरपर्यंत...कोल्हापूर: गेल्या वर्षभरात साखर निर्यातीचे नवे...
मराठवाड्यात पूर, पावसाचे थैमाननांदेड-औरंगाबाद : परभणी व हिंगोली जिल्ह्यांत...
बंदर, सीमेवरील कांदा निर्यातीचा मार्ग...नाशिक: निर्यातबंदीमुळे मुंबईतील जेएनपीटी बंदरावर...
नाचणी, भाजीपाला लागवडीतून महिला गट झाला...गावातील ७५ टक्के जमीन कातळाची, उरलेला भाग डोंगराळ...
पीककर्ज वाटपात राज्यात कोल्हापूर प्रथम...कोल्हापूर : जिल्ह्याकरिता पीक कर्जाचे वार्षिक...
कृषी विधेयकांना वाढता विरोधनवी दिल्लीः देशभरात ठिकठिकाणी विशेषतः पंजाब आणि...
तंबी देताच फळपिकांची विमा भरपाई झाली...पुणे: फळपिक विमा योजनेतील अडवून ठेवलेली नुकसान...
कांदा उत्पादकांची सावध चाल नाशिक: केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचे धुमशान पुणे ः मराठवाड्यात पावसाचे धुमशान सुरूच आहे....
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक...मुंबई: कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या आणि...
हलक्या पावसाची शक्यता पुणे ः बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात उद्या (ता...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...